बारामतीत स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद..!
एकूण १,४५६ रक्तदात्यांचे रक्तदान; समाजसेवेच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.. महाराज्य टाईम्स दि. १९ : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शारदा प्रांगण व विद्या प्रतिष्ठान या दोन केंद्रांवर पार पडलेल्या या शिबिरात तब्बल १,४५६ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपली. यामध्ये विद्या प्रतिष्ठान येथे २१७ तर शारदा प्रांगण येथे १,२३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिर दरम्यान राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, युवा नेते जय पवार यांनी भेट दिली. शिबिराच्या प्रारंभापासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. प्रथमच रक्तदान करणाऱ्...