श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा हजारो भाविक घेत आहेत सिध्देश्वर मंदिरात लाभ !!

महाराज्य टाईम्स:
  बारामती शहरात अनेक वर्षांनंतर श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन श्री सिध्देश्वर मंदिर देवस्थानचे विश्वस्त श्री.समीरजी दाते आणि श्री सिद्धेश्वर कीर्तन महोत्सव समिती यांच्या वतीने अत्यंत मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. रविवार ७ जुन ते १४ जुन २०२६ पर्यंत कथेचे प्रवचन रोज संध्याकाळी ६ ते ९ पर्यंत होणार आहे. त्यानंतर भक्तांना रोज महाप्रसादाचा लाभ सुद्धा मिळणार आहे.
   बारामतीमध्ये अनेक वर्षांपासून श्रीमद् भागवत कथा सप्ताह चे आयोजन झालेले दिसून आले नव्हते. भागवत कथेमध्ये शिव-पार्वती व विष्णू अवतार कार्य व पुराणातील विविध धार्मिक कथांचे विष्लेषण प्रवचण केले जाते. अनेक पौराणिक कथा व त्याचे संदर्भ दाखले देऊन वर्तमानातील व भविष्यातील आपल्या आयुष्याची सांगड कशी घालायची व आपले जीवनमान कसे अध्यात्मिक व संस्कारमय करायचे ह्यचे निरूपण केले जाते. श्रीमद् भागवत कथा प्रवचण भागवताचार्य ह.भ.प.मनोहरमहाराज सायखेडे यांच्या पवित्र मधुर वाणीतून संगितमय पद्धतीने सादर केले जात आहे. कथा प्रवक्ते सायखेडे महाराज हे ज्ञानदाईनी गुरुकुल बेलगाव कुहे जि नाशिक येथील प्रसिध्द कथाकार आहेत. श्री ज्ञानेश्वरी गाथा त्यांची मुखोदगद म्हणजे कंठस्थ आहे. वयाच्या १५ वर्षांपासून त्यांनी सखोल वाचन व पाठांतर करुन श्री ज्ञानेश्वरी गाथा कंठस्थ केली आहे.

भागवत कथेमध्ये साकारला शिव-पार्वती सोहळा:

    कथेमध्ये भागवत धर्मातील पौराणिक कथा व इतिहासाचे निरूपण झाले व शिव-पार्वतीचा भव्य विवाह सोहळा अत्यंत मनमोहकपणे कलाकारांच्या माध्यमातून जिवंत साकारण्यात आला. उपस्थित भाविक भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटावे व प्रत्यक्ष आपण साक्षीदार झालो अशी पवित्र भावना भाविकांनी व्यक्त केली.

श्रीकृष्ण जन्माचा सोहळा झाला अत्यंत हर्ष उल्हासात:

   
    श्रीमद् भागवत कथेमधे शिव पुराण आहे तसेच विष्णु पुराण सुद्धा आहे. श्रीकृष्ण भगवान हे विष्णुचे अवतार रुप होते त्यामुळे श्रीकृष्ण जन्म हा हिंदु धर्मामध्ये खुप मोठा पवित्र प्रसंग मानला जातो. त्यामुळे श्रीकृष्ण जन्माच्या सोहळ्याला हजारों महिला व पुरुष भाविक उपस्थित होते व हर्ष उल्हसाने सर्वजण मंत्रमुग्ध होऊन नाचून आपला आनंद व्यक्त करत होते. महिलांनी विशेषत: पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते.



श्री सत्यनारायण महापुजेला बसल्या १०८ जोड्या :

    श्रीकृष्ण जन्माच्या पूर्वी संध्याकाळी ४ ते ५ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली होती. त्यामध्ये बारामती व परिसरातील १०८ विवाहित जोड्यांनी पुजेमध्ये सहभाग घेतला प्रत्येकाला वेगळी पूजा करणेसाठी मंदिर देवस्थान व श्री सिद्धश्वर कीर्तन समितीने १०८ लाकडी चौरंग व आसनांची व्यवस्था अत्यंत उत्तम केली होती. खुप पवित्र व दिव्य वातावरणात श्री सत्यनारायण १०८ महापूजा पार पडली.

श्रीकृष्ण जन्म सोहळ्याला भाविकांनी  घेतला पुरणपोळीचा महाप्रसाद :

   श्री सिध्देश्वर मंदीर देवस्थानचे विश्वस्त श्री.समीरजी दाते आणि श्री सिद्धेश्वर कीर्तन महोत्सव समिती श्री भागवत कथा सप्ताहाची आयोजक आहे. समितीच्या वतीने मागील ३ वर्षांपासून अविरतपणे प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला कीर्तन व प्रवचन आयोजित केले जाते. त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना स्वादिष्ट महाप्रसादाचे वाटप केले जाते. भागवत सप्ताहात सुद्धा रोज महाप्रसाद जेवण वाटप केले जात आहे. 

      श्री सिध्देश्वर मंदीर देवस्थान विश्वस्त श्री.समीरजी दाते आणि श्री सिद्धेश्वर कीर्तन महोत्सव समिती ही कोणाकडूनही आर्थिक स्वरुपात किंवा पैशांच्या स्वरूपत देणगी घेत नाही व मागत नाही. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कुठलाही आर्थिक व्यवहार  कोणाला करावा लागत नाही. संपुर्ण कार्यक्रम व महाप्रसादाचा खर्च समितीचे सेवेकरी अत्यंत आनंदाने व स्वेच्छेने करतात.

    काल श्रीकृष्ण जन्माच्या सोहळ्याला भाविकांना पुरणपोळी, आमटी, गुळवणी व अधिकमासाचे धोंडे असा महाप्रसादाचा स्वादिष्ट लाभ मिळाला.

   बारामती पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अधिकमासात होत असलेल्या रविवार १४ जुन पर्यंत सुरु असलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा श्रवण करण्याचा लाभ अवश्य घ्यावा व जीवनात पावित्र्य व पुण्य वाढवावे असे आवाहन श्री सिध्देश्वर मंदिर देवस्थान विश्वस्त श्री.समीरजी दाते आणि श्री सिद्धेश्वर कीर्तन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक