प्राथमिक शिक्षका सौ. मंजुषा विभुते यांना तालुका व जिल्हा स्तरावर आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहिर !!
मोहोळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षका सौ. मंजुषा मोहन विभुते याची जिल्हा स्तर व तालुका स्तरावर आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार जाहिर झाला आहे.
मोहोळ तालुक्यातील सारोळे गाव येथील सोलापुर जिल्हा परिषद शाळेत अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळा शिक्षिका पदावर कार्यरत असणार्या शिक्षिका सौ. मंजुषा मोहन विभुते यांच्या शैक्षणिक कार्यकाळातील उत्कृष्ट कामाचा, कर्तव्यदक्षतेचा व उपस्थितीचा तसेच त्यांच्या शिकवण्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल बघितल्यानंतर शालेय प्रशासनाने शिक्षिका सौ.विभुते यांच्या नावाची शिफारस शासनाकडे तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर केली होती.
एकाच वेळेस जिल्हा व तालुका स्तरावर आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे मोहोळ तालुक्यात सौ.विभुते यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
"मी अत्यंत प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षपणे शिक्षण ज्ञानदानाचे काम केले त्याची मला पावती मिळाली" अशी भावना आदर्श शिक्षिका म्हणून निवड झाल्यावर सौ.विभुते यांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना व्यक्त केली.
मोहोळ येथिल सोमवंशी क्षत्रिय कासार समाज यांचा श्री कालिका माता उत्सव चालु असुन त्यानिमित्त भव्य पालखी मिरवणूक अत्यंत भक्तिपुर्ण धार्मिक वातावरणात काढण्यात आली. त्याचे औचित्य साधून सो.क्ष. कासार समाज महिला मंडळ मोहोळ यांच्या वतीने आपल्या समाज भगिनी सौ. मंजुषा मोहन विभुते यांना जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावरील आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला त्याचा गौरव करण्यासाठी मंडळाच्या वतीने साडी, हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कासार समाजातील भगिनिला मिळालेला पुरस्कार समाजासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे अशी भावना सत्कार प्रसंगी आयोजकांनी भाषणात व्यक्त केली.
याप्रसंगी सो.क्ष.कासार समाजाचे महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा