पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भव्य थाटामाटात गणेश विसर्जन मिरवणुक सुरू

इमेज
महाराज्य टाईम्स: बारामती शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीची धामधुम अत्यंत थाटामाटात सुरू असुन प्रचंड उत्साही वातावरणात गणेशाला दहा दिवसाच्या मुक्कामानंतर निरोप देण्यात आहे. अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाचा श्रीमंत आबा गणपतीची मिरवणूक नेहमी प्रमाणे अत्यंत थाटामाटात दुपारी २ वाजतां सुरू झाली ती पण अत्यंत दिमाखदार सुशोभित केलेला रथ व त्यावर भव्य श्रीमंत आबा गणपती मूर्ती अत्यंत दिमाखदार दिसत होती. मिरवणुकीत जयोस्तुते, म.ए.सो.शाळेचे मुलींचे दुर्गावंदन, जनहित शाळेचे जनहित असे तीन ढोल पथक गणराया चरणी आपली सेवा देत होते. घोडे, उंट, व अनेक विविध रंगभुषा केलेले कलाकार मिरवणुकीत सहभागी झाले होते. बारामतीत सर्वात भव्य मिरवणुकीचा मान याच मंडळाला जातो. मिरवणूक अत्यंत उत्साहात चालु असताना अचानक संध्याकाळी ७ च्या दरम्यान पाऊसाने जोरदार प्रमाणात हजेरी लावले. सर्व मडळाची तारांबळ उडाली परंतू उत्साह कमी झाला नाही. जोरदार पाऊसात सुद्धा तिन्ही ढोल पथकांनी अखंडपणे ढोल तासाचा नाद कायम ठेवला. मिरवणूक गुनवडी चौकात आली असताना पोलिस प्रशासन व कार्यकर्त्यांमध्ये थोडावेळ एका ढोल पथकाला वाजवु न देण्याच्या व पुढे चला या...

गणेशोत्सवात बारामतीकरांनी अवश्य बघावा असा एकमेव हलता देखावा- " ज्वालासुराचा वध"

इमेज
बारामती: (महाराज टाईम्स) गणेशोत्सवानिमित्त बारामती शहरात वातावरण अत्यंत भक्तिमय व करमणुकीच्या कार्यक्रमांनी भारावुन गेले आहे. अनेक गणेशोत्सव मंडळांनी भव्य मंडप उभारले आहेत. लाईंटिंगचे देखावे सादर केले आहेत. तर काही मंडळांनी विविध करमणुकीचे कार्यक्रम, आँर्केस्ट्रा, डान्स जल्लोष, गाण्यांचे प्रसिद्ध कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रमाची मेजवाणी जणू काय नागरिकांना देण्यात आली आहे.   बारामती शहरातील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी चौक तरुण मंडळाने तब्बल ३५ वर्षाची परंपरा जपत अखंडपणे विविध विषयावरील, धार्मिक प्रसंगावर आधारित हलते देखावे सादर करत आहेत. लाखों रुपये खर्च करुन सजीव वाटणार्या विविध पात्रांच्या मूर्ती तयार करुन आधुनिक पद्धतीने त्यांना हलते बोलते करुन अनेक विषय देखाव्यांच्या माध्यमातून लोकांसमोर एक प्रसंग लोकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न गेल्या ३५ वर्षापासुन अखंडपणे केला जात आहे. सध्या बारामती शहरात एकमेव असे गणेश मंडळ असुन ज्यांनी कुठलाही डिजे, साऊंडच्या भिंती उभा न करता एक पारंपारिक गणेशोत्सव साजरा करत आहेत.       यावर्षी पौराणिक कथेतील प्रसिध्द ज्वालासुर र...

