पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मा. पालकमंत्री अजित पवार, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात आझाद मैदान, मुंबई येथे जागा मालकांचे आज उपोषण

इमेज
बारामती: दि. २६ (महाराज्य टाईम्स) बारामती मेडद येथे म्हाडा प्राधिकरणाकडून खरेदीखत करून घेतलेल्या मालकीच्या जमिनी परस्पर अजित पवार यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दबाव टाकून आमच्या जमिनीच्या नोंदी रद्द करून प्रकरण हायकोर्ट मुंबई येथे न्याय प्रविष्ट असताना आयुर्वेदिक कॉलेज चे नाव लावून बांधकाम चालू केले आहे. त्या निर्णयाविरोधात मुंबई येथे प्लॉट धारक उपोषण ला गुरुवार 26 ऑक्टोबर रोजी बसणार आहेत.        मौजे मेडद ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. ४९४/२ ही जागा म्हाडा प्राधीकरण, पुणे यांच्या नावावर होती त्यानंतर सदर जागा सह जिल्हा निबंधक वर्ग-१ व जिल्हाधीकारी मुद्रांक पुणे ग्रामीण यांच्या कडे कायदेशीर नोंदणी शुल्क भरून मानीव खरेदीखताने जवळपास २०६ व्यक्तींनी खरेदीखत करून विकत घेतली आहे. प्लॉट धारकांच्या नावावर म्हाडा प्राधीकरणाने सदर जागेची ताबा पावती नकाशासह सक्षम अधिकारी यांच्या सही शिक्क्यानीशी दिली आहे. सदर जागा अजुनही प्लॉट मालकांच्या कब्जे वहिवाटीत आहे. अजुन त्यांनी कुणालाही खरेदीखत करून अगर कायदेशीर विक्री करून ताबा दिला नाही. किंवा म्हाडा प्राधिकरणाने सुध्दा त...

मोहोळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी !! सव्वा सहा कोटीचे मफेड्रोन ड्रग्स पकडले. २ जण ताब्यात

इमेज
मोहोळ,: (प्रभाकर बावधनकर) सोलापुर ग्रामीण पोलीस दलाच्या कारवाईत आज पुणे सोलापूर महामार्गावर दोन जणांकडून सहा कोटी दोन लाख रुपयांचे मेफेड्रॉन व त्यापासून ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल दहा लाख 9 हजार रुपये असा 6 कोटी 12 लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला. मोहोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रदीप झालटे यांना 17 ऑक्टोबर रोजी त्यांच्या कार्यालयात खबऱ्यांकडून अशी माहिती मिळाली की, सोलापुर ते पुणे हायवे रस्त्यावर देवडी गावच्या फाट्यावर एका हॉटेलजवळ (ता. मोहोळ, जिल्हा. सोलापुर) येथे काहीजण मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विकी करण्याकरीता येणार आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर श्री झालटे यांनी मोहोळचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना याची माहिती दिली त्यानंतर घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांना या संदर्भातील माहिती दिली त्यांच्या सूचनावरून सापळा रचला. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यातील साधे वेशातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके तयार करून, मागण्यांचे गटविकास अधिकारी मह...

बारामती मध्ये प्रथमच, श्री कुलदेवी सह साडेतीन शक्तीपीठांचा मूर्तीरूप दर्शन महोत्सव

इमेज
. (बारामती : महाराज्य टाईम्स) श्री तुळजाभवानी माता, करवीरनिवासीनी श्री अंबाबाई, वणीची श्री सप्तश्रृंगी माता, माहूरची श्री रेणुका माता तसेच राजस्थान आणि गुजरात मधील जैन, माहेश्वरी, सकल राजस्थानी समाजाच्या जवळपास 48 कुलदेवींची हुबेहूब मूर्ती ही नवरात्रीच्या पावन दिवसात प्रथमच आपल्या बारामती नगरीमध्ये दर्शन, पूजा-अर्चना साठी श्री कुलदेवी दर्शन महोत्सव समितीच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. शहरातील श्री महावीर भवन येथे शनिवारी, 21 ऑक्टोबर ला दुपारी 3 वाजल्यापासून तसेच 22 आणि 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते संध्याकाळी 9 पर्यंत दर्शन सेवा उपलब्ध राहणार आहे. या महोत्सवामध्ये सर्व कुलदेवींची रोज आरती, भजन चे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व कुलदेवींची थोडक्यात माहिती, आख्यायिका यांचे सुद्धा माहितीपत्रक हे लावले जाणार आहेत... या पुण्यदायी, अलौकिक, सामाजिक तथा धार्मिक महोत्सवाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आव्हान श्री कुलदेवी दर्शन महोत्सव समितीचे सदस्य स्वप्निल मुथा, गुणेश भेडा, सीए सम्राट सोमाणी, मंदार सिकची, सचिन बोरा, सुयोग मुथा, गौरव कोठाडिया, सचिन मुथा यांनी केले आहे. ...

जुनी मंडई गाळ्यांवर पडला हातोड्याचा घाव !! गाळेधारकांनीं घेतली अजितदादांकडे धाव !!

इमेज
बारामती: (महाराज्य टाईम्स) बारामती शहरातील गुणवडी चौक जवळील जुनी भाजी मंडई मध्ये अनेक वर्ष भाजी मंडई भरत होती. गणेश मार्केट नवीन झाल्यावर सर्व भाजी विक्री तिकडे चालू झाली. जुन्या जागेत बारामती नगर परिषदेचे जवळपास २०० गाळेधारक व्यावसायिक अनेक वर्षापासून व्यवसाय करत आहेत. परंतु आता विकासाचे वारे शहरात जोरात वाहत असून त्यामुळे जुनी मंडई पाडून त्याजागी कमर्शिअल कॉम्प्लेक्स बांधायचे निश्चित झाले आहे.        परंतु जुन्या गाळेधारकांना कुठेही विश्वासात न घेता किंवा त्यांना जमेत न धरता त्यांना पर्यायी योग्य जागा कुठे देणार हे निश्चित न करता गाळ्यावर हातोडा मारून प्रशासनाने ऐन सणाच्या काळात कारवाई ची दहशत निर्माण केल्याचे परवा दिसून आले. ह्या अचानक केलेल्या कारवाई मूळे गाळेधारकांमध्ये प्रचंड चीड व आक्रोश निर्माण झाला आहे. नगर परिषदकडून कंत्रादार उत्तम धोत्रे याकडून तोडफोड करण्यात आली. त्यावेळेस प्रचंड तणाव व वाद निर्माण झाला होता. वरून पडण्याचा आदेश असल्यामुळे कंत्राटदार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. परंतु लोकांच्या रोषामुळे काम थांबवण्यात आले.      ...

बारामती कराटे क्लब आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धा चे आज आयोजन !! नक्की बघावी अशी स्पर्धा

इमेज
बारामती: (महाराज्य टाईम्स ) रविवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी ' बारामती कराटे क्लब ' आयोजित ओपन राज्यस्तरीय कराटे स्पर्धा ' राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन, भिगवन रोड, बारामती ' येथे संपन्न होत आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये *महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यातील  तब्बल ४४८ कराटे खेळाडू* सहभागी झाले आहेत. त्यामुळेच अत्यंत रोमांचक होणाऱ्या या ओपन राज्यस्तरीय कराटे स्पर्धांकरिता *सकाळी ९ पासून ते  संध्याकाळी ६ पर्यंत सर्व नागरिकांना पाहण्यास मिळणार आहेत. आज रविवार सुट्टी असल्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना नक्की बघण्यासाठी घेऊन जावे अशी ही रोमांचकारी व शरीराचा कस लावणारी स्पर्धा आहे. आजकाल मोबाईल, टीवी मूळे खेळ कमी झाले आहेत. त्यामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. कराटे म्हणजे शक्ती आणि युक्ती चा खेळ आहे. तरी चुकवू नये असे काही असा खेळ बघण्यासाठी नक्की ज्याने महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध कराटे चॅम्पियन मिननाथ रमेश भोकरे यांच्या मार्गदर्शनाने सादर स्पर्धा पार पडणार आहे. 

सांस्कृतिक क्षेत्रात सिने अभिनेते महामुनी यांनी महाराष्ट्रभर वेगळी ओळख निर्माण केली -अॕड. कांबळे

इमेज
 * मोहोळ दि.(प्रभाकर बावधनकर): प्रतिकूल परिस्थिती असतानाही सांस्कृतिक क्षेत्रात मोहोळ गावाचे नाव संबंध महाराष्ट्रभर उंचावले व या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली व अडगळीत राहिलेल्या कलाकारांनां सातत्याने निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करीत विचारपीठ तयार करण्याचे काम सिनेअभिनेते अमोल महामुनी यांनी केलेचे प्रतिपादन विनोद कांबळे यांनी यावेळी व्यक्त केले.*      सामाजिक क्षेत्रापासून ते सांस्कृतिक कार्यात ठसा उमटविलेलं अष्टपैलू व्यक्तीमत्व अमोल महामुनी यांचा वाढदिवस शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.      याप्रसंगी राजकारण विरहित शासकीय समितीवर कार्यरत असणारे राजन घाडगे, भीम युवा प्रतिष्ठानचे विनोद कांबळे, ह.ब.प. शरद शिंगाडे, रंगभूमी प्रतिष्ठानचे हणमंत काळे, दिनेश नरळे, अनुरथ शिंगाडे, शिव सेनेचे प्रवक्ते बाळासाहेब वाघमोडे, पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष भारत नाईक, उद्योजक अविनाश वाघमोडे, अक्षय पोतदार, गणेश व्यवहारे, मोहसीन शेख, संस्कार महामुनी, फोटो ग्राफर असोसिएशन अध्यक्ष हरिभ...

नाराज मंत्र्यांनी पाहिजे ते जिल्हे मिळवले ! एसटीच्या प्रवाशांना सुविधा कधी मिळणार? पालक झालेले मंत्री लक्ष देणार का??

इमेज
     (स्टँडवर प्रचंड गर्दी पण एकसुद्धा गाडी उपलब्ध नाही) बारामती(दि.५): बारामती शहरात कसबा येथे तात्पुरते केलेले एसटी बसस्थानकात प्रवाशांना प्रचंड मनस्ताप आणि त्रास सोसावा लागत असल्याचे दिसुन आले आहे. स्वच्छ सुंदर बारामतीत प्रवाशांचे हाल एसटी गाड्यांच्या अनियंत्रित परिस्थितीमुळे रोजच होत आहेत.   बारामतीत विमानतळासारखे प्रचंड  भव्य व सुंदर असे एसटी बसस्थानक नागरीकांच्या कष्टाच्या पैशातुन करोडो रूपये खर्च करून करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाल्यापासुन पर्यायी जागा म्हणून कसबा येथे कै.गुलाबराव ढवाण पाटील चौकात सुरू करण्यात आले होते. नवीन बस स्थानकाचे काम तब्बल दोन वर्षापासुन सुरू असुन कधी पुर्ण होईल याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.     सुट्टी संपल्यामुळे स्टँडवर प्रवाशांची प्रचंड गर्दी रोजच दिसून येते. नियमित बाहेरगावी जाणारे प्रवासी असतातच पण कुटुंबाला घेऊन जाणारे प्रवासी सध्या मोठ्या प्रमाणात आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळा तर वाहतूक नियंत्रण केबिनमध्ये विचारले तर निट उत्तर मिळतच नाही. त्यामुळे संपुर्ण कुटुंबाला उन्हात, पावसा...

राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे.

इमेज
महाराज्य टाईम्स दि. ४ :  सत्तेत आल्यापासून काही ना काही कारणानं सरकारमध्ये कुरबुर सुरु असल्याचं दिसून येत आहे. महायुतीचं सरकार येऊन तीन महिने उलटले तरी अद्याप पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटत नव्हता अखेर अजित पवारांच्या (Ajit Pawar) नाराजीनंतर  तिढा सुटला. राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. पालकमंत्री पदासाठीची यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर मनासारखा जिल्हा न मिळाल्यामुळे अजित पवार, दादा भुसे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. पुण्याचे पालकमंत्रिपद जरी  चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागताना दिसत होते. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवारांनी गणे...

*विद्यार्थी पटसंख्या व उपस्थिती वाढावी विदयार्थींनींना शालेय साहित्याचे वाटप‎*

इमेज
गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांचा नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम मोहोळ दि. ३ (प्रभाकर बावधनकर) : शिक्षण ही व्यक्तीची अंतर्निहित क्षमता आणि व्यक्तिमत्व विकसित करण्याची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया विद्यार्थी विद्यार्थिनींना भविष्यात समाजापुढे प्रौढ व्यक्तीची भूमिका बजावण्यासाठी सरस राहणार असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांनी व्यक्त केले.     मोहोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा नंबर चार येथे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी तसेच विद्यार्थ्यांची हजेरी शंभर टक्के राहावी याकरिता गटविकास अधिकारी या पदावर कार्यरत झाल्यानंतर शाळकरी विद्यार्थिनींना‎ शालेय साहित्याचे वाटप करण्याचे ठरविले होते त्यानुसार शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते .     याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रीती घाडगे, केंद्र प्रमुख सुरेश पवार, मुख्याध्यापक संजय महामुनी, बाळासाहेब कारंडे, हजरत शेख, महेश काटकर, सुनंदा हिलाले, अर्चना बदर, शमींमबानो खान, गोपाळ सितारे, अझरुद्दीन शेख, बंटी...

आपले बालक सुदृढ व निरोगी होण्यासाठी मोदामृत पोषक आहार अभियान उद्या २ आँक्टोबर रोजी नटराज नाट्य मंडळ येथे

इमेज
बारामती: दि. १ श्री सदगुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूर चे विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर यांच्या व नटराज नाट्य कला मंदिर बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने " आपले बालक सुदृढ बालक व निरोगी होण्यासाठी पोषक मदामृत आहार अभियान " चे आयोजन बारामती शहरांमध्ये उद्या सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 11 ते 2 या वेळेमध्ये होणार आहे.         सदर कार्यक्रमाला मा.अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे सकाळी ९.30 मि. उपस्थित राहणार आहेत. सदर अभियानामध्ये - मुलांच्या वजनात अपेक्षित वाढ दिसत नसल्यास मुलं सतत आजारी पडत असल्यास  रोज पाय दुखतात अशी वारंवार तक्रार करत असल्यास मुलांच्या हालचाली मंद झाल्या असल्यास उत्साह नसणे तसेच  थोडे खेळल्यानंतर देखील मूल थकले /दमले होते  मुले सतत चिडचिड करत असतील.  भूक नसणे व एकाग्रता स्मृती कमी असणे  अन्न खाण्याची इच्छा न होणे  अचानक जुलाब होणे   अशा बालकांच्या समस्या बाबत  मोफत तपासणी श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर यांचे तज्ञ वैद्य डॉ...