विद्यार्थ्यांमध्ये भावी संशोधक, उद्योजक घडावेत यासाठी उर्मी संस्था,एलिव्हास लाईफ सायन्सेस यांचा उपक्रम संपन्न
मोहोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागरूक व्हावा,या विद्यार्थ्यांमधून भावी संशोधक, उद्योजक घडावेत अशा उद्देशाने ऊर्मी संस्था एलिव्हास लाइफ सायन्सेस (पूर्वीची ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस) यांच्या सीएसआर निधीअंतर्गत "प्रोजेक्ट विग्यासा"राबवीत आहे.
मोहोळ तालुक्यातील ८ शाळांतील विद्यार्थ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम या प्रकल्पात राबविण्यात येत आहेत. शिक्षक प्रशिक्षण,जिगसॉ खेळातून आवर्त सारणी, ओरिगामी मायक्रोस्कोप,शाळांना प्रयोगशाळा साहित्य, इ लर्निंग सुविधा, सायन्स सेंटरला भेट असे अनेक उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून यंदा आयसर,पुणे यांचे विज्ञान, गणित शिक्षकांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये DIY kit वापरून विज्ञान,गणिताच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करणे, NEP ला अनुसरून STEM विषयाचं मार्गदर्शन असणार आहे. मोहोळ तालुक्यातील विद्यार्थी प्रेमी आणि विज्ञान, गणित विषयांना वाहून घेतलेले शिक्षकमित्र सहभागी होत आहेत याचा ऊर्मी संस्थेस निश्चितच आनंद होत आहे.
आगामी काळात जास्तीत जास्त शिक्षकमित्रांना यात सहभागी करून ही विज्ञानवारी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात नेण्याचा संस्थेचा मानस आहे. सदर कार्यशाळेचे उद्घाटन पोखरापुर चे मुख्याध्यापक श्रीधर उन्हाळे, यशोधन विद्यालय देगाव चे मुख्याध्यापक जोतिराम पाटील, मोहोळ तालुक विज्ञान मंडळ चे अध्यक्ष श्री चंद्रकांत कुंभार , मोहोळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष नसीर मोमीन , आयसर, पुणेचे शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक रुपनर व त्यांचे सहकारी सर्वेश गोरीवाले मनीषा पिंगळे अमोल देशमुख कौस्तुभ सोहनी उर्मी फाउंडेशनचे संतोष शिंदे व प्रज्वल पाटील हे उपस्थित होते.
या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशोधन विद्यालयाचे श्री शहाजान पठाण सर यांनी केले. या कार्यशाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमास अलिव्हास लाईफ सायन्सचे जनरल मॅनेजर आदरणीय बेलदार सर व उर्मी फौंडेशनचे सचिव श्री राहुल शेंडे सर आदरणीय दिलीप तिडके सर हे उपस्थित होते.
हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय माजी आमदार राजन पाटील अनिस चे एडवोकेट गोविंद पाटील यांची भरघोस मदत झाली कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी लोकसेवा हॉटेल मोहोळचा स्टाफ त्याचबरोबर मोहोळ तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे सर्व पदाधिकारी मोहोळ तालुक्यातील विज्ञान व गणित शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा