पोस्ट्स

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 38 उमेदवारांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा

इमेज
महाराज्य टाईम्स :  (२३ आँक्टो) विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये सर्वाधिक उत्सुकता होती ती बारामती विधानसभा मतदारसंघाची. आता अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातून एनसीपीचे उमेदवार असतील अशी घोषणा तटकरे यांनी केली. याबरोबरच येवल्यातून छगन भुजबळ तर परळीतून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. विद्यमान आमदारांचा पत्ता कट? अजित पवार गटाच्या 38 उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदार संघाचे आमदार दिलीप बनकर, तर पुण्यातील आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या विद्यमान आमदारांचा पत्ता कट झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात नवाब मलिक यांना भाजपचा विरोध आहेत तर पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात सुनील टिंगरे यांचे नाव समोर आल्यानंतर महायुतीला विरोधकांच्या टीकेला तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे आता अजित पवार या तिन्ही आमदारांचा पत्ता कट करणार असल्याची शक्यता वर्...

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून ४५ उमेदवार जाहीर !मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडी मतदार संघातून लढणार

इमेज
महाराज्य टाईम्स: (२२ आँक्टो) आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीमधील घटक पक्ष असणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोपरी पाचपाखाडी येथून विधानसभा निवडणूक लढणार आहेत.        महायुतीमधील भाजप पक्षाने देखील त्यांची पहिली यादी जाहीर केली होती. तसेच अजित पवारांनी देखील काही उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यामुळे आता जागा वाटपावरील मतभेद निवळण्यास सुरू झाले असल्याचे दिसत आहे. काही जागांवर महायुतीमध्ये मतभेद होते. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागा त्याग करण्याचा सल्ला दिला होता असे समजले होते. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजपने दावा सांगितला आहे असे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.