बारामतीतील कलाकारांची कला पाहण्याची सुवर्णसंधी !! "कलाकार कट्टा" उपक्रम आजपासुन सुरू होणार !!

महाराज्य टाईम्स : २ जुन
नटराज कला दालन लगत कॅनॉल सुशोभिकरण जागे मध्ये कलाकार कट्टा ही संकल्पना कार्यान्वीत करण्यात आली आहे. रविवार दिनांक २ जून पासून या योजनेचा शुभारंभ होत आहे. दर रविवारी सायंकाळी ५.३० ते रात्री ८.०० पर्यंत नागरिकांना येथे लाभ घेता येणार आहे.
     या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींची मुलांची व्यंगचित्र पेंटिंग, निसर्ग चित्र, टॅटू काढणे, पेन्सिल स्केच, पॉटरी ( मातीकाम), मातीची भांडी तयार करण्यास शिकवणे, कार्टून बनविणे, फोक आर्ट, नावापासून गणपती तयार करणे, ग्लास पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, कॅलीग्राफी, वारली ग्रिटिंग, पोट्रेट, ही सशुल्क करण्यात येणार आहे. या कलाकार कट्ट्यामध्ये स्थानिक कलाकार, प्रशिक्षक, व्यावसाईक कलावंत असे सुमारे १५ कलाकार सहभागी होत आहेत.
     नटराज कलामंदिर लगत कॅनॉल रस्त्यावर नागरीक फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यांना या ठिकाणी विविध कला प्रकारांचा लाभ घेता यावा म्हणून हा कट्टा सुरु करीत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक