पोस्ट्स

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीमंत आबा गणपती मंडळाने निवडणूक हातात घेतली !! आणि जिंकून दाखवली! ! दिपाली गायकवाड यांचा पाठिंबा निर्णायक !!

इमेज
महाराज्य टाईम्स: (दि.२४)      बारामती नगर परिषद निवडणूक २०२५ अत्यंत लक्षवेधी ठरली ती अपक्षांच्या व सर्व राजकिय पक्षाच्या सहभागाने त्यामुळे उमेदवार संख्या वाढली व चुरस पण वाढली. परंतू प्रभाग क्र.१६ मध्ये अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया हातात घेतली आणि जिंकुनच दाखवली.      प्रभाग क्र. १६ मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून महिला उमेदवार सौ. मंगल जगताप उमेदवार होत्या तर पुरूषांमध्ये श्री गोरख पारसे उमेदवार होते. सौ.मंगल जगताप यांचा मुलगा वैभव जगताप हे आबा गणपती मंडळाचे माजी अध्यक्ष होते. त्यांचे अनेक वर्षांपासून मंडळाच्या विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात उत्तम सहभाग होता. त्यांच्या अध्यक्ष पदाच्या काळात त्यांनी मंडळात उत्तम काम तनमनधनाने केल्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल एक जवळिक मैत्री आहे. त्यामुळेच खर्या अर्थाने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अंग झटकून पूर्णवेळ देऊन निवडणूक हातात घेतली म्हणावी लागेल.      उमेदवारीचा फाॅर्म भरण्यापासुन नियोजनबद्ध प्रचार, गाठीभेटी व प्रत्येक मतदारांशी प्रत्...

निलेशआप्पा इंगुलेंनी केला गनिमी कावा ! मतदार म्हणाले हाच नेता हवा !!

इमेज
महाराज्य टाईम्स:(दि.२२)       बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अत्यंत लक्षवेधी व चुरशीची ठरली. काही राजकीय मंडळीचा भ्रम होता एकहाती सत्ता येणार पण अपक्षांची ताकद वाढली जनतेने चिन्हापेक्षा व्यक्तीला जास्त महत्व दिले याची ६ उदाहरणे बारामतीकरांनी बघितली.      बारामतीतील सर्वात मोठा समजला जाणारा प्रभाग क्र. २० मध्ये जवळपास ७४०० मतदान होते. तसा मोठा असला तरी इंगुलेंचा परिचयाचा होता व्यवसायाच्या रुपाने आणि लहानपणीच्या ओळखीमुळे त्यामुळे आव्हान स्वीकारून त्यांनी कामाला लागले. पण अपक्ष निवडणूक लढवणे येवढे काही सोप्पे नव्हते कारण लढाई हि स्वकियांशी होती म्हणजे एकाच समाजातील नातेवाईकांशी होती तसेच ज्या पक्षाने राजकिय ओळख दिली त्या पक्षाच्या कार्यकर्ते व नेत्यांच्या विरोधात दंड थोपठावे लागले.      समोर सर्वच बाबतीत मोठी ताकद शक्ती राष्ट्रवादी पक्षाची होती. पण निलेश इंगुलेंनी अत्यंत गांभिर्याने विचारपुर्वक रणनिती आखली व मतदारांशी वैयक्तिक भेटी गाठीवर भर दिला. आणि गनिमीकावा कसा करायचा व यश कसे मिळवायचे ह्याचे नियोजन ४-५ जण सहकारी यांनी...

निवडणूक अधिकार्यांच्या मनमानीमुळे मतदारराजाचा मतदानाचा हक्क हिरावला ?

इमेज
महाराज्य टाईम्स:दि.२०  बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया संपत आली आहे. काही ठिकाणी वेळेत मतदान पडले असुन काही ठिकाणी उशीरापर्यंत मतदानाची प्रक्रिया चालु होती अशी माहिती आहे.       प्रभाग १६ व प्रभाग १० चे मतदान कदम चौक जवळ देशमुख सभागृह येथे पार पडले. परंतू निवडणूक बुथ प्रमुख कर्मचारी व अधिकारी यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल मतदारांमध्ये नाराजी व आक्षेप दिसून आला.        तब्बल ९ वर्षांनंतर नगर पालिकांची निवडणूक असल्यामुळे प्रामुख्याने तरुणांंमध्ये मतदान करण्याचा उत्साह जास्त दिसून आला. अत्यंत उत्स्फूर्तपणे सर्व मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला. प्रभाग १६ चे मतदान देशमुख सभागृह येथे रांगेमध्ये उभे राहून मतदारांनी मतदान बुथ कर्मचार्यांना मोबाईल मधील डिजिलाॅकर किंवा ओळखपत्राचे फोटो दाखवले परंतू त्यांनी ते ग्राह्य न धरल्यामुळे अनेक मतदारांची ओळखपत्र आणुन मतदान वेळेत केले.         परंतू मतदान केंद्र क्र.६ येथे मतदार सर्वात शेवट दरवाजात उभा राहून कर्मचार्यांना विणवणी करत होता कि, मला मतदान करू...

प्रभाग १६ मध्ये सौ.मंगल जगताप यांना मिळतोय मतदारांचा चांगला प्रतिसाद !! निवडणुक ठरतेय चुरशीची

इमेज
महाराज्य टाईम्स: दि.१९       बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक उमेदवारांचा कस पणाला लागणार आहे असे सध्या चित्र आहे. प्रभाग १६ मध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार सौ.मंगल जगताप यांचे कुटुंब तब्बल ५५ वर्षांपासून प्रभागातील नागरिकांशी चांगली ओळख व संपर्क असल्यामुळे मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.       काही ठिकाणी जरी राजकिय पक्षांनी उमेदवारी दिली असली तरी काही कट्टर एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी पक्षासाठी प्रचंड मेहनत घेतली पण त्यांना डावलण्यात आले अशा ठिकाणी त्याच पक्षाच्या उमेदवारांनी अपक्षपणे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची ठरत आहे. सत्ताधारी पक्षाने जरी उमेदवारी दिली तरी मतदारांच्या मनात उमेदवार योग्य वाटत नसेल तर तिथं उमेदवाराला अपयश पदरात पडू शकते अशी परिस्थिती काही ठिकणी दिसून येते. मात्र जगताप कुटुंबाचा प्रभागातील जनसंपर्क असल्यामुळे तसेच पक्षाची ताकद कार्यकर्त्यांची साथ यामुळे सौ.मंगल जगताप यांचे पारडे जड असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे.     ...

शहर वाहतुक पोलिसांची धडाकेबाज कारवाई ! ! १११ बुलेट सायलेंसरवर फिरवला रोडरोलर

इमेज
महाराज्य टाईम्स:१६ डिसेंबर      बारामती शहरात बुलेट मोटर सायकल चे फटाका आवाजाचे सायलेंसर बसवून शहरात फटक्यासारखा आवाज करत फिरण्याची जणू फॅशनच झाली होती. त्याचा सामान्य नागरिकांना नेहमीच त्रास होत होता.  अशा बुलेट मोटर सायकल वर कारवाई करण्याबाबत बारामती वाहतूक शाखेकडे नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. सदर तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन बारामती वाहतूक शाखेकडून बुलेट मोटर सायकल कारवाई ची विशेष मोहीम बारामती शहरात विविध ठिकाणी राबवण्यात आली.  सदर मोहिमेमध्ये फटाका आवाज करणारे, बुलेट मोटर सायकलचे एकूण 111 सायलेन्सर काढून बारामती वाहतूक शाखेकडे जमा करण्यात आले आहेत.   अवैद्य प्रवासी वाहतूक कारवाई :- 6 ड्रंक अँड ड्राईव्ह :- 5 काळी काच:- 51 फिल्मिंग काढण्यात आले. तसेच खालीलप्रमाणे कलमान्वये कारवाई 1. विना नंबर प्लेट, 2. ट्रिपल सीट, 3. विना लायसन्स, 4. फॅन्सी नंबर प्लेट, 5. विना इन्शुरन्स,  6. मोबाईल संभाषण  7. काळी काच 8. नो पार्किंग 9. नो एंट्री  अशा एकूण कारवाई 05/11/2025 ते 16/12/2025 रोजीपर्यंतच्या कालावधीत एकूण 2141 केसे...

बारामती शहरात निर्घुण खुन !! मित्रांनीच केला दगडाने ठेचुन खुन !!

इमेज
महाराज्य टाईम्स:(बारामती) दारूच्या नशेत पूर्व वैमनस्यचा राग डोक्यात ठेऊन तिघा मित्रांमध्ये शिविगाळ वादावादी होवून दोघांनी एकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बारामती शहरात घडली आहे. आपल्या हातून मित्राचा खून झाल्याचं लक्षात आल्यानंतर या दोघांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात जाऊन केलेल्या कृत्याची कबुली दिली. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे. अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय २०, रा. मळद, बारामती) असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी समीर इक्बाल शेख (वय २५, रा. देवळे इस्टेट. बारामती) व प्रथमेश राजेंद्र दळवी (वय २०, रा. जगतापमळा, खंडोबानगर,बारामती) या दोघांना अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अविनाश लोंढे आणि दोघे आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. काल रात्री ते शहरातील जुन्या मोरगाव रस्त्यावरील वेताळबाबा मैदानात दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. त्यांचा वाद इतका टोकापर्यंत गेला की समीर आणि प्रथमेश या दोघांनी अविनाशच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर दोघांनीही त्याला दगडाने ठेच...

तालुका पोलिसांची सुपरफास्ट कारवाई! ! लाखों रुपये लुटलेले दोन गुन्हेगार जेरबंद

इमेज
५ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त; तालुका पोलिसांची कारवाई बारामती, दि.१० (महाराज्य टाईम्स)      बारामती एमआयडीसी परिसरात चाकूचा धाक दाखवून स्कुटीस्वारास लुटणाऱ्या दोन अज्ञात आरोपींचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश करून त्यांना जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल ५ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.        फिर्यादी स्कुटीवरून जात असताना वंजारवाडी ब्रिजजवळ लिंबाच्या झाडाशेजारी मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी त्यांची गाडी आडवी मारून धारदार शस्त्राने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडील ३८ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या आणि ३ ग्रॅम सोन्याची अंगठी हिसकावून आरोपी पळून गेले. तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.गुप्त माहितीच्या आधारे चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत चैतन्य राजेंद्र केकान आणि धीरज हरिश्चंद्र पवार राहणार बारामती हेच या लुटीचे आरोपी असल्याचे निष्पन्न केले. त्यांना ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्यातील दागिने तसेच दागि...

शहर पोलिसांची बुलेट व इतर बेशिस्त वाहनांवर धडक कारवाई

इमेज
महाराज्य टाईम्स दि.६ बारामती शहरात बुलेट मोटर सायकल चे फटाका आवाजाचे सायलेंसर बसवून शहरात फटक्यासारखा आवाज करत फिरण्याची जणू फॅशनच झाली होती. त्याचा सामान्य नागरिकांना नेहमीच त्रास होत होता. अशा बुलेट मोटर सायकल वर कारवाई करण्याबाबत बारामती वाहतूक शाखेकडे नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. सदर तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन          आज दिनांक 06/12/2025  रोजी  बारामती वाहतूक शाखेकडून बुलेट मोटर सायकल कारवाई ची विशेष मोहीम बारामती शहरात कोर्ट कॉर्नर येथे राबवण्यात आली. सदर मोहिमेमध्ये बुलेट मोटर सायकल वर मोटार वाहन कायद्यांतर्गत विविध कलमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच फटाका आवाज करणारे बुलेट मोटर सायकल चे सायलेन्सर काढून जमा करून घेण्यात आले. यामध्ये एकूण 20 सायलेन्सर बारामती वाहतूक शाखेकडे जमा करण्यात आले आहेत.  तसेच इतर 65 कारवाया व 73,000/ रुपयापर्यंत दंड करण्यात आला आहे.        तसेच दरम्यान एक मोटार वाहन कायदा कलम ड्रंक अँड ड्राईव्ह प्रमाणे एक कारवाई करण्यात आलेले आहे.     ...

बारामती एमआयडीसीत ट्रकच्या बॅटरी चोरीची घटना ! बारामती पोलिसांकडून मुद्देमालासह आरोपी अटकेत

इमेज
बारामती दि.०५ (महाराज्य टाईम्स)       बारामती एमआयडीसी परिसरातील कल्याणी ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी कंपनीसमोर उभ्या असलेल्या ट्रकची बॅटरी चोरून लंपास चोरट्याला बारामती तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा उलगडा झाला.       ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारे जनार्धन रघुनाथ रांधवन (वय-३१) यांचा (एम.एच.१४ डी.एम ९१८१) क्रमांकाचा टाटा ११०९ ट्रक हा (दि.२५ रोजी) सकाळी कल्याणी कंपनीसमोर पार्क केला होता. दुसऱ्या दिवशी (दि.२६ रोजी) सकाळी ते ट्रककडे गेले असता ट्रक सुरू होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खाली उतरून पाहणी केली असता बॅटरीची वायरी तुटलेल्या अवस्थेत व बॅटरी गायब असल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ परिसरात शोध घेतला, मात्र बॅटरीचा काहीच मागमूस न मिळाल्याने त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरी गेलेली बॅटरी सुमारे दहा हजार रुपये किमतीची आहे. तक्रार नोंदताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले. सीसीटीव्ही फूटेज, परिसरातील हालचाली आणि मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित शिवम प्...

निवडणुक मतदान २० डिसेंबरलाच !! २१ डिसेंबरला मतमोजणी! ! सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय

इमेज
महाराज्य टाईम्स(बारामती) राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया सुरू असतानाच मतमोजणीला अनपेक्षित अडथळा आला असून, हा प्रश्न आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी पुढे ढकलण्यात आली होती. या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. मुख्य न्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठापुढे प्रकरणी सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मतमोजणी थेट 21 डिसेंबरलाच करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे मतदारांचे लक्ष आता आगामी मतमोजणीकडे लागले असून अनेक शहरांतील सत्तांतराविषयीची उत्सुकता वाढली आहे. न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे निवडणूक प्रक्रियेतील अनिश्चितता काही काळ वाढल्याचे चित्र आहे. मात्र आता अंतिम मतमोजणी दिनांक निश्चित झाल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. न्यायालयाने मतदानानंतर होणाऱ्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकालही 20 डिसेंबर रोजी मतदान संपल्यानंतर पुढील अर्धा तास होईपर...