पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्राच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री म्हणुन सुनेत्रा अजित पवार यांचा आज सं. ५ वां. शपथविधी

इमेज
बारामती:(महाराज्य टाईम्स) स्व.अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होतील. शनिवारी दुपारी 2 वाजता त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाली. सायंकाळी 5 वाजता त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. सुनेत्रा पवार यांची पक्षनेते म्हणून निवड करण्यासाठी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष आणि विधानपरिषद सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. तिथे दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा यांनी राज्यसभेतील खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले आहे.      सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यामुळे महिला वर्गाचा देखील येत्या काळात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री पदावर महिला चेहरा असणे एवढे देखी...

अजितदादा अनंतात विलीन: बारामतीत प्रत्येक घरात दु:खाचे सावट! उद्या शोक सभा

इमेज
बारामती:(महाराज्य टाईम्स) भल्या पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत जनसामान्यांच्या कामात स्वतःला वाहून घेणारे अजित पवार आज बारामतीच्या मातीत चिरनिद्रेत विसावले. त्यांच्या पार्थिवावर काल बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ व जय पवार या त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी 'अजित पवार अमर रहे', 'अजितदादा परत या' 'एकच वादा अजितदादा' या अशा विविध आर्त घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. योगायोगाने अजितदादा अनंतात विलीन म्हणताना त्यांचे वडिलांचे नाव सुद्धा अनंत च होते. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी एका विमान अपघातात अकाली निधन झाले. ते मुंबईहून बारामती येथे प्रचारासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी येत होते. पण धावपट्टीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर त्यांचे विमान कोसळले आणि महाराष्ट्राचा एक कर्तबगार राजकारणी जागेवरच काळाच्या पडद्याआड गेला. अजित पवारांसह 5 जणांच...

श्रीमंत बाबूजी नाईक मित्र मंडळामध्ये साजरा झाला भव्य दिव्य गणेशजन्म सोहळा! !

इमेज
बारामती : (महाराज्य टाईम्स्) माघ महिन्यात श्री गणेश जन्म संपुर्ण भारतात श्री गणेश मंदिरांमध्ये खुप भक्ती भावाने साजरा केला जातो. त्याप्रमाणेच बारामती शहरात सुद्धा अनेक मंदिरांमध्ये व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने अत्यंत धार्मिक वातावरणात भक्तीभावे गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे.    आज माघ शुद्ध प्रतिपदा. माघ मासाची सुरुवात आणि गणेश जन्माची चाहूल. वास्तविक पाहता गणपतीच्या अनेक अवतारांपैकी आपण  *श्रीमहोत्कट विनायक*  अवताराचा जन्म माघात साजरा करतो. माघ मासाच्या शुद्ध चतुर्थी तिथीस 'श्री महोत्कट विनायक' नावाने  आदिती आणि कश्यप ऋषींच्या आश्रमी माध्यान्ही अवतार घेतला. मत्सरासुर पुत्र देवांतक आणि नरांतक या असूर बंधूंच्या वधासाठी आणि भक्तकल्याणासाठी हा अवतार झाला.     बारामती शहरातील सिद्धेश्वर मंदिराजवळ श्रीमंत बाबूजी नाईक मित्र मंडळ यांंच्या वतीने गणेश जयंती उत्सव गुरुवार २२ जानेवारी रोजी अत्यंत मनोभावे धार्मिक व उल्हासपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजतां शेकडो भक्तगण व मंडळाचे कार्यकर्ते आरती सोहळ्यासाठी आवर्जुन उपस्थित हो...

राष्ट्रवादी काँग्रेस बारामती शहर अध्यक्षपदी किरण इंगळे यांच्या निवडीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला शिक्कामोर्तब

इमेज
बारामती (महाराज्य टाईम्स): राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष बारामती शहर अध्यक्षपदी किरण किसनराव इंगळे यांच्या नावाला राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी पहिली पसंती देत शिक्कामोर्तब केले. किरण इंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांची आई कै. बायडाबाई इंगळे यांनी बारामती नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक पद तब्बल १५ वर्षे  भूषविले होते. मोठे बंधू शाम इंगळे हे माजी नगरसेवक २०१६ पर्यंत होते. त्यांव्या मितभाषी स्वभावामुळे बारामती नगरपरिषदेत आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. इंगळे कुटुंब सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करीत आलेले आहेत. इंगळे कुटुंबाचे बारामतीतील व्यापारी वर्गाशी विश्वासार्हता आहे. त्यामुळे इंगळे कुटुंबाची व्यापारी वर्गात वेगळी प्रतिमा आहे. पवार साहेबांच्या राजकारणापासून हे कुटुंब पवारांशी एकनिष्ठ आहेत. पवार कुटुंबाचा विश्वासही तेवढा इंगळे कुटुंबावर आहे. किरण इंगळे यांना हुशार, अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी अत्यंत क्रियाशीलपणे भुषविले ...

