बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल
बारामतीत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु असतानाच बारामती शहरात पैसे वाटून व दमदाटी करुन मतदान विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून बारामती शहर पोलिस स्टेशनला तातडीने रात्री ११ वाजतां दाखल करण्यात आली आहे.
लोकसभेची सध्याची निवडणूक प्रतिष्ठेची झाली असुन एका घरातील व्यक्ती समोरासमोर निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. मा.खा.सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी सरळ लढत आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. अत्यंत अटीतटीच्या लढाईत कोण जिंकतो याकडे सर्व देशाचे लक्ष लागून राहिले. मग अशा लढाईत साम, दंड, भेद याबरोबरच आर्थिक गोष्टींचा वापर होईल यात वेगळे सांगण्याची गरज नाही.
बारामती शहरात आमराई व मुजावर वाडा येथे पैसे वाटून व दमदाटी "दादागिरी" करुन विरोधी पक्षाने म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडुन मतदान विकत घेण्याचा प्रकार चालू असुन तातडीने गस्त घालावी व बंदोबस्त वाढवावा. तसेच असे करणार्या समाज कंटकांवर तातडीने कारवाई करावी. अशी तक्रार बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष संदीप गुजर आणि युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी शहर पोलिस स्टेशनला दाखल केली आहे.
वरील प्रकारानुसार जामदार रोड, खंडोबानगर या ठिकाणी असे प्रकार घडू शकतात अशी चर्चा नागरिकांमध्ये दिसून आली. आता या सर्व प्रकारावर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेकडुन व पोलिस स्टेशन आधिकार्याकडुन कारवाई केली जाते का नाही ? हा मोठा प्रश्न नागरिकांमध्ये आहे. कारण ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांच्याच कडे सत्ता आहे. त्यामुळे काय कारवाई होते का नाही ? याकडे बारामतीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
%20(14).jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा