पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्हीएसआर विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांचा नकार? आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार आक्रमक

इमेज
महाराज्य टाईम्स: (बारामती) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर पवार कुटुंब आक्रमक झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, संबंधित कंपन्या आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. त्यांच्या भूमिकेला आता अजित पवार यांचे दुसरे पुतणे युगेंद्र पवार यांनीही जोरदार पाठिंबा दिला आहे. दोघेही मिळून व्हीएसआर कंपनीविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी दोघेही बारामती पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. मात्र, पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला नाही. त्यानंतर रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले. समर्थकांनीही जोरदार घोषणाबाजी केली. (स्व.अजितदादांवर प्रेम व निष्ठा असणार्या बारामतीकरांची उपस्थिती)  त्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी रोहित पवार यांनी देशातील कोणत्याही नागरिकाला एफआरआय दाखल करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. एफआरआय दाखल करण्यास नकार देण्यात आल्याने रोहित पवार यांनी संबंधीत विमान ...

भिगवण घटनेच्या निषेधार्थ बारामतीकरांनी कडकडीत बंद करुन दाखवली सहानुभूती! !

इमेज
     (इंदापुर चौक गुनवडी चौक परिसर) महाराज्य टाईम्स:(बारामती)      भिगवण येथे हिंदु समाजातील मुलीला पळवून नेण्याच्या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे काल बारामती शहर व परिसरातील व्यवसाय व व्यापार सोमवार दि.२३ फेब्रुवारी रोजी बंद ठेवण्याबाबत बारामती व्यापारी महासंघाला निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने बारामतीकरांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद ठेऊन घडलेल्या गंभीर घटनेबद्दल आपली संवेदना व्यक्त केली आहे.               (सिनेमा रोड परिसर)       शहरातील.लहान मोठे दुकानदार, कापड, स्टेशनरी, किराणा, मेडिकल दुकाने विशेष करुन ज्यांचे हातावरचे पोट आहे अशा चहाच्या, पानाच्या छोट्या टपर्या, हातगाडेवाले यांनी संवेदनशील विषयामुळे आपली सहानभुती व्यवसाय बंद ठेऊन व्यक्त केली.     व्यापारी महासंघाच्या वतीने आवाहन केलेले अध्यक्ष सोमाणी यांनी सुद्धा त्यांचे हुंडाई चारचाकी वाहनांचे शोरुम, बजाज दुचाकी वाहनांचे शोरुम सकाळ पासून उघडलेच नसल्याचे दिसून आले. शेकडो कामगारांना थेट दुपारी येण्याच्य...

भिगवण घटनेच्या निषेधार्थ बारामती बंद : व्यापारी महासंघ व सकल हिंदु समाजाच्या वतीने उद्या २३ रोजी बारामती बंद !!

इमेज
महाराज्य टाईम्स (बारामती)      भिगवण येथे हिंदु समाजातील मुलीला पळवून नेण्याच्या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे आज बारामती शहर व परिसरातील व्यवसाय व व्यापार सोमवार दि.२३ फेब्रुवारी रोजी बंद ठेवण्याबाबत बारामती व्यापारी महासंघाला निवेदन देण्यात आले आहे.       या निवेदनास पाठिंबा देत बारामती व्यापारी महासंघातर्फे पदाधिकार्यांची व सकल हिंदु समाजाच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सकारात्मक पद्धतीने पार पडली आहे. बैठकीत सर्वानुमते उद्या सोमवार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत बारामती शहरातील बाजारपेठेतील सर्व प्रकारचे व्यापारी व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारी १२ नंतर सर्व व्यापार्यांनी व्यवहार पुन्हा दिवसभर सुरु करावेत असे कळविण्यात आले आहे.      सदर बंद शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात यावा, तसेच या बंदमध्ये सर्व व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन बारामती व्यापारी महासंघातर्फे अध्यक्ष सुशिलकुमार सोमाणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सोडणार नाही : उपमुख्यमंत्रि सुनेत्रा पवार

इमेज
महाराज्य टाईम्स: महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे भव्य शासकीय सोहळा पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रथमच शासकीय व्यासपीठावरून मनोगत व्यक्त केले. भाषण करताना त्या भावुक झाल्याचे दिसून आले. राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी जनतेला सुखी-समाधानी ठेव. शिवरायांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचे बळ आम्हा सर्वांना दे, अशी प्रार्थना त्यांनी आई शिवाई देवीच्या चरणी केली. शिवनेरीवर यापूर्वी अनेकदा वंदनासाठी आल्याचे सांगत त्यांनी आजचा दिवस विशेष आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे नमूद केले. नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, शपथ घेताना त्यांच्या डोळ्यांसमोर जिजाऊ माँसाहेब उभ्या होत्या. जिजाऊंनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, तर स्वराज्याची प्रेरणा आणि संकटांशी सामना करण्याची ताकद दिली. तीच प्रेरणा आजही मार्गदर्शक आहे, असे त्यांनी सांगितले. शिवरायांच्या जन्मभूमीवर बोलताना अंगावर काटा आला असल्याचे त्यांनी व्यक्त केले. आपण सर्व शिवरायांचे मावळे आहोत, ही भावना त्य...

श्रीरामदास नवमी सप्ताहात सौ.विनया कुलकर्णी–उत्पात यांचे प्रभावी निरूपण

इमेज
भक्तीमार्गाचे मर्म उलगडणारी भावपूर्ण पुष्पगुंफण श्रीरामदास नवमी सप्ताहात सौ. विनया कुलकर्णी–उत्पात यांचे प्रभावी निरूपण मोहोळ [ प्रभाकर बावधनकर ] : देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, मोहोळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीरामदास नवमी सप्ताह सोहळ्या अंतर्गत व्यंकटेश मंदिर, मोहोळ येथे सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी सौ. विनया कुलकर्णी–उत्पात यांनी “भक्ती पंथेची जावे” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण, भावस्पर्शी आणि अंतर्मुख करणारे निरूपण सादर केले.    भक्ती म्हणजे केवळ देवपूजा अथवा कर्मकांड नव्हे, तर ती संपूर्ण जीवन व्यापणारी एक मूल्यनिष्ठ जीवनशैली असल्याचे त्यांनी आपल्या ओघवत्या, सहज सुंदर शैलीत प्रभावीपणे विशद केले. संत परंपरेतील विचारांचे संदर्भ,        नामस्मरणाचे अनन्य साधारण महत्त्व, अहंकाराचा त्याग आणि ईश्वर प्राप्तीचा साधा पण सखोल मार्ग त्यांनी विविध उदाहरणांच्या आधारे उलगडून दाखवला. त्यांच्या शब् दसाधनेतून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला.    या भावपूर्ण निरूपणामुळे सं...

बारामती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी शिरिष कुलकर्णी यांची बिनविरोध निवड! !

इमेज
महाराज्य टाईम्स: (बारामती)       दि बारामती सहकारी बँक च्या अध्यक्षपदी अँड.शिरीष दत्तात्रय कुलकर्णी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर व्यवस्थापन मंडळ अध्यक्षपदी श्री. उद्भव सोपानराव गावडे यांची निवड करण्यात आली आहे.     मागील महिन्यामध्ये बारामती नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी असल्यामुळे बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी बँकेचा पदाचा राजीनामा दिला होता व त्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते नगराध्यक्ष म्हणून नियुक्त झाले त्यामुळे बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष पद रिक्त राहिले होते.                     कोणाची निवड होणार याची उत्सुकता बारामतीकरांना लागली होती. बारामती सहकारी बँकेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल 38 शाखा बँकेच्या असून प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. एवढी मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यास अत्यंत हुशार व अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची गरज होती त्य...

उपमुख्यमंत्रि सुनेत्रा पवार यांचा आज पहिला कराड दौरा: स्व.यशवंतराव चव्हाण समाधीचे घेणार दर्शन

इमेज
महाराज्य टाईम्स: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय प्रवासात ज्या विचारांचे स्थान सर्वोच्च होते, तोच 'यशवंतराव चव्हाण' यांच्या विचारांचा वारसा आता त्यांच्या पत्नी आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढे चालवताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज सुनेत्रा पवार पहिला दौरा सातारा जिल्ह्यातील कराड आणि फलटणला असणार आहे. सकाळी कराडच्या प्रीतीसंगम येथे जाऊन त्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतील. त्यानंतर अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार आहेत. अजित पवार यांच्या राजकीय आयुष्यात कराडचे प्रीतीसंगम आणि यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा नेहमीच प्रेरणास्थान राहिली. महत्त्वाच्या राजकीय निर्णयांपूर्वी किंवा संकटाच्या काळात अजितदादांनी नेहमीच या समाधीस्थळी नतमस्तक होऊन ऊर्जा मिळवली होती. आपल्या भाषणांमधूनही ते 'चव्हाणसाहेबांची विचारसरणी' हाच आपला आधार असल्याचे सांगायचे. आज सुनेत्रा पवार यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात प्रीतीसंगमावरून करून, आपण दादांचा हा वैचारिक वार...