कॅनाॅल रोडच्या मोठ्या खड्ड्यामुळे चार दिवसात अनेक दुचाकीस्वार जखमी ! प्रशासनाला जाग केव्हा येणार? ?
महाराज्य टाईम्स :(२८ आँक्टो) बारामती शहरातील उच्चभ्रू परिसरातील समजला जाणारा अत्यंत रहदारीचा कॅनाॅल रस्त्यावर अनेक महिन्यांपासून मोठ्या खड्यामुळे दुचाकी वाहने पडून अनेक नागरिक गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले आहे. प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींना जाग कधी येणार? ? नागरिकांचा सवाल? या गंभीर विषयी महाराज्य टाईम्स मध्ये २४ आँक्टोबर ला बातमी प्रसिध्द झाली होती त्यानंतर प्रशासनाने चार दिवसात कुठलीही तत्पर कारवाई न केल्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक महिला दुचाकीस्वार गाडीवरून पडल्याचे व दोन महिलांना गंभीर दुखापत झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून कळाले आहे. शहरातुन माळावरील देवीला जाणारा कॅनाॅल लगतचा रस्ता सध्या खुप प्रसिद्ध झाला आहे. कॅनाॅलच्या भिंतीला लागुनच तेथे प्रचंड सुशोभिकरण करण्यात आले. दगडी पायर्या, खेळणी, रंगरंगोटी व शोभिवंत झाडे अशा अनेक गोष्टी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशोकनगर, माळावरची देवी, अंबिकानगर, देसाई ईस्टेट परिसरातील जागेचे भाव सुद्धा प्रचंड वाढले आहेत. परिसरातील बिल्डर खुप खुष झाले आहेत कारण ...