पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

इमेज
बारामती: दि.६ (प्रतिनिधी )   बारामतीत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु असतानाच बारामती शहरात पैसे वाटून व दमदाटी करुन मतदान विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून बारामती शहर पोलिस स्टेशनला तातडीने रात्री ११ वाजतां दाखल करण्यात आली आहे.     लोकसभेची सध्याची निवडणूक प्रतिष्ठेची झाली असुन एका घरातील व्यक्ती समोरासमोर निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. मा.खा.सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी सरळ लढत आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. अत्यंत अटीतटीच्या लढाईत कोण जिंकतो याकडे सर्व देशाचे लक्ष लागून राहिले. मग अशा लढाईत साम, दंड, भेद याबरोबरच आर्थिक गोष्टींचा वापर होईल यात वेगळे सांगण्याची गरज नाही.     बारामती शहरात आमराई व मुजावर वाडा येथे पैसे वाटून व दमदाटी "दादागिरी" करुन विरोधी पक्षाने म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडुन मतदान विकत घेण्याचा प्रकार चालू असुन तातडीने गस्त घालावी व बंदोबस्त वाढवावा. तसेच असे करणार्या समाज कंटकांवर तातडीने कारवाई करावी. अशी तक्रार बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रे...