राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 38 उमेदवारांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा

महाराज्य टाईम्स :  (२३ आँक्टो) विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये सर्वाधिक उत्सुकता होती ती बारामती विधानसभा मतदारसंघाची. आता अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातून एनसीपीचे उमेदवार असतील अशी घोषणा तटकरे यांनी केली. याबरोबरच येवल्यातून छगन भुजबळ तर परळीतून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

विद्यमान आमदारांचा पत्ता कट?

अजित पवार गटाच्या 38 उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदार संघाचे आमदार दिलीप बनकर, तर पुण्यातील आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या विद्यमान आमदारांचा पत्ता कट झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात नवाब मलिक यांना भाजपचा विरोध आहेत तर पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात सुनील टिंगरे यांचे नाव समोर आल्यानंतर महायुतीला विरोधकांच्या टीकेला तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे आता अजित पवार या तिन्ही आमदारांचा पत्ता कट करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवाब मलिकांना उमेदवारी मिळणार का?

अजित पवारांच्या पहिल्या यादीत ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. या आधी देखील स्टार प्रचारांच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले होते. या मुद्द्यावर शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांना घेरले होते. नवाब मलिक हे यापूर्वी शरद पवार गट राष्ट्रवादीत होते. गेल्या वर्षीच ते अजित पवार गटात सामील झाले.

शरद पवार गटात असताना नवाब मलिक अनेकदा भाजपवर हल्लाबोल करायचे. अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला. आता अजित पवार गटात सामील झाल्यानंतर पक्षाने त्यांचा स्टार प्रचारकांच्या यादीतही समावेश केला नसल्याने शरद पवार गटाने टीका केली होती. आता उमदेवारांच्या यादीतही त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे नवाब मलिक यांना उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये सर्वाधिक उत्सुकता होती ती बारामती विधानसभा मतदारसंघाची. आता अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातून एनसीपीचे उमेदवार असतील अशी घोषणा तटकरे यांनी केली. याबरोबरच येवल्यातून छगन भुजबळ तर परळीतून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

अजित पवारांच्या या यादीमध्ये नवाब मलीक आणि सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश नाही. तर विद्यमान आमदार आणि मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. यात छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा येवला मतदार संघातून निवणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. वास्तविक राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे यांच्यातील वाद समोर आला होता. त्यामुळे आता या मतदार संघातून भुजबळ यांच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष असेल. तर दुसरीकडे राज्यातील विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक