बेकायदा गाईचे मांस व गोवंश जनावरे बाळगणारे लोकांवर पोलिस कारवाई
बारामती : (महाराज्य टाईम्स)
बारामती शहरात म्हाडा काॅलनी येथे 1200 किलो गोवंश जातीचे मांस तसेच दोन जर्सी गाई व दोन जर्सी वासरे तसेच तीन चार चाकी वाहने असा एकूण 6,42,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सविस्तर घटना पुढील प्रमाणे -
बारामती शहरात राजरोसपणे गाईंची वासरांची कत्तल केली जाते अशी अनेक नागरिकांकडुन माहिती मिळते परंतू पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतरच कारवाई केली जाते. त्यामुळे कत्तल करणारे नराधम निर्ढावलेले आहेत. हेच कत्तल करणारे नराधम हाॅटेलमध्ये सदर गोमांस कमी दराने मटण चिकणच्या तुलनेत विकतात. व हाॅटेल व्यावसायिक जास्त नफा मिळेल या स्वार्थी विचाराने सदर गोमांस घेऊन पदार्थ बनवून गिर्हाईकांची फसवणुक करतात असे नागरिकांकडुन माहिती मिळत आहे. सजग नागरिकांनी अशा हाॅटेल मध्ये जाण्याचे टाळावे हेच आरोग्यासाठी उत्तम ठरेल.
सदर प्रकरणासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती विभाग,बारामती यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार , बारामती शहरातील देवळे इस्टेट येथील माढा कॉलनी येथे काही इसम गोवंश जातीचे मांस व जिवंत जनावरे बेकायदा जवळ ठेव बाबत मिळालेल्या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग, बारामती येथील पोलीस अंमलदार तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये 1200 किलो गोवंश जातीचे मांस तसेच दोन जर्सी गाई व दोन जर्सी वासरे तसेच तीन चार चाकी वाहने असा एकूण 6,42,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई मध्ये ईसम नामे 1) सलिम चाँद कुरेशी रा फलटण रोड महालक्ष्मी शोरुम समोर 2) सुफीयान रफीक बागवान रा रविवार पेठ शतरंजवाला चौक सुभान अल्ला हॉटेल मागे पुणे 3) गुलाब बनीलाल शेख रा जगतापमळा 4) सफैन अमिन शेख रा आसु ता फलटण जि सातारा सर्व रा बारामती ता बारामती जि पुणे हे इसम नामें- 5) गौस मुबारक कुरेशी रा फलटण रोड बारामती 6) मैनु मुबारक कुरेशी रा फलटण रोड बारामती 7) असिफ मुस्तफा कुरेशी रा म्हाडा कॉलनी बारामती ता बारामती जि पुणे अशा एकूण सात इसम यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशन करीत असून यामध्ये आणखीन काही इसम यांची नावे पुढे येण्याची शक्यता असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सो. बारामती, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड सो. बारामती विभाग,बारामती यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा