जंगलबुक जंगल सफारी देखावा बघण्यासाठी नागरिकांची महात्मा गांधी चौक मंडळ मारवाड पेठ येथे प्रचंड गर्दी
बारामती: (महाराज टाईम्स) गणेशोत्सवानिमित्त बारामती शहरात वातावरण अत्यंत भक्तिमय व करमणुकीच्या कार्यक्रमांनी भारावुन गेले आहे. अनेक गणेशोत्सव मंडळांनी भव्य मंडप उभारले आहेत. लाईंटिंगचे देखावे सादर केले आहेत. तर काही मंडळांनी विविध करमणुकीचे कार्यक्रम, आँर्केस्ट्रा, डान्स जल्लोष, गाण्यांचे प्रसिद्ध कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रमाची मेजवाणी जणू काय नागरिकांना देण्यात आली आहे.
बारामती शहरातील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी चौक तरुण मंडळाने तब्बल ३५ वर्षाची परंपरा जपत अखंडपणे विविध विषयावरील, धार्मिक प्रसंगावर आधारित हलते देखावे सादर केलेले आहेत. लाखों रुपये खर्च करुन सजीव वाटणार्या विविध पात्रांच्या मूर्ती तयार करुन आधुनिक पद्धतीने त्यांना हलते बोलते करुन अनेक विषय देखाव्यांच्या माध्यमातून लोकांसमोर एक प्रसंग लोकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न गेल्या ३५ वर्षापासुन अखंडपणे केला जात आहे. सध्या बारामती शहरात एकमेव असे गणेश मंडळ असुन ज्यांनी कुठलाही डिजे, साऊंडच्या भिंती उभा न करता एक पारंपारिक गणेशोत्सव साजरा करत आहेत.
यावर्षी मंडळाने जंगल बुक जंगल सफारी हा देखावा सादर केला आहे. खुपच अप्रतिम असे हुबेहूब जंगलातील प्राण्यांसारखे दिसणारे प्रतिकृती ठेवल्या आहेत. त्या मुळ प्राण्यांच्या आकारात असल्यामुळे खरोखरच जिवंत वाटत आहेत. ते बघत असताना प्रत्येक्ष वाघ, सिंह, जिराफ, गेंडा, चिंपाजी माकड असे अनेक प्राणी बघायला मिळत आहेत.
बालगोपाळांना घेऊन अनेक कुटुंब हा देखावा बघण्यासाठी लांब लांबून येत आहे. प्रचंड गर्दी होत असताना दिसत.
अनेक आई वडिल आपल्या मुलांना प्राण्यांच्या अंगावर बसवून फोटो काढत आहेत. अत्यंत खुषीत मुले असल्यामुळे पालकांना सुद्धा खुप समाधान वाटत असल्याचे महाराज्य टाईम्सशी बोलताना काही नागरिकांनी सांगितले.
संपुर्ण कुटुंबाने आवर्जुन न चुकता मारवाड पेठ येथे मुलाबाळांना दाखवण्यासाठी जावुन अनोखा देखावा पहावा. करमुणीकीची सध्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत पण असे देखावे सादर करणारे मंडळे आर्थिक अडचणींमुळे पुढे येत नाहीत. महात्मा गांधी चौक तरुण मंडळाचा देखाव्यासाठी मंडळाच्या सभासदांनी खुप कष्ट घेतल्याचे दिसुन येत आहे.
तरी अवश्य पहावा असा "जंगल बुक जंगल सफारी" देखावा
मंडळाचे अध्यक्ष- वैभव वनारसे, उपाध्यक्ष- सागर मोदी, कार्याध्यक्ष- सोमेश कल्याणकर, खजिनदार- दिपक वाडेकर, सचिव- विराज वनारसे, सह खजिनदार- राहूल पोरे, सहकार्याध्यक्ष- चिन्मय कुलकर्णी, सह सचिव- धिरज वाडकर
व इतर सभासदांनी सदर देखावा सादर करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा