तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

बारामती : ४ आँगस्ट (महाराज्य टाईम्स)
बारामती शहरातील केंद्र बिंदू मानला जाणारा व प्रचंड वर्दळीचा मानला जाणारा सध्या वादग्रस्त ठरलेला तीन हत्ती चौक येथे काही तासांपुर्वी भिषण अपघात घडला आहे. त्यामध्ये तीनजण गंभीर जखमी आहेत.
         बारामती शहरातील सर्वात वर्दळीचा चौक असलेला तीन हत्ती चौक सध्या त्याच्या वादग्रस्त सुधारणेच्या व नियोजणाच्या संदर्भात खुप चर्चेचा विषय झाला आहे. अत्यंत नियोजन शुन्य गोष्टींमुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले रोज नागरिक अनुभवत आहेत. दिवसभरात असंख्य वाहने येथून ये-जा करत असतात. पण ढिसाळ वाहतुकीचे नियोजन व रचना यामुळे अनेक वाहने रोज एकमेकांना धडकत असल्याचे स्थानिक परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे.
       काही तासापूर्वीच तीनहत्ती चौक येथे प्रचंड भिषण अपघात झाला असुन नटराज मंदिराजवळ दुचाकीवरुन भाऊ-बहिण येत असताना अचानक दुसरा दुचाकीस्वार समोरासमोर येऊन धडकल्यामुळे दुचाकीवरिल महिला गाडीवरुन जोरात उडून पडल्यामुळे डोक्याला प्रचंड मार लागून रक्तस्त्राव झाल्याने गंभीर जखमी झाली असुन शहरातील भोईटे हाँस्पिटल येथे तातडीने दाखल केले असुन दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी असुन त्यांना बारामती हाँस्पिटल येथे दाखल केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
     गंभीर जखमी झालेल्यांपैकी व्यक्तीं बारामतीतील प्रसिद्ध बेकरी व्यवसायिक ओवाळ कुटूंबातील सदस्य असल्याचे व वकील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
    या गंभीर घटनेमुळे वादग्रस्त ठरलेल्या व ढिसाळ नियोजन असलेल्या तीन हत्ती चौकाचे तीन तेरा वाजलेत का?  असा प्रश्न बारामतीकर विचारत आहेत याची दखल प्रशासन व राजकिय मंडळी घेणार का? आणि अजुन किती लोकांचे जीव विकासाच्या नावाखाली धोक्यात येणार ?  हा गंभीर प्रश्न नागरिकांना पडला आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक