पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बेकायदा गाईचे मांस व गोवंश जनावरे बाळगणारे लोकांवर पोलिस कारवाई

इमेज
बारामती : (महाराज्य टाईम्स) बारामती शहरात म्हाडा काॅलनी येथे 1200 किलो गोवंश जातीचे मांस तसेच दोन जर्सी गाई व दोन जर्सी वासरे तसेच तीन चार चाकी वाहने असा एकूण 6,42,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सविस्तर घटना पुढील प्रमाणे -   बारामती शहरात राजरोसपणे गाईंची वासरांची कत्तल केली जाते अशी अनेक नागरिकांकडुन माहिती मिळते परंतू पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतरच कारवाई केली जाते. त्यामुळे कत्तल करणारे नराधम निर्ढावलेले आहेत. हेच कत्तल करणारे नराधम हाॅटेलमध्ये सदर गोमांस कमी दराने मटण चिकणच्या तुलनेत विकतात. व हाॅटेल व्यावसायिक जास्त नफा मिळेल या स्वार्थी विचाराने सदर गोमांस घेऊन पदार्थ बनवून गिर्हाईकांची फसवणुक करतात असे नागरिकांकडुन माहिती मिळत आहे. सजग नागरिकांनी अशा हाॅटेल मध्ये जाण्याचे टाळावे हेच आरोग्यासाठी उत्तम ठरेल.       सदर प्रकरणासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती विभाग,बारामती यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार , बारामती शहरातील देवळे इस्टेट येथील माढा कॉलनी येथे काही इसम गोवंश जातीचे मांस व जिवंत जनावरे बेकायदा जवळ ठ...

सुमित कोळपे यांची भारत सरकारचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार एजिस ग्रॅहम बेल पुरस्कारासाठी निवड !!

इमेज
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय स्तरावर गौरव !! २० फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे भव्य सन्मान सोहळा पुरस्कार वितरण सोहळा - २० फेब्रुवारी २०२५, नवी दिल्ली महाराज्य टाईम्स (प्रभाकर बावधनकर) :  एजिस ग्रहम बेल या प्रतिष्ठित पुरस्कारांचे विजेते घोषित करण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील श्री प्रदीप कोळपे यांचे चिरंजीव सुमित कोळपे यांची निवड झाली असून त्यांचा सन्मान २० फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित भव्य सोहळ्यात केला जाणार आहे. या सोहळ्याला देशभरातील वरिष्ठ सरकारी अधिकारी, कॉर्पोरेट नेले आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.      चि. सुमित कोळपे यांची भारतातील सर्वात प्रतिष्ठित माहिती व तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सन्मान – एजिस ग्रॅहम बेल पुरस्कार (AGBA) २०२५ च्या १५व्या आवृत्तीसाठी पुरस्कार प्राप्त होणार असून. त्यांची निवड कृत्रिम बु‌द्धिमत्ता (AI) आणि डेटा सायन्स (Data Science) इनोव्हेशन या श्रेणीमध्ये निवड झाली आहे.      भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय, इ...

लाडक्या बहिणीच्या दारात चारचाकी दिसली की १५०० रू. लाभ बंद होणार !!

इमेज
महाराज्य टाईम्स: ४ फेब्रुवारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. तुमच्या दारात चारचाकी वाहन असेल, तर अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे. पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविकांच्या पडताळणीत कुटुंबीयांच्या नावावर चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न झाल्यास लाभार्थ्यांना अपात्र करण्यात येणार आहे. ही चारचाकी महिलेच्या नावावर नसेल, मात्र कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असेल तरीही त्यांना या योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे. यासाठी आजपासून लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात लोकप्रिय योजनेपैकी एक आहे. या योजनेअतंर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र या अनेक अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जाची पडताळणी सुरु आहे. यासाठी काही निकष लावले जात आहेत. चारचाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेतून...