मत्स्यव्यवसाय विभागाची इंद्रायणी नदी काठी संवर्धन होत असलेल्या प्रतिबंधित मागूर संवर्धकावर धडक कार्यवाही
आळदी : दि.१८ जुन मत्स्यव्यवसाय विभागाची इंद्रायणी नदी काठी संवर्धन होत असलेल्या प्रतिबंधित मागूर मासा या पर्यावरणाला व मनुष्याला घातक असलेल्या मागुर मासा संवर्धन करणार्यांवर धडक कार्यवाही मत्सविभागाकडुन मुंबई येथील प्रसिध्द पत्रकार प्रशांत वाघमारे यांच्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे. आळंदी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील कोयाळी तर्फे चाकण येथील इंद्रायणी नदी काठी प्रतिबंधित मागूर / थाई जातीच्या ( _Clarias gariepinus_ ) मासळीचे संवर्धन होत असल्याबाबतची माहिती मुंबई चे पत्रकार श्री प्रशांत वि वाघमारे यानी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, श्रीमती. अर्चना धि. शिंदे मत्स्यव्यवसाय विभाग, पुणे यांना दिली . सदर बाबत सहा. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी , जुन्नर कार्यालयाचे अधिकारी, श्री. किरण मा. वाघमारे यांनी संवर्धन होत असलेल्या जागे बाबत शाहनिशा केली व पुणे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, श्रीमती. अर्चना धि. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 12/06/2024 रोजी राजगुरूनगर तालुक्याचे अधिभारीत अधिकारी श्री. किरण ...