पोस्ट्स

पिण्यासाठी गटारीचे मिश्रित पाणी देऊन नगरपरिषद करत आहे नागरीकांच्या आरोग्याशी खेळ !! स्व.अजितदादांच्या कार्यकर्त्यावर आमरण उपोषणाची वेळ

इमेज
महाराज्य टाईम्स:        बारामती नगरपरिषद चा प्रभाग 16 मधील नागरिकाच्या आरोग्याशी खेळ           बारामती येथील प्रभाग क्रमांक 16 मधील बुरुड गल्ली भागात गेली 3 महिने पिण्याचे पाणी आणि गटारीचे पाणी मिश्रित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जुलाब,उलट्या,ताप याने नागरिक 3 महिने त्रस्त आहेत परंतु नगरपालिका प्रशासन कोणाच्या तरी दबावामुळे पाईप येऊन पडले तरी काम सुरू करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.       गटारीचे पाणी पिऊन एखादा मृत्युमुखी पडल्यास नगरपालिका त्या घराची काय भरपाई करणार. काविळ सारखा गंभीर आजार व इतर काही रोग जर नागरिकांना झाला तर त्यांचा दवाखाना खर्च नगरपालिका उचलणार आहे का ?  3 महिने पत्र व्यवहार करून सुद्धा न्याय मिळत नसल्याने आज बुरुड गल्लीतील नागरिकांसाठी सामाजिक कार्यकर्ता श्रीकांत जाधव आमरण उपोषण करायला बसले होते. यांच्या सोबत शुभम भंडारे,स्थानिक नागरिक महेश नवसारे, रणजीत चव्हाण, दिनेश नवसारे महिला नागरिकांनी उपोषणात भाग घेतला. .   (नागरीकांना मिळालेल...

स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी निलेशभई कोठारी तसेच कार्यकारणी सदस्यपदी कबीरभाई तांबोळी यांची निवड

इमेज
महाराज्य टाईम्स:         दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; देशभरातील परिवारांना एकत्र आणण्यासाठी व्यापक संघटन विस्ताराची कार्ययोजना      स्वातंत्र्यलढ्यात आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांच्या हक्क, सन्मान व सामाजिक प्रतिष्ठेसाठी देशव्यापी लढा उभारण्याचा निर्धार स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवार समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांना ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून मान्यता देऊन त्यांच्या सन्मान व अधिकारांसाठी देशभर समान धोरण असावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी या बैठकीत करण्यात आली.       प्रेस क्लब ऑफ इंडिया, रायसीना रोड, नवी दिल्ली येथे झालेल्या या अर्धवार्षिक राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीस देशातील 21 राज्यांमधून 42 राष्ट्रीय व प्रादेशिक प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशबंधूजी होते. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष द्विजेंद्र मोहन शर्मा, राष्ट्रीय महासचिव जितेंद्र रघुवंशी, कार्यकारी महासचिव चंद्रप्रकाश बाजपे...

माळेगाव खुनाचा प्रयत्न प्रकरण: बारामती पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

इमेज
माळेगावातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध; रेकॉर्डवरील सराईतांची पडताळणी, घातक शस्त्रे व संशयित वाहनांवर विशेष नजर ( महाराज्य टाईम्स ) बारामती : माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यानंतर आरोपींचा शोध वेगाने घेण्यासाठी आणि बारामती शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण अधिक मजबूत करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम यांच्या नेतृत्वाखाली आमराई परिसरात व्यापक कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. माळेगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० तसेच शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. फिर्यादीनुसार, दि. २८/०९/२०२६ रोजी रात्री सुमारे २०.०० वाजता माळेगाव बु. येथील तावरे पेट्रोल पंप परिसरात पूर्वीचे भांडण सोडविल्याचा राग मनात धरून काही आरोपींनी धारदार लोखंडी कोयत्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत संदीप दत्तात्रय जगताप, अनिकेत उदयसिंह धुमाळ व पृथ्वीराज अतुल निंबाळकर जखमी झाले. प्...

बारामती येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास शासनाची मान्यता !! बारामती, दौंड व इंदापूर तालुक्यातील नागरिकांना मिळणार लाभ

इमेज
महाराज्य टाईम्स: पुणे जिल्ह्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा सहज व नजीकच्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी बारामती येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा अधिक सुलभतेने आणि जवळच्या ठिकाणी उपलब्ध होतील. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावरील कामाचा ताण कमी होऊन प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळण्यास मदत होणार आहे. पुणे जिल्ह्याच्या महसूल प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य शासनाने बारामती येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यान्वित करण्यास मंजुरी दिली आहे. बारामती, दौंड आणि इंदापूर या तीन तालुक्यांचा या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे विकेंद्रीकरण होण्याच्या दृष्टीने या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. महसूल व वन विभागाने २२ सप्टेंबर रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला. पुणे जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण तसेच बारामती, दौं...

बारामती नगर परिषदेच्या वतीने पर्यावरण पूर्वक श्री गणेश मूर्ती विसर्जनाचे उत्तम नियोजन !!

इमेज
महाराज्य टाईम्स:      बारामती शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून श्री गणेश मूर्तींचे विसर्जनासाठी उत्तम नियोजन करण्यात आले आहे. बारामती शहरामध्ये विविध ४० भागांमध्ये कृत्रिम विसर्जन जलकुंड व निर्माल्य संकलन व्यवस्था करण्यात आली आहे.     लाडक्या गणरायाच्या मूर्ती विसर्जनासाठी नगर परिषदेने उत्तम नियोजन व तयारी केली आहे. बारामती शहरामध्ये विविध भागांमध्ये तब्बल 40 ठिकाणी कृत्रिम विसर्जन जलकुंड व निर्माल्य कलश ची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण विसर्जन होईपर्यंत पूर्णवेळ मनुष्यबळाची तरतूद करण्यात आली आहे.    नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोत जसे की नदी नाले ओढे तलाव कॅनॉल या ठिकाणी मूर्ती विसर्जन न करता पर्यावरण पूर्वक मूर्ती विसर्जन करावे यासाठी आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी गणेश मूर्ती व निर्माण्य नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करावे जेणेकरून त्या मूर्ती संकलित करून नगरपरिषद ही योग्य पद्धतीने भक्ती भावाने एका मोठ्या विहिरीमध्ये ती विसर्जित करण्यात येत आहे.    त्यामुळे नागरिकांनी नगरपरिषदेच्या या पर्यावरण पूर्वक श्री गणेश मूर...

बारामती नगर परिषदेचे पर्यावरणपूर्वक श्रीगणेश विसर्जनासाठी उत्तम नियोजन !!

इमेज
महाराज्य टाईम्स:      बारामती शहरामध्ये नगर  परिषदेच्या माध्यमातून श्री गणेश मूर्तींचे विसर्जनासाठी उत्तम नियोजन करण्यात आले आहे. बारामती शहरामध्ये विविध ४० भागांमध्ये कृत्रिम विसर्जन जलकुंड व निर्माल्य संकलन व्यवस्था करण्यात आली आहे.     लाडक्या गणरायाच्या मूर्ती विसर्जनासाठी नगर परिषदेने उत्तम नियोजन व तयारी केली आहे. बारामती शहरामध्ये विविध भागांमध्ये तब्बल 40 ठिकाणी कृत्रिम विसर्जन जलकुंड व निर्माल्य कलश ची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण विसर्जन होईपर्यंत पूर्णवेळ मनुष्यबळाची तरतूद करण्यात आली आहे.    नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोत जसे की नदी नाले ओढे तलाव कॅनॉल या ठिकाणी मूर्ती विसर्जन न करता पर्यावरण पूर्वक मूर्ती विसर्जन करावे यासाठी आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी गणेश मूर्ती व निर्माण्य नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करावे जेणेकरून त्या मूर्ती संकलित करून नगरपरिषद ही योग्य पद्धतीने भक्ती भावाने एका मोठ्या विहिरीमध्ये ती विसर्जित करण्यात येत आहे.    त्यामुळे नागरिकांनी नगरपरिषदेच्या या पर्यावरण पू...

अभियंता दिन व तांत्रिक सत्र उत्साहात संपन्न

इमेज
महाराज्य टाईम्स: बारामती : *इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स, बारामती लोकल सेंटर* यांच्या वतीने 15 सप्टेंबर 2026 रोजी हॉटेल सिटी इन  येथे आयोजित करण्यात आलेला **अभियंता दिन  व तांत्रिक सत्र उत्साहात संपन्न** उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी  पुणे,फलटण,इंदापूर, लोणंद, पुरंदर, दौंड, श्रीगोंदा, तसेच परिसरातील अनेक अभियंत्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील व राष्ट्रनिर्माणातील अतुलनीय योगदानास अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी *इंजी. शामराव राऊत* यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर *इंजी. शहाजी पारकळे* यांनी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला. त्यांच्या दूरदृष्टी, अभियांत्रिकी कौशल्य आणि देशाच्या विकासातील मोलाच्या योगदानाची माहिती उपस्थितांना करून दिली.  कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरलेल्य...

बारामतीत स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद..!

इमेज
एकूण १,४५६ रक्तदात्यांचे रक्तदान; समाजसेवेच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.. महाराज्य टाईम्स दि. १९ :         दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शारदा प्रांगण व विद्या प्रतिष्ठान या दोन केंद्रांवर पार पडलेल्या या शिबिरात तब्बल १,४५६ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपली. यामध्ये विद्या प्रतिष्ठान येथे २१७ तर शारदा प्रांगण येथे १,२३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिर दरम्यान राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, युवा नेते जय पवार यांनी भेट दिली.      शिबिराच्या प्रारंभापासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. प्रथमच रक्तदान करणाऱ्...

स्व.अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्याचा महाराष्ट्र शासनाचा आदेश जारी

इमेज
महाराज्य टाईम्स: (बारामती)          सरकारने दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 22 जुलै रोजी साजरी होणारी त्यांची जयंती राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जाणार असून, यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत शासनादेश आज १५ जुलै संध्याकाळी ६ वाजतां जारी केला आहे. या दिवशी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचे अधिकृत आदेश राज्य शासनाने जारी केले. शासनाच्या या निर्णयामुळे अजितदादांच्या लोकसेवेचा वारसा आता अधिकृतपणे जपला जाणार आहे.    शासनाने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागणीची घेतली दखल: राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत सा...

बारामती नगर परिषद अँक्शन मोडवर: संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी तयारी

इमेज
महाराज्य टाईम्स (बारामती):  जगदगुरू संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती शहरात मुक्कामी येत असते त्या अनुषंगाने बारामती नगरपरिषदेमार्फत संपूर्ण शहरात युद्धपातळीवर स्वच्छता व निर्जंतुकीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी ही माहिती दिली.      पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नगर परिषदेने वेळेत साफसफाई, कचरा संकलन व वाहतुकीची कामे, रस्त्यावरील खड्डे, गतिरोधक दुरूस्ती व वाढलेली झाडे झुडपे काढण्यात येत आहेत. दिंड्यांच्या मुक्कामाची ठिकाणे, आणि मोबाईल शौचालयांची व्यवस्था असलेल्या सर्व परिसरांची तात्काळ स्वच्छता करून जागा उपलब्ध करण्याचे काम होत आहे.      सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा संकलनाचे काम सुरू आहे. लाखॊं भाविकांचे आरोग्य, पिण्याचे पाणी व मुक्कामाची सोय याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी भुसे यांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना सांगितले.      यासोबतच शहरात निर्जंतुकीकरणासाठी जंतुनाशक औषधे व बीएचसी पावडर फवारण्यात येत आहे. दु...

योगेश नालंदे ठरले पहिले पत्रकार ज्यांना मिळाला राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार !!

इमेज
महाराज्य टाईम्स: - १ जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध विभागातून शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येतो.       बारामती मधील युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 2024 सालचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार राज्यपाल श्री जीष्णू देव वर्मा यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, दत्तात्रय भरणे कृषिमंत्री, आशिष जयस्वाल कृषी राज्यमंत्री, भरत शेठ गोगावले व इतर मान्यवर उपस्थित होते.       अवघ्या एक वर्षात तब्बल 365 शेतकऱ्यांच्या यशोगाथा शोधून त्यांना वृत्तपत्राच्या माध्यमातून मोठी प्रसिद्धी दिली. या यशोगाथांच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि सकारात्मक शेती संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा यासाठी कृषी प्रसाराचे मोठे कार्य केले. कृषी वाहिनीवर काम करताना बाजारभाव, हवामान अंदाज आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे नाट्यरूपंतर ऑडिओ बनवून रेडिओ वरून प्रसारित केले. यासह कृषी व...

पुणे जिल्ह्यातील सर्वच शाळांना उद्या ६ जुलै रोजी सुट्टी जाहिर !! - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

इमेज
महाराज्य टाईम्स: (बारामती) भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक ०६ जुलै २०२६ रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Thunder and lightning in Pune) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये घाट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा दि.०६/०७/२०२६ रोजी बंद ठेवणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आज आदेश जाहिर केले.       याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांना (जिल्हा परिषद, नगरपालिका, आश्रमशाळा, खाजगी शाळा, अनुदानित व विना अनुदानित खाजगी शाळा, इंग्लिश मिडीयम शाळा, सर्व अंगणवाडी) या सर्व शाळांना दिनांक ०६/०७/२०२६ रोजी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.        तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असे...