श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त श्री दत्त तरुण मंडळाच्या वतीने ५ हजार नागरिकांना महाभोजनाचे आयोजन
बारामती: (महाराज्य टाईम्स) श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने बारामती शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,कसबा येथे तब्बल ५००० नागरिकांना महाभोजनाचा कार्यक्रमाचे आयोजन श्री दत्त तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज लढत होते रयतेच्या स्वराज्यासाठी जगात छत्रपती शिवरायांच्या प्रमाणे अनेक राजांनी किल्ले जिंकले, युद्धे जिंकली, शत्रूचा नायनाट केला परंतु जयंती फक्त छत्रपती शिवरायांचीच का होते.? कारण इतर राजे, महाराजे, बादशहा लढत होते स्वतःच्या साम्राज्य विस्तारासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज लढत होते रयतेच्या स्वराज्यासाठी स्वराज्याचा अजेंडा होता रयतेस पोटास लावणे आहे, रयतेच्या भाजीच्या देठास हात लागता कामा नये, रयत आमुची आहे..!! असा थोर आणि अतिशय दैवी विचार महाराजांनी मनात ठेवला होता. म्हणूनच त्यांनी बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार यांच्यासह सर्व जातीधर्मातील विश्वासू मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले, म्हणून संपूर्ण जगात प्रेरणादायी आदर्श राजे दैवी महापुरूष श्री छत्रपती श...