पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जंगलबुक जंगल सफारी देखावा बघण्यासाठी नागरिकांची महात्मा गांधी चौक मंडळ मारवाड पेठ येथे प्रचंड गर्दी

इमेज
बारामती: (महाराज टाईम्स) गणेशोत्सवानिमित्त बारामती शहरात वातावरण अत्यंत भक्तिमय व करमणुकीच्या कार्यक्रमांनी भारावुन गेले आहे. अनेक गणेशोत्सव मंडळांनी भव्य मंडप उभारले आहेत. लाईंटिंगचे देखावे सादर केले आहेत. तर काही मंडळांनी विविध करमणुकीचे कार्यक्रम, आँर्केस्ट्रा, डान्स जल्लोष, गाण्यांचे प्रसिद्ध कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रमाची मेजवाणी जणू काय नागरिकांना देण्यात आली आहे.    बारामती शहरातील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी चौक तरुण मंडळाने तब्बल ३५ वर्षाची परंपरा जपत अखंडपणे विविध विषयावरील, धार्मिक प्रसंगावर आधारित हलते देखावे सादर केलेले आहेत. लाखों रुपये खर्च करुन सजीव वाटणार्या विविध पात्रांच्या मूर्ती तयार करुन आधुनिक पद्धतीने त्यांना हलते बोलते करुन अनेक विषय देखाव्यांच्या माध्यमातून लोकांसमोर एक प्रसंग लोकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न गेल्या ३५ वर्षापासुन अखंडपणे केला जात आहे. सध्या बारामती शहरात एकमेव असे गणेश मंडळ असुन ज्यांनी कुठलाही डिजे, साऊंडच्या भिंती उभा न करता एक पारंपारिक गणेशोत्सव साजरा करत आहेत.     यावर्षी मंडळाने जंगल बुक जंगल सफारी हा देखावा...