महात्मा बसवेश्वर जयंती साजरी: आरोग्य शिबिरात १०० नागरिकांनी घेतला लाभ

बारामती : (महाराज्य टाईम्स)
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त लिंगायत समाजाच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिरात विविध रुग्णालयांच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात आली. मुक्ताई हॉस्पिटलच्या डॉ. मीनल गवसणे यांनी त्वचारोग तपासणी केली. बारामती हॉस्पिटलच्या वतीने बीपी, शुगर, ऑक्सिजन व ईसीजी तपासणी करण्यात आली. एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्याची सुविधा तसेच अल्प दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. शिवम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वेळापूर यांच्या वतीने हार्निया, अपेंडिक्स व मुतखडा यासंदर्भात तपासणी करण्यात आली.
            या शिबिराचा सुमारे १०० समाज बांधवांनी लाभ घेतला. नेत्र तपासणीदरम्यान ३ मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत. याशिवाय डॉ. मीनल गवसणे यांनी १० मे ते २० मे दरम्यान समाज बांधवांसाठी मोफत सल्ला देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी बारामती शहर पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी, नगरसेवक यशपाल पोटे, नगरसेविका अनुप्रीता ताबे (डांगे), माजी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले उपस्थित होते. यावेळी समाजाचे अध्यक्ष समीर ढोले, माधुरी झाडबुके, हेमा बोधे व विश्वस्त मंडळ तसेच रोहित पिल्ले, अभिषेक ढोले, विजय गाढवे, सचिन शाहीर, अँड. अमित ढोले, तनिष्क ढोले यांच्यासह बसवप्रेमी उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक