एकीकडे सुशोभीकरण ! तर दुसरीकडे रस्त्यांचे भकासीकरण ? कॅनाॅलरोड रस्त्यावर मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी !

महाराज्य टाईम्स :(२४ आँक्टो)
     बारामती शहरातील उच्चभ्रू परिसरातील समजला जाणारा अत्यंत रहदारीचा कॅनाॅल रस्त्यावर अनेक महिन्यांपासून मोठ्या खड्यामुळे दुचाकी वाहने पडून अनेक नागरिक गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले आहे. प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी काहीच करत नसल्याचे चित्र आहे.
     बारामती शहरातुन माळावरील देवीला जाणारा कॅनाॅल लगतचा रस्ता सध्या खुप प्रसिद्ध झाला आहे. कॅनाॅलच्या भिंतीला लागुनच तेथे प्रचंड सुशोभिकरण करण्यात आले. दगडी पायर्या, खेळणी, रंगरंगोटी व शोभिवंत झाडे अशा अनेक गोष्टी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशोकनगर, माळावरची देवी, अंबिकानगर, देसाई ईस्टेट परिसरातील जागेचे भाव सुद्धा प्रचंड वाढले आहेत. परिसरातील बिल्डर खुप खुष झाले आहेत कारण फ्लॅटचे दर १००० ते २००० रु. ने वाढले आहेत. असे सुतोवाच सुद्धा अजितदादांनी व्यापारी मेळाव्यात भाषण करताना केले होते.
     मग एकीकडे येवढे प्रचंड सुशोभिकरण असताना त्यालाच लागून असलेल्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. मोठे दगड वर आले आहेत. तब्बल एक फुट खोल असा खड्डा असल्यामुळे नुकताच सलग मोठा पाऊस झाला त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड पाणी साठले होते. त्यामुळे खड्ड्याचा व खोलिचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकीस्वार तसेच महिला सुद्धा खाली पडून गंभीर जखमी झाल्या आहेत. याच परिसरातील एका प्रसिद्ध हाॅस्पिटलच्या डा‌ॅक्टरांना सुद्धा खड्डयात पडून गंभीर दुखापत झाल्याचे त्यांनी फोन करून सांगितले व परिसरातील नागरिकांनी वरिल माहिती महाराज्य टाइम्सच्या प्रतिनिधीला दिली आहे.
    लोकप्रतिनिधींची मुदत संपली असल्यामुळे ते या विषयावर डोळेझाक करताना दिसत आहेत. आणि प्रशासन अधिकारी ढूंकुनही बघत नाही अशा मूलभूत गरजांच्या प्रश्नांकडे. त्यांना फक्त दरमहा हजारो- लाखो रूपयांचा पगार जनतेच्या करातुन भरलेल्या पैशावर नियमितपणे मिळतो. मग काम केले तरी आणि नाही केले तरी.

(उच्चभ्रू अशोकनगर परिसरातील प्रवेशद्वारातच अत्यंत गलिच्छ व वाईट अवस्था)

   परिसरातील नागरिकांनी तसे जखमी व्यक्तींनी नाव न सांगण्याच्या अटीवर तिव्र प्रतिक्रिया देताना सांगितले कि, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तर रस्तादुरुस्तीची कामासाठी किंवा नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकरिता बाहेर फिरताना कधी बघितलेच नाही. ते फक्त शनिवार- रविवारी अजितदादा विकासकामाची पाहणी करताना त्यांच्या मागे फिरताना दिसतात. 
     मग अनेक महिन्यांपासुन रस्त्याच्या अवस्थेकडे प्रशासन अधिकारी, कर्मचारी यांचे लक्ष का गेले नाही? का एखाद्याचा जीव गेल्यावर तातडीने खुप तत्पर असल्यागत कारवाई केलेली दाखवली जाणार? ? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. 
    




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक