पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमनेर येथील अल्पवयीन मुलीवरिल अँसिड हल्ल्यातील आरोपींना कठोर शिक्षा करावी सुवर्णकार समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन

इमेज
महाराज्य टाईम्स (बारामती) : संगमनेर येथील वडगाव पान येथे कुमारी ईश्वरी डहाळे या चिमुकलीवर झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याची घटना अत्यंत संतापजनक आणि निंदनीय आहे. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई व शिक्षा करण्यात यावी व पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे निवेदन सराफ सुवर्णकार संरक्षण समिती,बारामती च्या वतीने बारामती शहर पोलिस स्टेशन प्रशासनाला देण्यात आले.      संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे राहणाऱ्या संजय डहाळे यांच्या १३ वर्षांच्या इयत्ता ६ वी त शिकणाऱ्या चिमुकली वर अज्ञात माथेफिरूने अँसीड हल्ला करून त्या मुलीला जबर जखमी केले माणूसकीला काळीमा फासणार्या या नराधम समाजकंटकाला त्वरित अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा करणयाची मागणी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती व सर्व शाखीय सोनार समाज यांच्या वतीने महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन छेडतील आसा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला ही संतप्त ठाम मागणी समितीच्या वतीने निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.       सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून बारामती शहर पोलीस स्टेशन तसेच महाराष्ट्राती...

शासकिय शिक्क्यांचा गैरवापर प्रकरण: पत्रकाराच्या पाठपुराव्यामुळे डाॅक्टरवर गुन्हा दाखल

इमेज
महाराज्य टाईम्स: बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा माजी वैद्यकीय अधिकारी डाॅक्टर यांनी बनावट शिक्का तयार करून स्वतःच्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या जखमी व्यक्तीला बोगस शासकीय प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा "लोकशाही" न्यूज चॅनेलचे पत्रकार विकास कोकरे यांनी आक्रमकपणे केल्यामुळे अखेर शहर पोलिस ठाण्यात संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर बारामतीत विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक नंतर बारामतीत सुद्धा पत्रकारामुळेच गुन्हा उघड झाला:     सध्या महाराष्ट्रात नाशिक मधील भोंदुबाबा अशोक खरातच्या महिलांवरील अत्याचार व अघोरी कृत्य यामुळे समाजात तिव्र संतापाचे पडसाद उमटले आहेत. खरतर याप्रकराणाला वाचा फोडली ती स्थानिक वर्तमानपत्र "खबरदार पुढारी" यांच्या पत्रकाराने आणि त्यामुळेच खरात प्रकरणाची पाळेमुळे उघड झाली. अगदी त्याच प्रमाणे शासकिय शिक्क्यांचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक लाभासाठी उपयोग करुन निरपराध व्यक्तीवर कायदेशीर व न्यायालयीन कारवाई करण्यास...

मा.नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी माणुसकी जपली ! ११०० गरजू विद्यार्थ्यांना भेट दिल्या सायकली !! दानशूरपणाचे सर्वत्र कौतुक !!

इमेज
महाराज्य टाईम्स(प्रभाकर बावधनकर):  मोहोळ शहराचे प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान मिळालेले रमेश बारसकर यांनी वैयक्तिक खर्चातुन ११०० गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटून आपल्या दानशूरपणा व माणुसकी आपल्या कार्यातून दाखवून दिली आहे त्यामुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यात त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.      मोहोळकरांच्या मनात घर करून राहिलेले आपुलकीचे नाव म्हणजे प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारसकर कोणताही राजकीय वारसा नसताना, आपल्या कष्टावर, जिद्दीवर आणि प्रामाणिकपणावर उभा राहिलेला हा नेता आज प्रत्येकाच्या मनात आपुलकीने स्थान मिळवून आहे.       शहरातील हजारो गरजू बांधवांना स्वतःच्या खर्चाने विविध प्रकारे मदत व सहकार्याच्या माध्यमातून समाजकार्य करणारा  हा दानशूर, दरियादिल माणूस म्हणजे रमेशजी बारस्कर अनेक कुटुंबांसाठी खरा आधार आहे अशी भावना नागरिकांच्या मनात दिसून येते. त्यांच्या या माणुसकीच्या कार्यामुळे अनेकांच्या आयुष्यात आनंद आणि स्थैर्य निर्माण झाले आहे. शहरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वखर्चाने ११०० सायकलींचे वाटप करून अनेक गरजवंत वि...

आज श्री स्वामी समर्थ महाराज प्रगटदिन सोहळा मठांमध्ये भक्तिपुर्ण वातावरणात होतोय साजरा !!

इमेज
बारामती: (महाराज्य टाईम्स)     आज श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगटदिन आहे. त्यानिमित्त बारामती शहरात अनेक ठिकाणी अत्यंत भक्तिमय व धार्मिक वातावरणात साजरा होत आहे.      श्री स्वामी समर्थ  अर्थात  अक्कलकोट स्वामी   (प्रकटकाल   : इ.स. १८५६-१८७८) २२ वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले अक्कलकोट जि.सोलापूर येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. "मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.     इ.स.१८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटला आले. मंगळवेढ्याहुन पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंद...

पहिली अमरावती मग बारामती? नगरपालिका शास्तीकर दंड ५०% सुट देण्यास नगरविकास खात्याच्या आदेशानंतर सुरुवात

इमेज
बारामती (महाराज्य टाईम्स): अमरावती जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील रहिवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. थकीत मालमत्ता करावर आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत ५० टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. परंतू बारामतीत मार्च महिन्यातील १८ दिवस होऊनही नागरिकांना दंडाच्या रकमेतुन सुट देण्याची मानसिकता मुख्याधिकारी यांना नसल्याचे दिसून आले.       शास्तिकर दंडामध्ये सुट मिळण्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम तारीख असून, या कालावधीत कर भरणा करणाऱ्यांना थकीत कराची निम्मीच रक्कम भरून करमुक्त होता येणार आहे. अशा प्रकारची सूट देणारा अमरावती हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा ठरला आहे.       यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महसुलात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, संबंधित शहरातील नागरिकांनाही करमुक्त झाल्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. थकबाकीदार असल्यामुळे अनेक नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेताना अडचणी येत होत्या, ज्याचा अनुभव त्यांना अलीकडील सार्वत्रिक निवडणुकीतही आला होता.     अमरावतीमध्ये नवन...

बौद्ध बांधवांकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी: सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण

इमेज
बारामतीत सामाजिक सलोख्याचा संदेश; बौद्ध बांधवांकडून मुस्लिम बांधवांसाठी  इफ्तार पार्टी बारामती (महाराज्य टाईम्स):    येथील मानव एकता युवक संघटना,शेरसुहास मित्र मंडळ आणि भारतदादा अहिवळे युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधत सालाबाद प्रमाणे याही वर्षी मुस्लिम बांधवांसाठी आमराई परिसरातील महात्मा फुले नगर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या इफ्तार पार्टीला मुस्लिम बांधवांसह मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड यांसारख्या विविध सामाजिक संघटन व पक्षातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सध्या देशात आणि राज्यात सामाजिक ऐक्याला बाधा येईल असे वातावरण काही शक्तींकडून जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे.आशा देशविघातक शक्तींना रोखण्यासाठी व सर्व जातीधर्मातील सामाजिक एकोपा आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून आपण या इफ्तार पार्टीचे आयोजन करत असल्याचे आयोजक ॲड.सुशील अहिवळे आणि शुभम अहिवळे यांनी सांगितले. याप्रसंगी,माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे,माजी नगराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर,माजी नगरसेवक आसिफ अली खान...

बारामतीकरांचा श्वास बनल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार : अजितदादांप्रमाणेच भरला जनता दरबार !!

इमेज
महाराज्य टाईम्स: (बारामती)  महिलांसह नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ निर्णय; नागरिकांच्या समस्या ऐकून अधिकाऱ्यांना आदेश. अजित पवारांप्रमाणेच जनता दरबार.          उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी बारामतीतील 'सहयोग' या निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन केले होते. अजित पवार यांच्या कार्यपद्धतीप्रमाणेच नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवार यांनी केला. या दरबारात नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून घेण्यात आल्या आणि अनेक प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. विशेषतः महिलांच्या समस्या आणि 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेशी संबंधित अडचणी सोडवण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.        सकाळी पावणे नऊ वाजल्यापासूनच सहयोग सोसायटी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. बारामती तालुक्यातील विविध गावांमधून अनेक नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी आले होते. यामध्ये महिलांची संख्या विशेषतः जास्त होती. 'लाडकी बहीण...

बारामतीकरांना ११ व १२ मार्च रोजी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पादुका दर्शनाचा होणार लाभ !!

इमेज
बारामती: (महाराज्य टाईम्स)  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट यांच्या वतीने महाराष्ट्र पादुका परिक्रमा अंतर्गत महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुकांच्या पालखीचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार बारामती येथे श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी 5 वाजतां आगमन व स्वागत बारामती शहरात होणार आहे.       सद‍्गुरू श्री स्वामी समर्थ पादुका पालखी उत्सव समिती यांच्या वतीने अक्‍कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका पालखी उत्सवाचे आयोजन बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वां. पालखीचे आगमन बारामती शहरात होणार आहे. पालखीचा मुक्‍काम चिराग गार्डन, रेल्वे स्टेशन समोर भिगवण रोड,बारामती येथे होणार आहे.       सायंकाळी 7 ते 7.30 वाजता महाआरती व नामस्मरणाचा कार्यक्रम, महाआरती नंतर सर्व भाविक भक्‍तांना दर्शन व प्रसादाचे वाटपाचे आयोजन रात्री 11 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. सायंकाळी. ७ ते १० वाजेपर्जंत जय गिरिनारी दत्तपंथी सोंगी भजनी मंडळ, वलझलवाडी, ता.खंडाळा यांच्...

शेतकर्यांना २ लाखापर्यंत कर्जमाफी! ! मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा !!

इमेज
बारामती (महाराज्य टाईम्स): अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर केली आहे. या योजनेनुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी राबावण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी समिती गठित केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नियमित कर्ज परतफेड केली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबतच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसितील निकषानुसार...

व्हाटसअप व्हिडिओ काॅल करुन वृध्द महिलेची ४५ लाखांची आर्थिक फसवणुक !!

इमेज
बारामती: (महाराज्य टाईम्स)  शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 83/2026 भा.न्या.सं. कलम 318(4), 319 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(C) अन्वये सायबर फसवणुकीचा (Digital Arrest Scam) गंभीर प्रकार उघडकीस आला असून नागरिकांनी याबाबत विशेष सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी शकुंतला उद्धव खर्डे, वय 74 वर्षे, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती, जि. पुणे यांना दिनांक 14/02/2026 ते 27/02/2026 या कालावधीत मोबाईल क्रमांकावरून एका अनोळखी इसमाने WhatsApp द्वारे व्हिडिओ कॉल केला. सदर इसमाने स्वतःला “संदीप पाटील” नावाचा पोलीस अधिकारी असल्याचे खोटे सांगून पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल करून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट असल्याचे सांगून त्यांना “डिजिटल अरेस्ट” होईल अशी भीती दाखवण्यात आली. सदर इसमाने भीती व मानसिक दबाव निर्माण करून फिर्यादी यांना त्यांच्या बँकेतील Fixed Deposit (एफ.डी.) तोडण्यास भाग पाडले व वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे वर्ग करण्यास सांगितले. त्या अनुषंगाने फिर्यादी यांनी आरोपीच्या सांगण्यावरून ₹34,60,000/- व ₹11,00,...

चोरट्यांनी केली लूट..तालुका पोलिस कशी देतील सुट !! मुद्देमालासह मुसक्या आवळल्या !!

इमेज
          बारामती तालुका पोलिसांची कारवाई.. बारामतीत प्रेमी युगलाला कोयत्याने मारहाण करून  लुटणाऱ्या तिघांना अटक.. (३ लाख २४ हजारांची लूट; एलसी कंपनी लेक परिसरातील घटना; संपूर्ण मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक) बारामती दि.४(महाराज्य टाईम्स)         बारामतीतील तांदुळवाडी येथे एलसी कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने वार करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.        दि.२६ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक येथील मोकळ्या जागेत फिर्यादी संतोष रायनवार (बदलेले नाव)  (मूळ राहणार नागपूर वय २६, हल्ली बारामती) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत बसले होते. त्यावेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधलेल्या तिघा इसमांनी त्यांच्या जवळ येत लोखंडी सत्तूर,कोयत्याचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. विरोध केल्यावर एका आरोपीने फिर्यादीच्या डाव्या पायावर वार करून ज...

पोलिस नाकाबंदीचा धाक – गुन्हेगारांची झाली दमछाक !! 470 किलो गांजा टाकून आरोपी फरार !!

इमेज
बारामती:( महाराज्य टाईम्स)   रोजी पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री सुदर्शन राठोड यांच्या नियंत्रणाखाली बारामती विभागात राबविण्यात आलेल्या नाकाबंदी, रात्रगस्त, वाहन तपासणी व कागदपत्र पडताळणी मोहिमेमुळे एक मोठी कारवाई यशस्वीरीत्या उघडकीस आली आहे. सदर विशेष मोहिमेदरम्यान संशयित गुन्हेगारांवर कडक नजर ठेवण्यात आली होती. पोलीस यंत्रणेच्या सततच्या दबावामुळे व प्रभावी नाकाबंदीमुळे अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात वाहतूक करणारे आरोपी घाबरून गेले व त्यांनी मौजे जळोची, पिंपळी रोड परिसरातील शेताच्या मोकळ्या रानात गांजाचे दोन मोठे ड्रम टाकून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता, सदर ड्रममध्ये एकूण सुमारे 2 कोटी 35 लाख रुपये किंमतीचा एकूण 470 किलो गांजा आढळून आला. ही कारवाई बारामती विभागातील अंमली पदार्थ विरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. प्राथमिक तपासातून असे निष्पन्न होत आहे की, होळी सणाच्या पार्श्वभूमीवर विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प...