हळदी-कुंकू व मराठी भाषा संवर्धनाचा अनोखा संगम !! मोहोळमध्ये संस्कृतीचा उत्सव! !

इमेज
मोहोळ, दि.२४ (महाराज्य टाईम्स) : मोहोळ येथील व्यापारी मोफत वाचनालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मोहोळ तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हळदी-कुंकू व मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला. महिलांचा सन्मान, पारंपरिक मूल्ये आणि मातृभाषेप्रती असलेली निष्ठा यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.      या कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास, व्यापारी मोफत वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. सुधीर जोशी, नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे, नगरसेविका साखराबाई बरकडे, क्षमा बारसकर, राजन घाडगे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ज्योत्सना जोशी, दत्तात्रय कुलकर्णी, गौतम क्षीरसागर, शहाजहान बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.    कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत राजन घाडगे यांनी हळदी-कुंकूच्या परंपरेचे महत्त्व अत्यंत भावपूर्ण शब्दांत विशद केले. “हळदी-कुंकू हा केवळ धार्मिक विधी नसून तो आपल्या संस्कृतीचा, स्त्रीशक्तीचा आणि आपुलकीच्या...

श्री गणेश जन्मोत्सव सोहळा निमित्त दाते श्री गणपती मंदिरात आज पासुन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

इमेज
बारामती : (महाराज्य टाईम्स्) माघ महिन्यात श्री गणेश जन्म संपुर्ण भारतात श्री गणेश मंदिरांमध्ये खुप भक्तीभावाने साजरा केला जातो. त्याप्रमाणेच बारामती शहरात अत्यंत पुरातन असे श्री दाते यांचे जागृत श्री सिद्धीविनायक श्री गणपती मंदिर आहे. अनेक वर्षांपासून येथे गणेश जन्मोत्सवाचे आयोजन केले जाते.    आज माघ शुद्ध प्रतिपदा. माघ मासाची सुरुवात आणि गणेश जन्माची चाहूल. वास्तविक पाहता गणपतीच्या अनेक अवतारांपैकी आपण *श्रीमहोत्कट विनायक* अवताराचा जन्म माघात साजरा करतो. माघ मासाच्या शुद्ध चतुर्थी तिथीस 'श्री महोत्कट विनायक' नावाने  आदिती आणि कश्यप ऋषींच्या आश्रमी माध्यान्ही अवतार घेतला. मत्सरासुर पुत्र देवांतक आणि नरांतक या असूर बंधूंच्या वधासाठी आणि भक्तकल्याणासाठी हा अवतार झाला.      गाणपत्य सांप्रदायात प्रतिपदेपासून जन्मोत्सव सुरु होतो. प्रतिपदेपासून मंत्रोच्चारणपूर्वक अभिषेक आणि विविध सहस्त्रार्चने, पोशाख, महानैवेद्य अशा नानाप्रकारे मोरयाची सेवा चालते. चतुर्थीस माध्यान्ही जन्मकाळ होऊन पंचमीस जन्मोत्सवाची सांगता होते.       सालाबाद प्रमाणे य...

कार्यकाळ संपल्याने राष्ट्रवादी शहराध्यक्ष जय पाटील यांचा राजीनामा

इमेज
महाराज्य टाईम्स:दि.१५ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती शहराध्यक्ष जय पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांच्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. कार्यकाळ संपल्याने व नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आपण शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे जय पाटील यांनी स्पष्ट केले.      शहराध्यक्ष पदाची धुरा हातात येताच जय पाटील यांनी  शहरात कामाचा झंजावात सुरू ठेवला होता. पक्ष संघटन वाढीसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी कामाच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. युवकांचे संघटन मजबूत करत पक्षाला बळ देण्याचे काम त्यांनी त्यावेळी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिरांचे आयोजन करून हजारो बाटल्या रक्त संकलित करण्याचे काम केले. यामुळे शहरातील युवक आरोग्य सेवेसी जोडला गेला.       रक्तदान शिबिराबरोबरच शहरात आरोग्य शिबिरे घेतली त्याला बारामतीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. पाटील शहराध्यक्ष झाल्यानंतर  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत त्...

बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांचा राजीनामा व्यवस्थापन मंडळ सदस्यपदी ओंकार देवळे

इमेज
महाराज्य टाईम्स: दि.१५  बारामती सहकारी बँकेच्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेचे अध्यक्ष श्री. सचिन सदाशिव सातव यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. या बैठकीदरम्यान श्री. सातव यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बँकेच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याबद्दल संचालक मंडळाने त्यांचे आभार मानले व पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.          तसेच बँकेच्या व्यवस्थापन मंडळामध्ये रिक्त झालेल्या जागेवर श्री. ओंकार किशोर देवळे यांची व्यवस्थापन मंडळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली. दि बारामती सहकारी बँकेच्या आजअखेर ठेवी प्रमाण रू. २२४७ कोटी, कर्जवाटप रू. १३८२ कोटी व गुंतवणूक रू. १००९ कोटी तर बँकेचा निव्वळ एन.पी.ए. १.४६% व भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) १६.१९% अशी बँकेने प्रगती केलेली आहे. बँकेच्या पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, नाशिक व रायगड या सहा जिल्हयांत ३६ शाखा व १ विस्तारित कक्ष कार्यरत आहे. या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री. सचिन सातव, उपाध्यक्षा सौ. नुपूर शहा (वडूजकर), तज्ञ संचालक श्री. प्रितम पहाडे (सी.ए.), अॅड. श्री. शिरीष ...

12 जिल्हा परिषद 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहिर: 5 फेब्रु. मतदान, तर 7 फेब्रु. रोजी मतमोजणी

इमेज
महाराज्य टाईम्स: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731, तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. वाघमारे यांनी सांगितले की, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीची सूचना 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध होईल. सूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी आपापल्या स्तरावर पार पाडतील. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू होईल. उमेदवारांना 21 जानेवारीपर्यंत आपली उमेदवारी दाखल करता येईल. खालील तक्त्यात पाहा निवडणुकीचा संपूर्ण कार्...

कामाचा माणूस म्हणून निवडून दिले अपक्ष! ! पण प्रभागात कामांसाठी कधी देणार लक्ष ?

महाराज्य टाईम्स:दि.१३      बारामती सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. ४१ नगरसेवकांनी आपले नशीब अजामावुन यश संपादन केले. ३५ नगरसेवकांना पक्षाची व आर्थिक ताकद पुरविण्यात आली होती. परंतू ६ अपक्ष नगरसेवकांनी स्वतःच्या हिमतीवर व नागरिकांच्या प्रेमावर व पाठिंब्यावर प्रस्थापित सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना चितपट करत विजय मिळवला आहे.     पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना राजकिय वरदहस्ताने व कार्यकर्त्यांच्या सतत प्रचार करण्यामुळे विजय मिळवता आला हे मात्र नक्की खरयं. परंतू अपक्ष उमेदवार हे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात उभे राहिल्यामुळे कार्यकर्त्यांची कमतरता व प्रचार मर्यादित असल्यामुळे विजय मिळेल याची शाश्वती नव्हती. परंतू नागरिकांनी काही प्रभागात कामाचा माणूस म्हणून विश्वास ठेऊन तब्बल ६ अपक्ष निवडून दिले आहेत.     सर्व साधारणपणे नागरिकांच्या मूलभूत गरजा असतात रस्ते, वीज, पाणी व आरोग्यसेवा यासाठी लोकांना प्रतिनिधी हवा असतो तो पण जनतेसाठी काम करणारा व वेळप्रसंगी हाक मारल्यास फोन केल्यास येणारा. परंतू निवडणुकीच्या प्रचारासाठी घरोघरी जाणारे अपक्ष उमेदवार...

संभाजी होळकर यांची राष्ट्रवादी(अप) पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड !!

इमेज
महाराज्य टाईम्स:बारामती        राष्ट्रवादी(अजित पवार) काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांनी नियुक्ती पत्राद्वारे जाहिर केली आहे.       संभाजीनाना होळकर हे बारामती तालुक्यातील होळ गावचे सुपुत्र असुन राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपुर्वी पासून ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक व कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी पार्टीच्या माध्यमातून त्यांनी विविध संस्थांमध्ये अनेक पदे भुषविली आहेत. प्रामुख्याने बारामती तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद, सभापती, सार्वजनिक बांधकाम व आरोग्य समिती जि.प.पुणे, बारामती तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पदांवर उत्तम काम केलेले आहे. तसेच सध्या ते संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक,पुणे या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मृदुभाषी स्वभावामुळे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या सोबत राष्ट्रवादी पक्षाचे काम उत्तमपणे करत आहेत.       त्यांच्या उत्तम जनसंपर्क व कार्यपद्धतीचा विचार करुन महाराष्ट्र ...

माळेगांव-खांडज खूनप्रकरणी संशयित आरोपीस जामीन मंजूर

इमेज
सर्वोच्च न्यायालयातील निवाड्याचा युक्तिवाद ग्राह्य बारामती, दि. ४ (महाराज्य टाईम्स)        माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खांडज गावामध्ये एकाचा गावातील विहिरीमध्ये मृतदेह आढळला होता. याप्रकरणातील संशयित आरोपीस अटक केली होती. याप्रकरणी बारामती न्यायालयात आरोपीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात निवाड्याचा संदर्भ दिल्याने युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला जामीन मंजूर केला. ही घटना (दि.५) मे २०२५ रोजी घडली आहे. खांडजमधील मृतदेह ज्या व्यक्तीचा होता. त्याच्या मुलाने माळेगाव पोलिसांत फिर्यादी दिली होती. प्रथम दर्शनी तपासात मालेगाव पोलिसांनी २ जणांस संशयित म्हणून (दि.८) मे रोजी अटक केली होती. तेव्हापासून दोन्ही आरोपी येरवडा येथील कारागृहात होते. आरोपी अनिल बबन जाधव यांच्यातर्फे बारामती येथील अँड. शुभंकर राजेश बाचल यांनी आरोपीस जामीन मिळण्याकरिता बारामती न्यायालयात (दि.८) डिसेंबर रोजी अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हेतेंद्र वाणी यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी होऊन त्यात आरोपीतर्फे त्याच्या वकिलांनी पुराव्याची अस्पष्टता, परिस्थितीजन्य पु...

कामात विलंब व शासनाचे नुकसान केल्यामुळे ठेकेदार मयूर पानसरे यांना जि.प. ने टाकले काळ्या यादीत

इमेज
महाराज्य टाईम्स: बारामती तालुक्यातील शासनाची विविध विकास योजनांची बांधकामे करणारे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर श्री. मयूर विकास पानसरे रा. शिर्सुफळ, ता. बारामती यांना कामात विलंब व शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.        मयूर पानसरे हे बारामती तालुक्याच्या कार्यक्षेत्रात आणि पुणे जिल्ह्यामध्ये इतरत्र लगतच्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा शासनाची बांधकामे व रोडची कामे ३ ते ४ वर्षापासून करीत होते. बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी तोंडी आल्या होत्या. विलंबाने कामे करणे, कामांच्या मंजुरीच्या ठिकाणी न करता स्थानिक दबाबाला बळी पडुन मनमानीपणा करुन निकृष्ट दर्जाची कामे करत असले बाबतही तोंडी तक्रारी होत्या वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्याशी संगनमत करुन, कामाचे टेंडर मॅनेज करुन इतर दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला कामे मिळु देत नव्हते अशी माहिती माहिति अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे यांनी दिली.       अशातच पुणे जिल्हा परिषद, पुणे बांधकाम विभाग (दक्षिण) यांच्याकडील जनसुविधा या कामाची लेखाशीर्षातर्गत निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्य...

अतिक्रमण विभागाची धडाकेबाज कामगिरी! ! दबावाला न जुमानता काढले फ्लेक्सबोर्ड

इमेज
महाराज्य टाईम्स:(३१ डिसेंबर)      बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक अत्यंत जोरदार पार पडली. निवडून आलेल्या उमेदवारांनी बेकायदेशीर लावलेले फ्लेक्स अतिक्रमण विभागाने दोन दिवस वाट बघून कुणाच्याही दबावाला न जुमानता काढून घेतले त्यामुळे नवनिर्वाचित उमेदवारांच्या रोषाला सामोरे जावे लागले.       तब्बल ९ वर्षांनंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली होती  अनेकांनी आपले नशिब अजमावले. अनेकांना अपयश मिळाले राजकिय वरदहस्त असणार्याना सुद्धा अपक्षांनी आस्मान दाखवले त्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे निवडून आल्यावर आभाराचे मोठमोठे फ्लेक्स बॅनर लावण्याची चढाओढ दिसून आली. प्रत्येक नवनिर्वाचीत उमेदवाराचे कार्यकर्ते, संस्था व पक्ष यांनी शुभेच्छुक म्हणून बॅनर लावण्याचा उत्साह दाखवला खरा पण जिथं आपण नगरसेवक म्हणुन निवडून गेलो आहोत त्या नगरपालिकेची परवानगी घेतली आहे का बोर्ड लावण्याची याचा कोणीही उत्साहाच्या वातावरणात विचार केला नाही.     तरी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने उत्साहावर विरजन नको म्हणून २-४ दिवस वाट बघितली व...