पुण्यातील विषारी दारुकांड प्रकरणामुळे बारामती शहरात पोलिस व उत्पादन शुल्क अधिकार्यांची धडक कारवाई ! वाईन,बियर शाॅपवर सुद्धा छापा !
महाराज्य टाईम्स: पुणे शहरात विषारी दारु पिल्यामुळे २२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत सक्त चौकशी व कारवाईचे आदेश दिल्यामुळे अनेक पोलिस व उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी यांना निष्काळजीपणा मुळे सेवेतून निलंबित करण्यात आले होते. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे बारामती शहरात सुध्दा पोलिस व उत्पादन शुल्क अधिकार्यांनी धडक छापा टाकून अनेक ठिकाणी अवैध दारु बनवण्यासाठी वापरली जाणारी रसायने व इतर साहित्य नष्ट केले आहे. प्रामुख्याने आमराई परिसरात शाळेजवळ हि कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. बारामती शहरात अचानक छापा व कारवाई : आज बारामती शहरात पोलिस व उत्पादन शुल्क अधिकार्यांनी अचानक छापा टाकून बेकायदेशीरपणे दारु बनवणारे व विकणार्यांवर धाडसी कारवाई केल्यामुळे अनेक ठिकाणी संबधित लोकांना धडकी भरल्याचे दिसून आले. अनेक वाईन शाॅप व बियर शाॅपी यांना कायद्यानुसार दारुची फक्त रिटेल विक्री करण्याची परवानगी आहे. परंतू जास्त फायद्याच्या स्वार्थासाठी दारु पिणार्यांना तेथेच स्नॅक्स व ग्लास देऊन पिण्याची व्यवस्था क...