मत्स्यव्यवसाय विभागाची इंद्रायणी नदी काठी संवर्धन होत असलेल्या प्रतिबंधित मागूर संवर्धकावर धडक कार्यवाही

आळदी : दि.१८ जुन
मत्स्यव्यवसाय विभागाची इंद्रायणी नदी काठी संवर्धन होत असलेल्या प्रतिबंधित मागूर मासा या पर्यावरणाला व मनुष्याला घातक असलेल्या मागुर मासा संवर्धन करणार्यांवर धडक कार्यवाही मत्सविभागाकडुन मुंबई येथील प्रसिध्द पत्रकार प्रशांत वाघमारे यांच्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे.
      आळंदी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील कोयाळी तर्फे चाकण येथील इंद्रायणी नदी काठी प्रतिबंधित मागूर / थाई जातीच्या ( _Clarias gariepinus_ ) मासळीचे संवर्धन होत असल्याबाबतची माहिती मुंबई चे पत्रकार श्री प्रशांत वि वाघमारे यानी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, श्रीमती. अर्चना धि. शिंदे मत्स्यव्यवसाय विभाग, पुणे यांना  दिली . 
     सदर बाबत सहा. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी , जुन्नर कार्यालयाचे अधिकारी, श्री. किरण मा. वाघमारे यांनी संवर्धन होत असलेल्या जागे बाबत शाहनिशा केली व पुणे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, श्रीमती. अर्चना धि.  शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 12/06/2024 रोजी राजगुरूनगर तालुक्याचे अधिभारीत अधिकारी श्री. किरण मा. वाघमारे तसेच पुणे कार्यालयातील अधिकारी श्री. भि.श. पाटील, श्री. रा. रु. राठोड व श्री. जाधव यांनी कोयाळी तर्फे चाकण या गावातील श्री. महादू गेनूभाऊ कोळेकर याचे अंदाजित ४००० किलो तर श्री. गोरक्ष अंबर पोकळे यांचे तलवातील ५००० किलो असे एकूण ९००० किलो (9 मे. टन ) तर श्री. बापू तात्या कोळेकर व श्री. बाळासाहेब तात्या कोळेकर याचे तलावातील प्रत्येकी 1 टन असे एकून 11 मे.टन प्रतिबंधित मागूर मासे नष्ट करून  मासळी मासळी संवर्धकांवर  वर  पोलीस स्टेशन आळंदी येथे कायदेशीर FIR गुन्हा नोंदविण्यात आले आहे.
     पत्रकार प्रशांत वाघमारे यांनी महाराज्य टाईम्स प्रतिनिधीशी बोलताना सांगितले मागुर मासा हा मनुष्याच्या आरोग्यास अत्यंत घातक व हानिकारक असुन त्याच्या सेवनामुळे कर्करोगासारखे आजार झाल्याच्या घटना आहेत. तसेच पाण्यातील जलजीवांचा नाश या मागुर माशामुळे होतो. तसेच जलजीवांवर हल्लाकरुन ते खाल्लयामुळे ते पाण्यात नष्ट होत आहेत त्यामुळे निसर्गाचा समतोल नष्ट होत असल्यामुळे या माशाच्या संवर्धनावर कठोर निर्बंध आहेत. पण आर्थिक लाभापोटी काही लोकांकडून मत्सपालनाच्या नावाखाली शेततळे करुन पालन केले जात आहे. ते अत्यंत घातक असल्यामुळेच मत्सविभागाने यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
       सदर कार्यवाही करिता पोलीस स्टेशन आळंदी चे पोलीस निरक्षक श्री. भिमा नरके व पोलीस कर्मचारी श्री. डिकळे  व श्रीमती. गायकवाड यांनी सहकार्य केले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक