जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

बारामती :(आनंद धोंगडे)
शनिवार १३ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १२ च्या सुमारास मौजे बारामती येथील जामदार रोड खत्री पवार ईस्टेट प्लॅट नं. १०२ कसबा बारामती येथे राहणारे दामपत्याचा मुले घरातून बाहेर गेल्याचा फायदा घेवून पाळत ठेवून घरात घुसून एका अज्ञात इसमाने त्या नवरा बायकोचा खुन केल्याची माहिती बारामती शहर पोलीस स्टेशनला मिळताच बारामती शहर पोलीस स्टेशन कडील अधिकारी अंमलदार हे घटनास्थळी पोहचले. सदर बाबत मा. श्री पंकज देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण मा. श्री संजय जाधव, अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा. श्री डॉ सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सदर घटनेची माहीती देवून यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व इतर अधिकरी अंमलदार यांनी तपास सुरू करून तापसाची वेगवेगळी पथके तयार करून जलदर गतीने तपास सुरू केला त्यात पोलीसांना सदरचा गुन्हा हा अर्थीक कारणावरून एका इसमाने केलेला असल्याचे गोपनिय माहीती मिळाल्याने आरोपीस ताब्यात घेतले आहे.
प्रथम दर्शनी सदरचा गुन्हा हा आर्थीक व्यवहाराचे कारणावरून झाल्याचे समोर आलेले आहे.
    बारामती शहरात नुकताच झालेल्या दुहेरी हत्याकांडाची बातमी वाऱ्यासारखी पसरली असतानाच काही तासात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यश सचिन वाघोलीकर वय 21 धंदा शिक्षण रा जामदार रोड खत्री पवार ईस्टेट कसबा बारामती ता बारामती जि पुणे यानी फिर्याद दिली त्यानुसार आरोपी- दिग्विजय गणेश झणझणे वय 21 रा जामदार रोड, खत्री पवार ईस्टेट कसबा बारामती 
     बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.न. 249/2024 भा.द.वि.का. क 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, दिनांक 13/04/2024 रोजी सकाळी 10/45 ते 12/30 वा सुमारास मौजे बारामती येथील जामदार रोड खत्री पवार ईस्टेंट प्लॅट नं 102 कसबा बारामती येथे बारामती येथील जामदार रोड खत्री पवार ईस्टेट प्लॅट नं 102 कसबा बारामती येथे सचिन महालींग वाघोलीकर वय 48 व पत्नी सारीका सचिन वाघोलीकर वय 40 यांचा दिग्विजय गणेश झणझणे वय 21 रा जामदार रोड खत्री पवार ईस्टेट कसबा बारामती याने आर्थीक
कारणावरून धारधार हत्याराने गळा कापून त्यांचा खुन केला आहे म्हणुन दिग्विजय गणेश झणझणे वय 21 रा जामदार रोड खत्री पवार ईस्टेट कसबा बारामती याचे विरूद्ध फिर्याद आहे. यावरून अंमलदार-पोसई राऊत यांनी दाखल करून या घटनेचा तपास अंमलदार- पो नि संतोष घोळवे करीत आहे.
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक