श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त श्री दत्त तरुण मंडळाच्या वतीने ५ हजार नागरिकांना महाभोजनाचे आयोजन
बारामती: (महाराज्य टाईम्स) श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने बारामती शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,कसबा येथे तब्बल ५००० नागरिकांना महाभोजनाचा कार्यक्रमाचे आयोजन श्री दत्त तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज लढत होते रयतेच्या स्वराज्यासाठी
जगात छत्रपती शिवरायांच्या प्रमाणे अनेक राजांनी किल्ले जिंकले, युद्धे जिंकली, शत्रूचा नायनाट केला परंतु जयंती फक्त छत्रपती शिवरायांचीच का होते.? कारण इतर राजे, महाराजे, बादशहा लढत होते स्वतःच्या साम्राज्य विस्तारासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज लढत होते रयतेच्या स्वराज्यासाठी स्वराज्याचा अजेंडा होता रयतेस पोटास लावणे आहे, रयतेच्या भाजीच्या देठास हात लागता कामा नये, रयत आमुची आहे..!! असा थोर आणि अतिशय दैवी विचार महाराजांनी मनात ठेवला होता.
म्हणूनच त्यांनी बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार यांच्यासह सर्व जातीधर्मातील विश्वासू मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले, म्हणून संपूर्ण जगात प्रेरणादायी आदर्श राजे दैवी महापुरूष श्री छत्रपती शिवरायांची जयंती जगात सर्वत्र साजरी होत असते. प्रत्येक समाज, व्यक्ती, संस्था, संघटना व असंख्य मंडळे आपापल्या पद्धतीने आपल्या भावना साजर्या करताना दिसतात.
बारामती शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, कसबा येथील श्री दत्त तरूण मंडळाच्या वतीने दरवर्षी श्री गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो तसेच १९ फेब्रुवारी रोजी दरवर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दोन्ही उत्सवात परिसरातील व इतर सर्व भाविक भक्तांना भव्य असे अन्नदान भोजनाचा कार्यक्रमाचे आयोजन श्री दत्त तरूण मंडळाच्या वतीने व परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने केले जाते. मागील वर्षी तब्बल ३००० लोकांना उत्कृष्ट भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्याचप्रमाणे याही वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य असा महाभोजनाचा कार्यक्रम मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी तब्बल ५००० नागरिकांना भोजनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक व मंडळाचे कार्यकर्ते व मित्र परिवार तसेच नागरिकांच्या मदतीने भोजनाचे आयोजन श्री दत्त तरूण मंडळ, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, कसबा, बारामती येथे संध्याकाळी ७ वाजतां करण्यात आले आहे.
तरी सर्व नागरिकांनी महाभोजनाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा