शिवजयंतीला बारामतीत सर्वाधिक आकर्षण ठरला "गड आला पण सिंह गेला" शिवराज्य प्रतिष्ठाणचा हालता देखावा !!
बारामती-दि.१ एप्रिल (आनंद धोंगडे) :
शिवजयंती निम्मित बारामती शहरात दरवर्षी भव्य मिरवणूक काढण्यात येते. त्याच्या स्वागतासाठी अनेक मंडळे, संघटना मोठ मोठे स्टेज उभेकरुन पोवाडे व शिवस्तुमन गिते लाऊन तयारी केली जाते. शिवराज्य प्रतिष्ठानने शुरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारित हलता देखावा सादर करुन शिवजयंतीचे आकर्षण वाढवले.
आजकाल डिजे साऊंडवर थिरकणार्या तरुण वर्गात देखावे सादर करण्याची आवड क्वचितच पहायला मिळते. परंतू सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत जाधव व त्पांच्या सहकार्यानी हलता देखाव्याची यंत्रणा उभी करुन सकाळ पासूनच नागरिकांना देखावा पहाण्यासाठी गांधी चौक येथे उपलब्ध करुन दिला.
आयोजित केलेल्या कार्यक्रमात जय दादा पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यांचें समवेत योगेशजी जगताप, सुभाषशेठ सोमाणी, सचिनशेठ सातव, बबलू देशमुख, रामलाल रायका, किरण इंगळे, अमजदभाई बागवान, अमित परदेशी, प्रकाश पळसे, अमोल दादा यादव, पिंटू गायकवाड, करण वाघोलिकर, नितीन डोळस, भार्गव पाटसकर, किशोर पवार, सुनिल शिंदे, हेमंत नवसारे, शांताराम बागल, गणेश प्र.गायकवाड, प्रशांत चांदगुडे, किरण गायकवाड, संभाजी माने, सौ.अनिताताई गायकवाड, शितलताई गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.
स्वराज्यावर आलेले संकट आपल्या मुलाचे लग्न पुढं ढकलून कोंढाणा किल्ला मराठ्यांच्या साम्राज्यात सामील करण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी शपथ घेतली. "आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे". तानाजी मालुसरे यांनी मुघल सरदार उदयभान राठोड याला निस्तनाभुत करत आपल्या जीवाची आहुती देवून कोंढाणा काबीज केला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला"असे उदगार शुरवीर तानाजी मालुसरे यांचे बाबत काढले म्हणुन आज आपण कोंढाणा किल्ल्यास सिंहगड म्हणूनही ओळखतो.
सालाबाद प्रमाणे शिवराज्य प्रतिष्ठानने यंदाही उत्कृष्ट देखवा सादर केल्याने देखाव्या सोबत फोटो काढणे साठी लहान मुलांनी व नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
प्रतिष्ठानचे श्रीकांत जाधव, निलेश गायकवाड, चेतन (मुन्ना) जाधव, अतिश गायकवाड, गौरव(सोनु)जाधव, प्रशांत जगताप, किरण नलावडे, श्रीपाद कळसकर, प्रथमेश गायकवाड, सौरभ राठोड, चेतन शाहीर जाधव यांनी आयोजना साठी विशेष प्रयत्न केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा