श्री दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक (दिंडोरी प्रणित) केंद्रात भव्य स्वरूपात श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह संपन्न !!
बारामती: (महाराज्य टाईम्स) बारामती शहरात नाना-नानी पार्क, भिगवण रोड येथे श्रीदत्त जयंती निमित्ताने सात दिवस रोज धार्मिक याग, अखंड नामस्मरण व श्री गुरु चरित्राचे अखंड पारायण दि २७ रोजी महाआरती करून संपन्न झाले. बारामती शहरात अनेक वर्षापासून भिगवण रोडला शिवाजीनगर, जळोची येथे नाना-नानी पार्क मध्ये श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र (दिंडोरी) प्रणीत प्रसिध्द आहे. तिथे श्री स्वामी समर्थांची नित्योपसना, आरती, नामस्मरण असे दैनंदिन कार्यक्रम चालतात. हजारो सेवेकरी बारामती परिसरातील नित्य उपस्थिती राहून सेवा करतात. दरवर्षी श्री स्वामी समर्थ जयंती, पुण्यतिथी व श्री दत्त जयंती असे प्रमुख कार्यक्रम केले जातात. यावर्षी श्री दत्त जयंती निमित्त १९/१२/२०२३ ते २७/१२/२०२३ पर्यंत श्री गुरु चरित्र पारायण सप्ताह आयोजित करण्यात आला होता. खुप भव्य पवित्र व धार्मिक अशा वातावरणामध्ये ३१४ सेवेकर्यांनी पारायणामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सेवा अर्पण केली. पारायणाच्या बरोबरच दररोज श्री गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, श्री स्वामी याग, श्रीचंडी याग, श...