सुमित कोळपे यांची भारत सरकारचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार एजिस ग्रॅहम बेल पुरस्कारासाठी निवड !!
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय स्तरावर गौरव !!
२० फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे भव्य सन्मान सोहळा
पुरस्कार वितरण सोहळा - २० फेब्रुवारी २०२५, नवी दिल्ली
महाराज्य टाईम्स (प्रभाकर बावधनकर) : एजिस ग्रहम बेल या प्रतिष्ठित पुरस्कारांचे विजेते घोषित करण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील श्री प्रदीप कोळपे यांचे चिरंजीव सुमित कोळपे यांची निवड झाली असून त्यांचा सन्मान २० फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित भव्य सोहळ्यात केला जाणार आहे. या सोहळ्याला देशभरातील वरिष्ठ सरकारी अधिकारी, कॉर्पोरेट नेले आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
चि. सुमित कोळपे यांची भारतातील सर्वात प्रतिष्ठित माहिती व तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सन्मान – एजिस ग्रॅहम बेल पुरस्कार (AGBA) २०२५ च्या १५व्या आवृत्तीसाठी पुरस्कार प्राप्त होणार असून. त्यांची निवड कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा सायन्स (Data Science) इनोव्हेशन या श्रेणीमध्ये निवड झाली आहे.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या पाठिंब्याने हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार अत्याधुनिक तंत्रज्ञान, एआय (AI), सायबरसुरक्षा ( Cybersecurity) आणि टेलिकॉम क्षेत्रातील नवोपक्रमांना सन्मानित करतो. अलेक्झांडर ग्रहम बेल यांच्या नावाने समर्पित हा पुरस्कार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या तज्ज्ञांना दिला जातो. या राष्ट्रीय सन्मानामुळे चि. सुमित यांचे नाव भारतातील अग्रगण्य तंत्रज्ञान नवोपक्रमकर्त्यांमध्ये गणले जात असून. AI आणि डेटा सायन्स क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे भारताचे जागतिक स्तरावर नेतृत्व वाढण्यास मदत होत आहे.
एजिस ग्रहम बेल पुरस्कार हे भारतातील सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित नवोपक्रम पुरस्कार मानले जातात. यात स्टार्टअप्स, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि संशोधन संस्थांचा सहभाग असतो. हा उपक्रम एजिस स्कूल ऑफ बिझनेस, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा आणि टेलिकम्युनिकेशन यांच्या पुढाकाराने तसेच जागतिक उद्योग नेत्यांच्या आणि ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशन (Austrade) यांच्या सहकार्याने आयोजित केला जातो. हा मंच नवकल्पनांना चालना देण्यासाठी एक अत्यंत प्रभावी व्यासपीठ म्हणून ओळखला जातो.
या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेतः
श्री. जयंत चौधरी - भारत सरकारचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री तसेच शिक्षण विभागातील राज्यमंत्री.
डॉ. अजय कुमार सूद – भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार आणि पंतप्रधानांचे विज्ञान, तंत्रज्ञान व नवोपक्रम सल्लागार परिषदेचे (PM-STAIC) अध्यक्ष
एजिस ग्रहम बेल पुरस्कार विजेते म्हणून मानंकन मिळवल्यानंतर सुमित कोळपे यांच्या प्रतिक्रियाः
"एजिस ग्रहम बेल पुरस्कारासाठी विजेता म्हणून मान्यता मिळवणे ही माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊन कुठलीही पार्श्वभूमी नसताना माझ्या नाविन्यपूर्ण आणि आव्हानात्मक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समधील इनोव्हेशनची दखल घेतली गेली, याचा मला अत्यंत मनस्वी आनंद होत आहे. हा मंच केवळ नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेत नाही, तर समाजोपयोगी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रेरणाही देतो. माझ्यासारख्या तरुणांना अशा संधी मिळाव्यात, तसेच त्यांच्या प्रयत्नांना भारत सरकारचा असाच पाठिंबा मिळावा, जेणेकरून देशात नवीन तंत्रज्ञान विकसित होण्यास मदत होईल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा