पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला २५ वर्षे पूर्ण; भारतातील ज्येष्ठ नागरिक निवास क्षेत्रात ६,००० रहिवाशांचा टप्पा, भविष्याभिमुख दृष्टीकोन अधोरेखित

इमेज
पुणे, महाराष्ट्र (महाराज्य टाईम्स): — नवे निवासी प्रकल्प साकारण्यात अग्रणी असलेल्या परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) प्रा. लि. या नामांकित विकसकाच्या ‘अथश्री’ या ज्येष्ठ नागरिक निवास उपक्रमाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतातील संघटित ज्येष्ठ नागरिक निवास क्षेत्राच्या घडणीत ‘अथश्री’ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दूरदृष्टीतून सुरू झालेला हा उपक्रम आज सन्मान, स्वावलंबन आणि समुदायाधारित जीवनमूल्यांवर आधारलेली सक्षम व्यवस्था बनली आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्याचे औचित्य साधत, वडोदरा येथे ‘अथश्री’च्या ६,००० व्या रहिवाशाला घराचा ताबा देण्याचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात रहिवासी, व्यवस्थापन आणि भागीदार सहभागी झाले होते. आज ‘अथश्री’चे जाळे सुमारे १६ ज्येष्ठ नागरिक वसाहतींमध्ये विस्तारले असून, विविध शहरांमध्ये ३,००० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना निवास व सुविधा दिल्या जात आहेत. कार्यक्रमाची सुरुवात परांजपे स्कीम्सचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांच्या भाषणाने झाली. त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांनी ‘अथश्री’चा प्रवास आणि वाढती गरज याविषयी मनोगत व्यक्त केले. यानंत...

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्जः प्रकृती पूर्णपणे उत्तम-"सिल्व्हर ओक" वर सक्तीची विश्रांती

इमेज
डॉक्टरांचा पूर्ण विश्रांती घेण्याचा अन् प्रवास टाळण्याचा सल्ला महाराज्य टाईम्स:(बारामती) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून, नियमित वैद्यकीय तपासणीनंतर ते आता आपल्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. सोमवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. शरद पवार यांना सोमवारी सकाळी प्रकृती अस्वास्थेमुळे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात नेण्यात आले होते. ही तपासणी पूर्णपणे 'रुटीन चेकअप'चा भाग होती. डॉक्टरांनी त्यांच्या सर्व आवश्यक चाचण्या केल्या असून त्याचे अहवाल सकारात्मक आले आहेत. तथापि, वाढते वय आणि सततचे दौरे यामुळे येणारा थकवा लक्षात घेता, डॉक्टरांनी त्यांना काही काळ सक्तीची विश्रांती घेण्याचा आणि प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. सक्तीची विश्रांती 'सिल्व्हर ओक'वरच शरद पवार साहेबांची तब्येत उत्तम असून ब्रिज कँडी मधून त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या सि...

माझे सर्वस्व हरपले, पण मी खचणार नाही, तुमचा विकास हाच दादांप्रमाणे माझाही ध्यास: सुनेत्रा पवार भावुक

इमेज
(अहिल्यादेवी, येसुबाईंप्रमाणे निष्ठेने जनतेची सेवा करेल; प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार भावुक) महाराज्य टाईम्स: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. बारामतीच्या ऐतिहासिक शारदा प्रांगणात विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. यावेळी आपल्या पतीच्या आठवणींनी सुनेत्रा पवार यांना अनेकदा गहिवरून आले. मी माझे सर्वस्व हरपले, पण मी थांबणार नाही, खचणार नाही, मागे हटणार नाही, असे त्यांनी म्हटले.    कारभार चालवला आणि आपल्या लोकांना न्याय दिला, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेल, असे आश्वासन बारामतीच्या जनतेला दिले. सुनेत्रा पवार म्हणाल्या, या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सुरुवातीलाच मी मनापासून आभार मानते. पवार साहेब व सुप्रिया सुळेंचे विशेष आभार मानते. मला पाठिंबा उत्स्फुर्तपणे जाहीर पाठिंबा देणाऱ्या संस्थ आणि संघटनांचे ऋण व्यक्त करते. हा पाठिंबा म्हणजे बारामतीच्या भवितव्याबद्दलची एकत्रित बांधिलकी आहे, असे मी मानते. पवार कुटुंबाच्या सामाजिक आणि राजकीय वारशाची...

महात्मा बसवेश्वर जयंती साजरी: आरोग्य शिबिरात १०० नागरिकांनी घेतला लाभ

इमेज
बारामती : (महाराज्य टाईम्स) महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त लिंगायत समाजाच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात विविध रुग्णालयांच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात आली. मुक्ताई हॉस्पिटलच्या डॉ. मीनल गवसणे यांनी त्वचारोग तपासणी केली. बारामती हॉस्पिटलच्या वतीने बीपी, शुगर, ऑक्सिजन व ईसीजी तपासणी करण्यात आली. एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्याची सुविधा तसेच अल्प दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. शिवम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वेळापूर यांच्या वतीने हार्निया, अपेंडिक्स व मुतखडा यासंदर्भात तपासणी करण्यात आली.             या शिबिराचा सुमारे १०० समाज बांधवांनी लाभ घेतला. नेत्र तपासणीदरम्यान ३ मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत. याशिवाय डॉ. मीनल गवसणे यांनी १० मे ते २० मे दरम्यान समाज बांधवांसाठी मोफत सल्ला देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी बारामती शहर पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी, नगरसेवक यशपाल पोटे, नगरसेविका अनुप्...

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

इमेज
महाराज्य टाईम्स: बारामतीचे विकास पुरुष म्हणून जनतेने स्व.अजितदादांना अगदी मनापासून शेवटच्या माणसाने उपाधी दिली होती. आपल्या ह्रदयात एक आदराची जागा निर्माण केली होती. परंतू स्व.अजितदादांच्या आकस्मिक अपघाती निधनानंतर बारामती पोरकी झाली त्याच प्रमाणें विविध प्रशासनावरील अंकुश व वचक सुद्धा संपला असे एकंदरीत चित्र बघायला मिळत आहे.        स्व.अजितदादांची कामाची पद्धत अत्यंत गतिशील व वक्तशीर होती. त्यामुळे दर शनिवार रविवारी पहाटे पासुनच त्यांचा झंजावात शहरामध्ये व तालुक्यामध्ये पहायला मिळत होता. अनेक विभागाचे अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारि, मुख्याधिकारी, पोलिस प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी दादांच्या अवतीभोवती असायचेच. त्यांना पहाटेच सर्व तयारीने दादांच्या बंगल्यावर हजर रहावे लागायचेच. कारण दादा जनतेच्या विविध कामासंदर्भात कधी कोणाला हाक मारतील सांगता येत नव्हते. त्यामुळे दादांचा प्रचंड अंकुश व आदरयुक्त वचक प्रचंड प्रमाणात होता हे सर्वाना चांगलेच माहिती आहे.      परंतू सध्या अशी परिस्थिती आहे का प्रशासनाची कि त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे ? त...