लाडक्या बहिणीच्या दारात चारचाकी दिसली की १५०० रू. लाभ बंद होणार !!

महाराज्य टाईम्स: ४ फेब्रुवारी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. तुमच्या दारात चारचाकी वाहन असेल, तर अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे. पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविकांच्या पडताळणीत कुटुंबीयांच्या नावावर चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न झाल्यास लाभार्थ्यांना अपात्र करण्यात येणार आहे. ही चारचाकी महिलेच्या नावावर नसेल, मात्र कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असेल तरीही त्यांना या योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे. यासाठी आजपासून लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे.

लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात लोकप्रिय योजनेपैकी एक आहे. या योजनेअतंर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र या अनेक अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जाची पडताळणी सुरु आहे. यासाठी काही निकष लावले जात आहेत. चारचाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही.
विभक्त महिलांना राहणार लाभ

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सासरे, दीर अथवा घरातील इतरांच्या नावावर चारचाकी असेल आणि लाभार्थी महिला पती, मुलांसोबत वेगळी राहत असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ सुरू राहणार आहे.

लाडकी बहीण योजनेचे काही निकष...

ज्या महिलांचे कुटुंब आयकर भरते अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे, ते अपात्र ठरणार आहेत. तसेच इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त फरकाची रक्कम मिळेल. ज्या महिलांच्या बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव वेगवेगळे आहे, अशा महिला देखील अपात्र होणार आहेत. ज्या महिला लग्न करून परराज्यात स्थायिक झाल्या आहेत अशा महिलांनाही आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत सात महिन्यांचे एकूण 10 हजार 500 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेनंतर हप्त्याचे वितरण सुरू होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा 15 तारखेनंतर मिळण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक