मोहोळची तनुजा बारसकरची घोडदौड; " खेलो इंडिया युथ गेम्स साठी निवड"
पोखरापूर दि.२४ (प्रभाकर बावधनकर) भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या" खेलो इंडिया "युथ गेम्स" स्पर्धेसाठी मोहोळ येथील क्रांतिवीर भगतसिंग स्पोर्ट्स अकँडमीची विद्यार्थीनी कु. तनुजा बारसकर हिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धा दि. ११ ते १३ मे २०२५ दरम्यान बोधगया, बिहार येथे आयोजित केल्या आहेत. त्यासाठी तत्पूर्वी महाराष्ट्राच्या टीमसमवेत अधिकचा सराव बालेवाडी, पुणे येथे होणार आहे. तनुजा नितीन बारसकर ही सध्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून, मोहोळ येथील क्रांतिवीर भगतसिंग स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये प्रशिक्षक दशरथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेत आहे. तनुजाची मार्शल आर्ट्सबाबतची असलेली आवड, निष्ठा, जिद्द, चिकाटी, मेहनत यामुळे तिचा सराव उत्तम रीतीने घेण्यात आला आहे अशी माहिती मार्शल आर्ट्स प्रशिक्षक दशरथ काळे यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी जिंकणारच असा ठाम निर्धार बाळगून तिने सातत्याने कसून सराव करीत आहे. तिची तळमळ पाहून प्रशिक्षक त्याच पद्धत...