नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला
महाराज्य टाईम्स (३० नोव्हेंबर) राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. नामनिर्देशनपत्र रद्द/स्वीकृतीवरील निर्णयाविरोधातील अपिलांचा निकाल उशिरा लागल्याने, तसेच काही प्रकरणांत निकाल न मिळताच निवडणूक चिन्ह वाटप केल्याचे आढळून आल्याने राज्य निवडणूक आयोगाने संबंधित ठिकाणच्या निवडणुका स्थगित करून नवीन कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, छाननी प्रक्रियेत बाद ठरलेल्या किंवा व्यथित झालेल्या उमेदवारांना जिल्हा न्यायालयात अपील करण्याची मुदत होती. नियमानुसार, या अपीलांवरील निकाल 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत लागणे अपेक्षित होते. जेणेकरून, न्यायालयाचा निकाल आल्यानंतर संबंधित उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी (नियम 17 (1) (ब) नुसार) तीन दिवसांचा वैधानिक कालावधी मिळेल आणि त्यानंतर 26 नोव्हेंबरला चिन्ह वाटप करता येईल. मात्र, अनेक ठिकाणी जिल्हा न्यायालयाचे निकाल 23 नोव्हेंबर किंवा त्यानंतर आले. असे असतानाही काही निवडणूक निर...