जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक
बारामती :(आनंद धोंगडे) शनिवार १३ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १२ च्या सुमारास मौजे बारामती येथील जामदार रोड खत्री पवार ईस्टेट प्लॅट नं. १०२ कसबा बारामती येथे राहणारे दामपत्याचा मुले घरातून बाहेर गेल्याचा फायदा घेवून पाळत ठेवून घरात घुसून एका अज्ञात इसमाने त्या नवरा बायकोचा खुन केल्याची माहिती बारामती शहर पोलीस स्टेशनला मिळताच बारामती शहर पोलीस स्टेशन कडील अधिकारी अंमलदार हे घटनास्थळी पोहचले. सदर बाबत मा. श्री पंकज देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण मा. श्री संजय जाधव, अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा. श्री डॉ सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सदर घटनेची माहीती देवून यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व इतर अधिकरी अंमलदार यांनी तपास सुरू करून तापसाची वेगवेगळी पथके तयार करून जलदर गतीने तपास सुरू केला त्यात पोलीसांना सदरचा गुन्हा हा अर्थीक कारणावरून एका इसमाने केलेला असल्याचे गोपनिय माहीती मिळाल्याने आरोपीस ताब्यात घेतले आहे. प्रथम दर्शनी सदरचा गुन्हा हा आर्थीक व्यवहाराचे कारणावरून झाल्याचे समोर आलेले आहे. बारामती शहर...