श्री दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक (दिंडोरी प्रणित) केंद्रात भव्य स्वरूपात श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह संपन्न !!
बारामती: (महाराज्य टाईम्स) बारामती शहरात नाना-नानी पार्क, भिगवण रोड येथे श्रीदत्त जयंती निमित्ताने सात दिवस रोज धार्मिक याग, अखंड नामस्मरण व श्री गुरु चरित्राचे अखंड पारायण दि २७ रोजी महाआरती करून संपन्न झाले.
बारामती शहरात अनेक वर्षापासून भिगवण रोडला शिवाजीनगर, जळोची येथे नाना-नानी पार्क मध्ये श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र (दिंडोरी) प्रणीत प्रसिध्द आहे. तिथे श्री स्वामी समर्थांची नित्योपसना, आरती, नामस्मरण असे दैनंदिन कार्यक्रम चालतात. हजारो सेवेकरी बारामती परिसरातील नित्य उपस्थिती राहून सेवा करतात. दरवर्षी श्री स्वामी समर्थ जयंती, पुण्यतिथी व श्री दत्त जयंती असे प्रमुख कार्यक्रम केले जातात.
यावर्षी श्री दत्त जयंती निमित्त १९/१२/२०२३ ते २७/१२/२०२३ पर्यंत श्री गुरु चरित्र पारायण सप्ताह आयोजित करण्यात आला होता. खुप भव्य पवित्र व धार्मिक अशा वातावरणामध्ये ३१४ सेवेकर्यांनी पारायणामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सेवा अर्पण केली. पारायणाच्या बरोबरच दररोज श्री गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, श्री स्वामी याग, श्रीचंडी याग, श्री रूद्र याग, श्री मल्हारी याग अशा धार्मिक हवनयुक्त सेवा पुर्णाहुती होऊन करण्यात आल्या. बुधवार दि. २७ डिसेंबर रोजी महाआरती झाल्यावर प्रसाद वाटप करून श्री गुरूचरित्र सप्ताहाची सांगता करण्यात आली.
याचबरोबर सप्ताहमध्ये अखंड अविरतपणे "श्री स्वामी समर्थ" नामस्मरण दिवस रात्र चालू होते. त्यामध्ये सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत महिला सेवेकरी व रात्री ८ ते सकाळी पुरुष सेवेकरी यांनी अखंड नामस्मरण वीणा सेवा श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केली. या केंद्रामध्ये "अन्नदान" ऐवजी "ज्ञानदान" केले जाते. त्यासाठी विविध तज्ञ व आध्यात्मिक सेवेकर्यांचा सहभाग असतो. दर गुरूवारी व रविवारी संध्या. ५ ते ६ वा.पर्यंत तज्ञ सवेकर्यांकडुन केंद्रात येणार्या भक्तांना विविध प्रापंचिक, सामाजिक, वैयक्तिक व धार्मिक विषयांवर योग्य सल्ला व मार्गदर्शन दिले जाते.
श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रामध्ये विविध ग्रंथ, धार्मिक वाचन साहित्य, पूजाअर्चा करण्यासाठी लागणारे साहित्य, तसेच मुख्य शक्तिपीठ क्षेत्र दिंडोरी जि. नाशिक येथे आर्युवेदिक वनस्पती पासुन बनविलेले अत्यंत गुणकारी व उत्तम दर्जा असलेले विविध आजारांवरील आयुर्वेदिक औषधे सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहेत. अनेक सेवेकर्यांना वापरल्यावर उत्तम गुण आल्याचे दिसून आले आहे.
बारामती शहरासह तालुक्यात माळेगांव व पवईमाळ,पणदरे येथे सुद्धा वरील प्रमाणे नित्यसेवा व उपासना केली जाते. तिन्हीही केंद्रात मिळून यावेळेस १००० सेवेकर्यांनी श्री गुरूचरित्र पारायण करण्याचा लाभ घेतला. येवढे भव्य व पवित्र वातावरणात श्री दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला असल्याचे तसेच श्री स्वामी समर्थांची सेवा उपासना करणार्यांनी नाना-नानी पार्क, शिवाजीनगर, जळोची, भिगवण रोड, येथील केंद्राला भेट देऊन श्री स्वामी समर्थ सेवा अर्पण करावी असे केंद्रातील सेवेकर्यांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना सांगितले.
व्हिडिओ 👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा