सकल जैन समाज व व्यापारी संघटनांच्या वतीने उद्या बारामती बंद चे आयोजन !!

महाराज्य टाईम्स: दि.२३ (बारामती)
मुंबई मधील विलेपार्ले येथील 35 वर्षे जुने जैन मंदिर महानगरपालिकेने तडकाफडकी पाडून तेथील जिनमूर्ती आणि जैन शास्त्राची विटंबना व अवहेलना करून सकल जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ सकल जैन समाजाने गुरुवार, 24 एप्रिल रोजी भारत बंद पुकारला आहे.
      या संदर्भात बारामती व्यापारी महासंघ व दि बारामती मर्चंट असोसिएशन यांना बारामती बंद करुन निषेध नोंदवण्यासाठी सर्व व्यापारी व दुकानदार यांनी सहकार्य करावे असे निवेदन सकल जैन समाजाने संघटनेला दिले होते.
त्यानुसार व्यापारी संघटनेच्या झालेल्या मीटिंग मध्ये सर्वानुमते गुरुवार, 24 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 पर्यंत बारामती बंद ठेऊन या बंदला पाठिंबा दिला आहे.
      तसेच गुरवारी 24 एप्रिल ला सकाळी 8.30 वाजता निषेध मोर्चा श्री मुनिसुव्रत दिगंबर जैन मंदिर, महावीर पथ येथून निघणार आहे.
   तसेच सर्व शेतीमालाचे बाजार किंवा लिलाव सुद्धा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकर्यांनी सुद्धा याची दखल घ्यावी व या निषेध मोर्चाला सर्व धर्मियांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक