पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

इमेज
बारामती : ४ आँगस्ट (महाराज्य टाईम्स) बारामती शहरातील केंद्र बिंदू मानला जाणारा व प्रचंड वर्दळीचा मानला जाणारा सध्या वादग्रस्त ठरलेला तीन हत्ती चौक येथे काही तासांपुर्वी भिषण अपघात घडला आहे. त्यामध्ये तीनजण गंभीर जखमी आहेत.          बारामती शहरातील सर्वात वर्दळीचा चौक असलेला तीन हत्ती चौक सध्या त्याच्या वादग्रस्त सुधारणेच्या व नियोजणाच्या संदर्भात खुप चर्चेचा विषय झाला आहे. अत्यंत नियोजन शुन्य गोष्टींमुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले रोज नागरिक अनुभवत आहेत. दिवसभरात असंख्य वाहने येथून ये-जा करत असतात. पण ढिसाळ वाहतुकीचे नियोजन व रचना यामुळे अनेक वाहने रोज एकमेकांना धडकत असल्याचे स्थानिक परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे.        काही तासापूर्वीच तीनहत्ती चौक येथे प्रचंड भिषण अपघात झाला असुन नटराज मंदिराजवळ दुचाकीवरुन भाऊ-बहिण येत असताना अचानक दुसरा दुचाकीस्वार समोरासमोर येऊन धडकल्यामुळे दुचाकीवरिल महिला गाडीवरुन जोरात उडून पडल्यामुळे डोक्याला प्रचंड मार लागून रक्तस्त्राव झाल्याने गंभीर जखमी झाली असुन शहरातील भोईटे हाँस्पिटल येथे तातडीन...