मोफत बाल आरोग्य, रक्त तपासणी व औषधे वाटप शिबिराचे आयोजन ! डॉ. प्रदीप पाटकर व डॉ. प्रियंका पाटकर यांचा उपक्रम
डॉ. प्रदीप पाटकर व डॉ. प्रियंका पाटकर यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम
मोहोळ दि.२५ जानेवारी ( प्रभाकर बावधनकर ) : ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पाटकर हॉस्पिटल मोहोळ यांच्या वतीने मोहोळ शहर व तालुक्यातील लहान बालकासाठी 'मोफत आरोग्य तपासणी व औषधे रक्त तपासणीचे' शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी विजयकुमार देशमुख, एकात्मिक बाल विकास अधिकारी वरिष्ठ लिपिक शिलादेवी दाढे, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष नसीर मोमीन, राजू शिंदे , मधुकर पाटील दिनेश सातपुते, सचिन गवळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य राजन घाडगे आदि. प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आरोग्याची देवता धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित डॉ. प्रदीप पाटकर व डॉ. प्रियंका पाटकर, सहाय्यक गट विकास अधिकारी विजयकुमार देशमुख, एकात्मिक बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वरिष्ठ लिपिक शिलादेवी दाढे, मोहोळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष नसीर मोमीन व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले.
आरोग्य क्षेत्रात लहान बालकाच्या आरोग्याशी निगडित असणारे सर्व प्रकारचे आजार व कुपोषित बालकांच्या आरोग्या संबंधी डॉ. पाटकर दापत्याने अविरतपणे काम केलेले आहे व ते करीत आहेत हा त्यांचा उपक्रम वाखण्याजोगे आहे या उपक्रमाचे इतरांनीही दखल घेऊन आरोग्यासंबंधी आपले योगदान द्यावे असे आव्हान सहाय्यक गटविकास अधिकारी विजयकुमार देशमुख यांनी याप्रसंगी केले.
डॉ. प्रदीप पाटकर व सौ. प्रियंका पाटकर यांनी यापूर्वी रामहिंगणी गाव दत्तक घेऊन गाव कुपोषित मुक्त केल्याने त्यांची विविध सामाजिक संघटनेच्या वतीने दखल घेऊन पुरस्कार देत मानांकित करण्यात आले आहे या अभिनव उपक्रमाची भरभरून कौतुक करून पुढील कार्याच्या शुभेच्छा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य राजन घाडगे यांनी याप्रसंगी दिल्या. यावेळी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सलग तीन दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून लहान बालकांना आरोग्य सेवा पुरविल्या जात आहेत.
या संधीचा रुग्णसेवेचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असेही डॉ. प्रदिप पाटकर व सौ. प्रियंका पाटकर यांनी आवाहन करत तालुक्यातील एक गाव दत्तक घेण्याचे प्रस्ताविक पर मनोगतात आश्वासित केले. हॉस्पिटलचे कर्मचारी वैष्णवी काळे, शुभांगी गायकवाड, आप्पा आतकरे आदि. नी विशेष परिश्रम घेतले. मोहोळ शहरातील व ग्रामीण भागातील या रुग्णसेवेचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा