श्री गणेश जन्मोत्सव सोहळा निमित्त श्री दाते यांच्या श्री गणपती मंदिर येथे भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
उद्या माघ शुद्ध प्रतिपदा. माघ मासाची सुरुवात आणि गणेश जन्माची चाहूल. वास्तविक पाहता गणपतीच्या अनेक अवतारांपैकी आपण *श्रीमहोत्कट विनायक* अवताराचा जन्म माघात साजरा करतो. माघ मासाच्या शुद्ध चतुर्थी तिथीस 'श्री महोत्कट विनायक' नावाने आदिती आणि कश्यप ऋषींच्या आश्रमी माध्यान्ही अवतार घेतला. मत्सरासुर पुत्र देवांतक आणि नरांतक या असूर बंधूंच्या वधासाठी आणि भक्तकल्याणासाठी हा अवतार झाला.
गाणपत्य सांप्रदायात प्रतिपदेपासून जन्मोत्सव सुरु होतो. प्रतिपदेपासून मंत्रोच्चारणपूर्वक अभिषेक आणि विविध सहस्त्रार्चने, पोशाख, महानैवेद्य अशा नानाप्रकारे मोरयाची सेवा चालते. चतुर्थीस माध्यान्ही जन्मकाळ होऊन पंचमीस जन्मोत्सवाची सांगता होते.
याही वर्षी माघ महिन्यात अंगारकी योग मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी श्री गणेश जन्माचा सोहळा आयोजित केला आहे. त्यानिमित्त श्री दाते यांच्या श्री गणपती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे शनिवार १० फेब्रुवारी पासून तीन दिवस सुंदर आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी दि १० रोजी सकाळी १०.३० वाजता सामुहिक सहस्त्राक्षता अर्पण सोहळा करण्यात आला. अनेक महिला व पुरुष भक्तांनी त्याच लाभ घेतला.
तसेच श्री गणेश जन्मोत्सवानिमित्ताने तिन दिवसीय श्री गणेश कथा सारामृत प्रवचन दि. १० ते १२ रोजी संध्याकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत चे आयोजन मंदिरात करण्यात आले आहे. भागवत सप्ताहाचे प्रसिद्ध प्रवचनकार श्री चंद्रमौळी जोशी गुरुजी यांच्या पवित्र वाणीतून सादर केले जाणार आहे. या पवित्र अशा प्रवचनाचा सर्व भक्तांनी अवश्य लाभ घेतला पाहिजे.
श्री गणेश जन्मोत्सवा दिवशी दि. १३ रोजी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजून १९ मि. नी श्री गणेश जन्मोत्सव व त्यानंतर महाआरती होणार आहे.
संध्याकाळी ५ ते ८ वाजतां भव्यदिव्य अशी श्रींची ग्राम प्रदक्षिणा पालखी मिरवणूक निघणार आहे.
रात्री ८ वाजता महाआरती श्री गणपती मंदिरात होणार असुन खिरापतीचा प्रसाद वाटप होणार आहे.
श्री दाते यांच्या गणपती मंदिरातील श्री गणेशोत्सव सोहळा व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ श्री गणेश भक्तांनी अवश्य घ्यावा अशी भावना श्री राजेश दाते काका व सौ. जयश्री दाते वहिनी यांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना व्यक्त केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा