पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा हजारो भाविक घेत आहेत सिध्देश्वर मंदिरात लाभ !!

इमेज
महाराज्य टाईम्स:   बारामती शहरात अनेक वर्षांनंतर श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन श्री सिध्देश्वर मंदिर देवस्थानचे विश्वस्त श्री.समीरजी दाते आणि श्री सिद्धेश्वर कीर्तन महोत्सव समिती यांच्या वतीने अत्यंत मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. रविवार ७ जुन ते १४ जुन २०२६ पर्यंत कथेचे प्रवचन रोज संध्याकाळी ६ ते ९ पर्यंत होणार आहे. त्यानंतर भक्तांना रोज महाप्रसादाचा लाभ सुद्धा मिळणार आहे.    बारामतीमध्ये अनेक वर्षांपासून श्रीमद् भागवत कथा सप्ताह चे आयोजन झालेले दिसून आले नव्हते. भागवत कथेमध्ये शिव-पार्वती व विष्णू अवतार कार्य व पुराणातील विविध धार्मिक कथांचे विष्लेषण प्रवचण केले जाते. अनेक पौराणिक कथा व त्याचे संदर्भ दाखले देऊन वर्तमानातील व भविष्यातील आपल्या आयुष्याची सांगड कशी घालायची व आपले जीवनमान कसे अध्यात्मिक व संस्कारमय करायचे ह्यचे निरूपण केले जाते. श्रीमद् भागवत कथा प्रवचण भागवताचार्य ह.भ.प.मनोहरमहाराज सायखेडे यांच्या पवित्र मधुर वाणीतून संगितमय पद्धतीने सादर केले जात आहे. कथा प्रवक्ते सायखेडे महाराज हे ज्ञानदाईनी गुरुकुल बेलगाव कुहे जि नाशिक येथील प्रसिध्द क...