पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्यांमध्ये भावी संशोधक, उद्योजक घडावेत यासाठी उर्मी संस्था,एलिव्हास लाईफ सायन्सेस यांचा उपक्रम संपन्न

इमेज
मोहोळ : (प्रभाकर बावधनकर).          मोहोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागरूक व्हावा,या विद्यार्थ्यांमधून भावी संशोधक, उद्योजक घडावेत अशा उद्देशाने ऊर्मी संस्था एलिव्हास लाइफ सायन्सेस (पूर्वीची ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस) यांच्या सीएसआर निधीअंतर्गत "प्रोजेक्ट विग्यासा"राबवीत आहे.       मोहोळ तालुक्यातील ८ शाळांतील विद्यार्थ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम या प्रकल्पात राबविण्यात येत आहेत. शिक्षक प्रशिक्षण,जिगसॉ खेळातून आवर्त सारणी, ओरिगामी मायक्रोस्कोप,शाळांना प्रयोगशाळा साहित्य, इ लर्निंग सुविधा, सायन्स सेंटरला भेट असे अनेक उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून यंदा आयसर,पुणे यांचे विज्ञान, गणित शिक्षकांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले आहे.       यामध्ये DIY kit वापरून विज्ञान,गणिताच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करणे, NEP ला अनुसरून STEM विषयाचं मार्गदर्शन असणार आहे. मोहोळ तालुक्यातील विद्यार्थी प्रेमी आणि विज्ञान, गणित विषयांना वाहून घेतलेले शिक्षकम...

बारामती तालुका स्वातंत्र सैनिक संघटनेच्या वतीने ३० जानेवारी रोजी हुतात्मा दिनाचे आयोजन !!

इमेज
महाराज्य टाईम्स: ३० जानेवारी १९४८ मध्ये प्रार्थना सभेत महात्मा गांधीजी यांची हत्या करण्यात आली.ज्या महात्मा गांधीजींनी साधी राहणी व उच्च विचार सारणी अंगीकृत करून या देशातील गरीब जनतेला अंगावर नेसावयास कपडा नसल्याने स्वतः साधा खादीचा पंचा व खादीचे उपरणे परिधान केला. आपल्या भारत देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था ग्रामस्वराज्य या दृष्टीने त्याकाळात बळकट होती.ती ब्रिटिशांनी उद्धवस्त केली होती.तिचे पुनर्जीवन करण्याचा महात्मा गांधीजींनी ध्यास घेतला होता.तसेच त्यांनी स्वच्छतेचे महत्व त्याकाळी सांगितले होते.त्याची आज  देशाला गरज आहे.तरी सर्वांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा.म्हणजे संपूर्ण देश स्वच्छ व सूंदर होऊन भारतातील सर्व नागरिक निरोगी राहतील.व भारतातील प्रत्येक नागरिकाने कमीत कमी एकतरी खादीचा पोशाख परिधान करावा हीच खरी महात्मा गांधीजींना आदरांजली (श्रद्धांजली) होईल व महात्मा गांधीजींचे खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण होईल.संपूर्ण जगामध्ये या महामानवाचे अनेक देशात त्यांची स्मृती आणि आठवण साजरी केली जाते.अनेक जागतिक जेष्ठ विचारवंतांनी असे कथन केले आहे की,अशा प्रगल्भ विचारांचा आणि कृतीशीलतेचा माणू...

मेस्ट्रो रिअलटेक आणि कृष्णव डेव्हलपर्स यां भागीदारी: 'प्रोजेक्ट कोडनेम गोल्डनजेजुरी ' चे उद्घाटन

इमेज
मेस्ट्रो रिअलटेक  आणि कृष्णव  डेव्हलपर्स  यां भागीदारी: 'प्रोजेक्ट कोडनेम गोल्डनजेजुरी ' चे उद्घाटन !! पुणे, १८ जानेवारी २०२५: (महाराज्य टाईम्स) मेस्ट्रो , रिअलटेक एक प्रसिद्ध रणनीतिक रिअल इस्टेट भागीदार, Krishnav Developers सोबत भागीदारी करत अत्यंत प्रतीक्षित प्रोजेक्ट कोडनेम GOLDEN JEJURI लाँच करण्यासाठी उत्सुक आहे. हा प्रकल्प जेऊरीच्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि शांत परिसरात स्थित असून वारसा, शांतता आणि आधुनिक जोडणी यांचे संमिश्रण करण्याचे आश्वासन देतो, जे विवेकी गुंतवणूकदार आणि घरमालकांसाठी आदर्श ठरेल.   आयकॉनिक जेऊरी मंदिराजवळ, ज्याचे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे, प्रोजेक्ट कोडनेम GOLDEN JEJURI हे वारसा आणि निसर्गाच्या समृद्धतेच्या सान्निध्यात राहण्याची अनोखी संधी प्रदान करते. हा प्रकल्प १६ एकरांमध्ये पसरलेला असून १९६ उत्कृष्ट नियोजित एनए बंगल्याचे प्लॉट्स समाविष्ट आहेत, जे १,००० ते ४,००० चौरस फूट पर्यंत उपलब्ध आहेत. हे प्लॉट तात्काळ ताब्यात घेण्यासाठी तयार असून, गुंतवणूकदारांसाठी या क्षेत्राच्या वाढत्या मूल्यावर भांडवल उभारण्याची अपूर्व संधी उप...

मोफत बाल आरोग्य, रक्त तपासणी व औषधे वाटप शिबिराचे आयोजन ! डॉ. प्रदीप पाटकर व डॉ. प्रियंका पाटकर यांचा उपक्रम

इमेज
डॉ. प्रदीप पाटकर व डॉ. प्रियंका पाटकर यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम मोहोळ दि.२५ जानेवारी ( प्रभाकर बावधनकर ) : ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पाटकर हॉस्पिटल मोहोळ यांच्या वतीने मोहोळ शहर व तालुक्यातील लहान बालकासाठी 'मोफत आरोग्य तपासणी व औषधे रक्त तपासणीचे' शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.    यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी विजयकुमार देशमुख, एकात्मिक बाल विकास अधिकारी वरिष्ठ लिपिक शिलादेवी दाढे, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष नसीर मोमीन, राजू शिंदे , मधुकर पाटील दिनेश सातपुते, सचिन गवळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य राजन घाडगे आदि. प्रमुख मान्यवर उपस्थित होते.     कार्यक्रमाच्या प्रारंभी आरोग्याची देवता  धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित डॉ. प्रदीप पाटकर व डॉ. प्रियंका पाटकर,  सहाय्यक गट विकास अधिकारी विजयकुमार देशमुख, एकात्मिक बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वरिष्ठ लिपिक शिलादेवी दाढे, मोहोळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष नसीर मोमीन व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले.     आरोग्य क्षेत्रा...

अंगणवाडी सेविकेचा कर्तव्यावर असतानाच ह्रयविकाराच्या झटक्याने मृत्यू / मोहोळ परिसरात हळहळ व्यक्त

इमेज
महाराज्य टाईम्स (प्रभाकर बावधनकर): दि. २५ जानेवारी मोहोळ - शाळेत कार्यरत असणाऱ्या एका अंगणवाडी सेविकेला शाळेतच हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना औंढी ताल, मोहोळ येथील शिंदे वस्ती शाळेत दुपारी एक वाजता घडली. अंजली सागर घोडके वय 24 रा वरकुटे असे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे.         मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, अंजली घोडके या औंढी येथील शिंदे वस्ती शाळेत अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान गुरुवार ता 23 रोजी दुपारी एक वाजता त्यांना चक्कर आली, त्यामुळे त्यांना तातडीने मोहोळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी अंजली यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.     या घटनेची खबर महेश मधुकर घोडके (वय-37, रा. वरकुटे) यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

२५ वर्षानंतर पुन्हा भरली शाहू हायस्कूलची माजी विद्यार्थ्यांची शाळा !! मोठे अधिकारी, उद्योजक झालेले भेटले जुने मित्र !!

इमेज
महाराज्य टाईम्स : २५ वर्षांनी पुन्हा एकत्र आले २०००-२००१ साली शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आठणींना पुन्हा उजाळा मिळाला कार्यक्रमास 166 माजी विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते. निमित्त होते बारामती शहरातील श्री छत्रपती शाहू हायस्कूल व जुनिअर कॉलेज च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे ! २०००- २००१ साली दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच श्री छत्रपती शाहू हायस्कूल बारामती या ठिकाणी पार पडले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सध्याचे शाळेचे प्राचार्य श्री गणपत तावरे सर उपस्थित होते.                     त्याचबरोबर व्हि बी शिंदे, के बी जाधव, एम जी शिंदे, टी एस जरांडे, डी एन घाडगे, व्ही जी जाधव, दुधाने सर, गावडे सर, साठे सर, मोमीन सर, शिरकांडे सर, के डी पवार, मांडके सर, एस एस जगदाळे, पवार मॅडम, शिरकांडे मॅडम इत्यादी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता दहावीच्या प्रत्येक तुकडीचे एक ...