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

इमेज
                                                              (संदर्भ चित्र) " जुन्या मीटरच्या जागी आता नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असून, थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा आपोआप खंडित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. " बारामती: (महाराज्य टाईम्स) महाराष्ट्रातील सर्व वीज ग्राहकांचे वीज मीटर बदलून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. यासाठी एकूण 26 हजार 921 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासंदर्भात आज सहा निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. भांडुप, कल्याण, कोकण, बारामती, पुणे येथील मीटर अदानी ग्रुप कंपनी बदलणार आहेत. RDSS  योजनेंतर्गत DBFOOT तत्त्वावर महाराष्ट्र राज्यातील MSEDCL मध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरिंगसाठी प्रगत मीटरिंग पायाभूत सुविधा पुरवठादाराची नियुक्ती आज करण्यात आली. उर्जा मंत्रालयाच्या निर्देशानुसार, भारत सरकार आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड निर्देशानुसार काम करतील. महाराष्ट्र राज्यातील ...

गणेश उत्सवासाठी पोलिस व नगर परिषद प्रशासन सज्ज ! बारामतीतील मंडळांना प्रत्यक्ष भेटुन घेतला आढावा

इमेज
(सुभाष चौक येथील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रशासन अधिकारी मार्गदर्शन करताना)  बारामती (महाराज्य टाईम्स्): बारामती शहरात गणेशोत्सवानिमित्त प्रचंड उत्साह दिसून येत आहे. संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण झाले. अनेक गणेश मंडळ सज्ज झालेत. बाजारपेठत सुद्धा खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन व नगर परिषद प्रशासन यांची नागरिकांच्या सोईसाठी व सुविधांसाठी जबाबदारी वाढली आहे.    शहरात अनेक गणेश मंडळ विविध डेकोरेशन व देखावे करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी आकर्षक मंडप तयार केले आहेत. सदर मडळांना नगर परिषदचे मुख्याधीकारी महेश रोकडे, पोलिस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरिक्षक दिनेश तायडे, आरोग्य निरिक्षक राजेंद्र सोनवणे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुनिल धुमाळ व इतर अधिकारी यांनी दिवसभर समक्ष भेटी देऊन आढावा घेतला. वाहतुकीला अडचणी येऊ नये म्हणून मंडळाना मंडप योग्य पद्धतीने उभे करण्यास सांगण्यात आले. काही ठिकाणी विसर्जन मिरवणुकीत प्रमुख मार्गावरील मंडळाच्या बाबतीत अडचणी आल्या होत्या पण प्रशासन व मंडळांच्यां कार्यकर्त्यांनी समझोता दाखवून सहक...

बारामती गणेश फेस्टिवल मध्ये बहरदार कार्यक्रमांची बारामतीकरांना मेजवाणी

इमेज
मा.ना. अजितदादा पवार यांनी २००२ मध्ये बारामती गणेश फेस्टिव्हलची सुरुवात केली यावर्षी फेस्टिव्हलचे (कोविड वर्ष वगळता) सलग २१ वे वर्ष आहे. या वर्षीचा गणेशोत्सव दि १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. मा. ना. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे दि २३ सप्टेंबर रोजी सपत्नीक फेस्टिव्हलला उपस्थित रहाणार आहेत. बारामती गणेश फेस्टिव्हलच्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना मंगळवार दि १९ रोजी सकाळी १० वाजता उपविभागीय अधिकारी श्री वैभव नावडकर यांच्या हस्ते होणार आहे.   बारामती गणेश फेस्टिवलमध्ये बारामतीकरांना करमणुकीच्या कार्यक्रमांची दरवर्षी मेजवाणी मिळत असते. कार्यक्रमाची रूपरेखा खालील प्रमाणे :- *दि. १९ रोजी सायंकाळी ७ वाजता भिमसेन जोशी यांचे शिष्य किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित संजय गरुड यांच्या "माझे माहेर पंढरी" हा भजन - भक्तीगीतांचा कार्यक्रम. दि २० रोजी प्रसिध्द समाजप्रबोधन कीर्तनकार ह. भ. प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे किर्तन. दि २१ स्वरनिनाद प्रस्तुत ऑर्केस्ट्रा "सत्यम शिवम सुंदरम  दि २२ पूनम कुडाळकर यांचा मराठी ल...

सर्व्हिस इंजिनीयर फोरम बारमाती तर्फे अभियंता दिन (इंजिनीअर्स डे) साजरा

इमेज
डावी कडून- इंजि.दिलीप भिसे, हेमचंद्र शिंदे, महेश रोकडे, छगन लोणकर, गोरख सावंत बबनराव संग्रामपुरकर  आणि इतर बारामती (महाराज्य टाईम्स) • मागील वीस वर्ष कार्यरत असणाऱ्या व पाटबंधारे खात्यातील  अभियंत्यांनी स्थापन केलेल्या "सर्व्हिस  इंजिनिअर्स फोरम, बारामती" तर्फे भारतरत्न सर मोक्षगुंडम  विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिन 15 सप्टेंबर 2023 रोजी "अभियंता दिन" म्हणून जेष्ठ नागरिक संघ कार्यालय बारामती येथे इंजि. उद्धव मोरे यांचे अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. बारामती फलटण इंदापूर परिसरातील 60 अभियंते उपस्थित होते. इंजिनीअर्स डे निमित्ताने मागील वर्षभरातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभियंत्यांना गौरविण्यात आले.  • याप्रसंगी इंजिनीयर बबनराव संग्रामपूरकर दिलीप भिसे यांनी  वयाचा "अमृत महोत्सव" साजरा केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.  • इंजि. महेश रोकडे मुख्य अधिकारी बारामती नगरपालिका यांचा नगरपालिकेस स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत देशांमधून व माझी वसुंधरा अंतर्गत राज्यांतून द्वितीय क्रमांक मिळविणे कामी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले...

गवत्या मारुती तरुण मंडळाच्या श्री शक्ती देवी नवरात्र महोत्सव उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते नसीर मोमीन यांची निवड

इमेज
*मोहोळ:  ( प्रभाकर बावधनकर ): शहरांतील सर्व धर्म सम भावाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या आणि नामांकित ओळख असलेल्या गवत्या मारुती तरुण मंडळाच्या श्री शक्ती देवी नवरात्र महोत्सव वर्ष 55 वे मंडळाच्या उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते नसीर मोमीन यांची निवड करण्यात आली ह्या निमित्त  सत्कार प्रसंगी दाखविलेला विश्वासार्हता सार्थ ठरविणार असल्याचे मनोगत नसीर मोमीन यांनी व्यक्त केले.*      मोहोळ शहरातील रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने नसीर मोमीन यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.       यावेळी रंगभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल महामुनी, लोकशक्ती परिवाराचे दिलीप गायकवाड, मा पंचायत समिती सदस्य दमानी गोडसे, दिलीप शिंदे, बापूराव राऊत, रंगभूमी प्रतिष्ठानचे तथा सोलापूर जिल्हा ब्रँड अँबेसिडर राजन घाडगे आदि. उपस्थित होते.    श्री शक्ती देवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या उपाध्यक्षपदी नसीर मोमीन यांची निवड झाल्याबद्दल रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.     यंदा पर्जन्यमान क...

उत्कृष्ट दहिहंडी उत्सवाचे प्रथम पारितोषिक स्व.धनंजयभाऊ देशमुख मेमोरियल ट्रस्टला प्रदान

इमेज
बारामती: १६ सप्टेंबर :. बारामती शहरांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाल्यानंतर पोलीस व प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या. दहीहंडी उत्सव २०२३ शिस्तबद्ध व उत्कृष्टरित्या दहीहंडी उत्सव साजरा केलेल्या मंडळांपैकी प्रथम क्रमांक मिळवलेल्या धनंजय (भाऊ) देशमुख मेमोरियल ट्रस्ट यांना शांतता कमिटीच्या मीटिंग वेळी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तसेच सन्मानपत्र देऊन अध्यक्ष व आयोजक मा. नगरसेवक जयसिंग (बबलू) देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. दरवर्षी देशमुख यांच्या दहीहंडीचा उत्सव अत्यंत भव्य स्वरूपात साजरा केला जातो. बारामतीत या दहिहंडीचे आकर्षण व उत्सुकता असते. त्यामुळे देशमुख यांच्या दहिहंडीला हजारो नागरिक दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी शेवटपर्यंत थांबलेले असतात.        याच प्रमाणे बारामती दहीहंडी उत्सव 2023 यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक. व सन्मानपत्र हे युनिटी फ्रेंड्स क्लब सुभाष चौक. आयोजक मा. नगरसेवक निलेश (आप्पा) इंगुले यांना देण्यात आले. त्याच प्रमाणे इथून पुढच्या काळात देखील. शिस्तबद्ध व उत्कृष्टरित्या उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना ...

अखिल तांदुळवाडी वेस (आबा गणपती) तरुण मंडळाला "उत्कृष्ट मंडळ" पुरस्कार जाहिर !!

इमेज
*"लोकमत वृत्तपत्र समुहाने" मागील कामकाजाचा आढावा घेऊन उत्कृष्ठ कामकाजा बद्दल* अखिल तांदुळवाडी वेस (आबा गणपती) तरूण मंडळास *लोकमत वृत्तपत्र समुह तर्फे" उत्कृष्ठ मंडळ म्हणुन सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. सत्कार समारंभ उद्या दिनांक 15-9-2023 रोजी सकाळी ठिक 11.00 वा हॉटेल श्रेयस बॅक्वेट हॉल, आपटे प्रशाले समोर, पुणे होणार आहे.  *या पूर्वी मंडळास आदरणीय श्री शरद पवार साहेब यांच्या हस्ते सर्वकृष्ठ मंडळ व कोविड योद्धा म्हणुन 2 वेळा पुरस्कार मिळालेला आहे* *तसेच मा.श्री.विश्वास नांगरे पाटिल तत्कालीन अधीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या हस्ते विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता*  *फडणवीस-शिवसेना सरकार च्या काळात लोकमान्य टिळक सर्वकृष्ठ मंडळ म्हणुन राज्य सरकार तर्फे विभागात प्रथम क्रमांक मिळाला होता.* एन्व्हाॅर्यमेंटल फोरम आँफ इंडिया, बारामती या संस्थेकडुन पर्यावरणाविषयी जनजागृती व अंमलबजावणी करण्यासंदर्भातील "पर्यावरणपुरक गणेशोत्सव" चा पण पुरस्कार अध्यक्ष सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मिळाला आहे. *बारामती नगर परिषद व बा...

जिल्हा परिषद सोलापूर यांच्यावतीने मोहोळ तालुक्यातील जि.प. औंढी शाळेतील शरद चांगदेव माने यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

इमेज
मोहोळ: (प्रभाकर बावधनकर) जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यात मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा औंढी शाळेतील शरद चांगदेव माने यांना शैक्षणिक, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हास्तरीय सर्वसाधारण आदर्श शिक्षक पुरस्कार माननीय नामदार राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील साहेब पालकमंत्री तथा महसूल पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मनीषा आव्हाळे मॅडम, सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब व मॅडम, सर्व मा शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, महारुद्र नाळे, मारुती फडके, सुलभा वटारे, सर्व गटशिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यालय विस्तार अधिकारी हरिष राऊत, अंकुश काळे, मोहोळचे गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी, सिद्धेश्वर निंबर्गी, नागणसुरे, बंडू शिंदे, विकास यादव, केंद्रप्रमुख तिपण्णा कमळे, नेताजी रणदिवे व अनेक मान्यवरांच्या उपस्थिती...

शिवशंभोन पटकावला मोहोळची दहीहांड़ी फोडण्याचा मान

इमेज
मोहोळ: (प्रभाकर बावधनकर) मोहोळ शहर मध्यवर्ती दहीहंडी उत्सव समिती व मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी सोहळ्यामध्ये बारामतीच्या शिवशंभो गोविंदा पथक या संघाने दहीहंडी फोडून 1 लाख 11 हजार 111 रुपयाचे पारितोषिक व चषक पटकावले. तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक बारामतीच्या भैरवनाथ संघाने पटकावले त्या संघाला 77 हजार 777 रुपये व चषक देण्यात आला. या स्पर्धेमध्ये मुंबई येथील साईलीला महिलांचा गोविंदा संघ ही सहभागी झाला होता. त्या संघाला 55 हजार 555 रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या शुभहस्ते विजेत्या संघला पारितोषक व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या वतीने मोहोळ नगरपरिषद कार्यालय समोर या भव्य दहीहंडी उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. *या सोहळ्याला मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कदम यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपस्थितीना गोविंदा पथक व नागरिकांना शुभेच्छा दिल्या व रमेश बारसकर यांनी केलेल्या या उपक्रमाचे...

श्रावणी सोमवार निमित्त श्री सिध्देश्वर मंदिर येथे उपवासाच्या महाप्रसादाचे दिवसभर आयोजन

इमेज
बारामती: (महाराज्य टाईम्स) श्रावणी सोमवार निमित्त बारामती शहरातील पौराणिक ग्रामदैवत सुप्रसिद्ध श्री सिध्दश्वर मंदीर येथे भाविक भक्तांसाठी श्री योग योगेश्वर शंकर महाराज ट्रस्ट,बारामती यांच्या वतीन उपवासाचा प्रसाद म्हणून शाबुदाना खिचडी, राजगिरा लाडू, फळे वाटप आज सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत अखंडपणे वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शनाला आल्यावर प्रसादाचा लाभ घ्यावा.  मागील १५ वर्षापासून पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवासाचा प्रसाद सर्व भाविकांना वाटप करण्यात येतो. तसेच नुकत्याच झालेल्या अधिकमास मध्ये प्रत्येक सोमवारी सुद्धा असाच उपवासाचा प्रसाद देण्यात आला होता अशी माहिती संस्थेच्या वतीने श्री ओंकार महाडिक व त्यांच्या मित्र परिवार व सहकार्यांनी दिली.

सच्चा कार्यकर्त्याच्या भावनेची केली कदर....उपमुख्यमंत्रि अजितदादा सात्वन करायला खुडेच्या घरी हजर...

इमेज
बारामती: (महाराज्य टाईम्स) बारामती शहरातील अजित पवार यांचा एक कट्टर कार्यकर्ता सतीश खुडे यांच्या मातुः श्री कमल तुकाराम खुडे यांचे नुकतेच निधन झाले होते. त्याच्या सांत्वनासाठी आज (ता. 8) अजित पवार यांनी आमराईतील त्याचे घर गाठले. त्याच्या घरी सतरंजीवर ते मांडी घालून बसले व कुटुंबियांचे सांत्वन केले. कितीही मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली तरी जिवाभावाच्या कार्यकर्त्याला अंतर द्यायचे नाही, हे तत्त्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजही कायम ठेवलेले असल्यानेच त्यांच्या निवडणूकीत कार्यकर्ते जिवाचे रान करतात. वयाच्या सतराव्या वर्षापासून सतीश खुडे अजित पवार यांच्या निवडणूकीत प्रचाराला निस्वार्थीपणे कायम पुढे असतात. अजित पवार आमदार होण्याअगोदर पासूनच काँग्रेसची सत्ता असतानाच सतिश खुडे आदरणिय पवार साहेबांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून काम करत होता. अजित पवारांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर सतिश खुडे अजित पवार जिथे जातील तिथे अगोदर पोहचणार. अजित पवारांच्या प्रेमापोटी त्या काळात त्यांच्या नावाने एका गणेशोत्सव मंडळाचीही त्यांनी स्थापना केली होती. प्रत्येक निवडणूकीत पवार कुटुंबियांच्या ...

तब्बल २६ वर्षांची दहिहंडी परंपरा...युनिटी फ्रेंडस सोशल क्लबची दहीहंडी योगेश जगताप संघाने फोडली.

इमेज
बारामती (दि. १०) : मा. नगरसेवक निलेश आप्पा इंगुले यांच्या युनिटी फ्रेंडस सोशल क्लबच्या वतीने मागील २६ वर्षांपासून दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. बारामती शहरात सर्वात जुनी दहीहंडी म्हणून ओळख निर्माण झाली आहे.  शहरात सुभाष चौक येथे यावर्षीही अत्यंत जोशपुर्ण वातावरण दिसून आले. निलेश इंगुले यांच्या संघटन कौशल्यामुळे हजारो तरुणांची उपस्थिती प्रचंड प्रमाणात दहिहंडी पाहण्यासाठी दिसुन आली. डिजे संगिताच्या तालावर तरुणाई अक्षरशः थिरकत होती. दहीहंडी फोडण्यासाठी ५ संघानी प्रयत्न केला होता. त्यामध्ये मुंबई येथील महिला संघाने सुद्धा प्रयत्न केला होता. सुरक्षिततेच्या कारणामुळे दहिहंडीची उंची २५- ३० फुटापर्यंतच ठेवण्यात आली होती त्यामुळे सर्वच संघ दहीहंडी फोडण्यासाठी तयार होते. सगळ्यांच्या नावाची चिठ्ठी टाकून त्यामधून योगेश जगताप दहीहंडी संघाला संधी देण्यात आली. ५ थर लावून पहिल्याच प्रयत्नात दहिहंडी फोडण्याचा मान पटकवला. रु. २१०००/- रोख व ट्राॅफी असा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती आयोजक निलेश इंगुले यांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना दिली. दहीहंडीचा उत्सव पार पाडण्यासाठी अक्षय इंगुले, ...

बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी संभाजी होळकरांची चवथ्यांदा फेरनिवड, शहराध्यपदी पुन्हा जय पाटील

इमेज
पुणे : (महाराज्य टाईम्स्) आज काही वेळा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. मेळाव्याला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवल्याचे दिसून आले.  मेळाव्यात कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष खा. सुनिलजी तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष सौ. रुपालीताई चाकणकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.     बारामती तालुक्यात तळागाळापर्यंत पोहचुन एक एक कार्यकर्ते जोडण्याचे काम करून तब्बल १२ वर्षे राष्ट्रवादी पक्षाला बळकटी आणून देणार्या संभाजी होळकर यांना चौथ्यांदा तालुकाध्यक्षपदी फेर निवड करण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचे दिसून आले. तसेच बारामती शहरात पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याविषयी उत्तम काम शहर अध्यक्ष म्हणून जय पाटील यांनी आज पर्यंत केल्यामुळे त्यांची सुद्धा फेर निवड शहराध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे. बारामती शहरात अजूनही काही नव्याने काही चेहर्यांना संधी देण्यात आल्याचे दिसून आहे. त्यात प्रताप आबा पागळे, राॅबर्ट जाधव व इतर नावे लवकरच जाहिर करण्यात येणार आहेत. नियुक्ती पत्र खा. सुनिल तटकरे, सौ. रुपालीताई चा...

भारतीय पत्रकार संघ पुणे जिल्हाध्यक्ष पदी तैनुर शेख, सचिवपदी काशिनाथ पिंगळे यांची नियुक्ती

इमेज
बारामती, (वार्ताहर) : असोसिएशन ऑफ इंडियन जर्नलिस्ट भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी बारामतीचे तैनुर शफिर शेख यांची तर सचिवपदी काशिनाथ पिंगळे यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिल सोनवणे व पुणे विभागीय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एस. बी. नदाफ यांनी नियुक्तीचे पत्र देवून निवड केली. संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष एम. एस. शेख यांच्या अनुमतीने तसेच महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांच्या आदेशाने व प्रदेश अध्यक्ष लिगल विंगचे अँड. कैलास पठारे यांच्या शिफारशीने शेख व पिंगळे यांची निवड करण्यात आली. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील पत्रकारांना संघटीत करून त्यांच्या प्रश्नासाठी वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडी प्रसंगी दोघांनी सांगितले.

दहीहंडी उत्सव दूर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदाना शासन देणार विमा संरक्षण

इमेज
ठाणे, (दि. 07) ,गुरुवार:- दहीहंडी उत्सव / प्रो-गोविंदा लीग मधील सहभागी गोविंदांना मानवी मनोरे रचताना अपघात/दूर्घटना होण्याची शक्यता असते. काही वेळा गोविंदा पथकातील गोविंदाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू घडून येतो किंवा गंभीर दुखापत होऊन जीवाला धोका निर्माण होतो. परिणामी अपघातग्रस्त गोविंदाना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. यानुषंगाने गोविंदाना विमा संरक्षण देण्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून 50 हजार गोविंदांना प्रति गोविंदा रु.75/- चा विमा हप्ता याप्रमाणे एकूण रु.37 लाख 50 हजार  इतका निधी संबंधित विमा कंपनीस अदा करण्यासाठी दहीहंडी समन्वय समिती (महा) या संस्थेस वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत विमा संरक्षणाचे स्वरूप पुढीलप्रमाणे राहील :- अपघाती मृत्यू विमा संरक्षण - रु.१०,००,००० (रु. दहा लक्ष), दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास विमा संरक्षण - रु.१०,००,०००(रु. दहा लक्ष), एक हात एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास विमा संरक्षण - रु.५,००,०००(रु. पाच लक्ष), कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व (Permanent total disablement) वि...

मराठवाड्यातील मराठा-कुणबी आंदोलनला मिळाले यश. महाराष्ट्र शासनाकडुन आरक्षणचा जीआर (शासन निर्णय) जाहीर! !

इमेज
मुंबईः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील दहा दिवसांपासून जालन्याच्या अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काल घोषणा केली होती. आज अखेर सरकारने यासंदर्भात शासन आदेश काढलेला आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. काल मुख्यमंत्र्यांनी निजामकालीन पुरावे असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल, असं आश्वासन दिलं होतं. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करुन कागदपत्रांची पडताळणी करण्यासंबंधीचा जीआर काढण्यात आलेला आहे.

पावसामुळे मोहोळ शहरात चिखलमय रस्ते, खड्डयात साचले पाणी ! मात्र पावसाच्या आगमनाने शेतकरी झाले समाधानी !!

इमेज
मोहोळ: (प्रभाकर बावधनकर) मोहोळ शहर परिसरात शनिवारी रात्री व रविवार रोजी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने या पावसामुळे शेतकरी बांधवांसाठी व त्यांच्या खरीप पिकांसाठी जीवदान मिळाले आहे. या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाने सकल भागात पाणी साचले असल्याचे चित्र पहावयास मिळाले व हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे. पाण्याची पातळी वाढावी एवढा पाऊस पडला नाही. शेतकरी बांधवांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.    पडत असलेला पाऊस हा प्रदीर्घ कालावधीनंतर काल शनिवारी व रविवारी दुपारी मध्यम व हलक्या पावसाने हजेरी लावली व या मध्यम व हलक्या सरीने पाऊस पडला. पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके हे करपून चालली होती. हवामानात उकाडा जाणवत होता आणि उन्हाळ्यासारखे चटके अंगाला जाणवत होते. यामुळे  हवामानात गारवा निर्माण होऊन पिकांना सध्या तरी जीवदान मिळाले आहे.   मोहोळ शहरात पावसाची सुरुवात झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी पावसावर आपली प्रतिक्रिया दिले आहे  मोहोळ  नगरपरिषदेने केलेले रस्ते त्यामध्ये खड्डे पाणी साचले आहे या मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाने रस्त्...