जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू
बारामती : बारामतीत शहरात सकाळी सकाळी एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेत मॉर्निंग वॉक' ला निघालेल्या वयोवृद्धाला बारामती मधील एका खाजगी कंपनीच्या बसने चिरडले असून वायोवृद्धाचा जागीच मृत्यु झाला आहे. या अपघातात बारामतीतील जेष्ठ मुद्रक व्यवसायिक मोतिलाल उत्तमचंद दोशी ( वय 82 वर्षे ) यांचा मृत्यु झाला असून दोशी हे पहाटे बारामती मधील नगरपालिकेसमोरून भिगवणरोड दिशेने मॉर्निंग वॉक' ला निघाले असताना मागुन आलेल्या एका खाजगी कंपनीच्या बसने बस क्र. MH01 L7309 ने त्यांना चिरडले त्यांच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. या प्रकरणी बस चालक सुनील पांडुरंग शेंडगे वय- ३९ रा. खंडोबानगर,बारामती मुळ रा. भिगवण ता.इंदापूर यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्ष ज्यावेळी घटना घडली तेव्हा बस चालक याने जागेवर बस न थांबविता एवढा मोठा अपघात होवून देखील अपघातात गंभीर व्यक्तीला उपचारासाठी मदत न करता चालक बससह पळून गेला त्यामुळे नागरिकांकडून झालेल्या घटनेचा प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. ...