मोहोळची तनुजा बारसकरची घोडदौड; " खेलो इंडिया युथ गेम्स साठी निवड"


पोखरापूर दि.२४ (प्रभाकर बावधनकर)
भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या" खेलो इंडिया "युथ गेम्स" स्पर्धेसाठी मोहोळ येथील क्रांतिवीर भगतसिंग स्पोर्ट्स अकँडमीची  विद्यार्थीनी कु. तनुजा  बारसकर हिची  निवड करण्यात आली आहे.
          या स्पर्धा दि. ११ ते १३ मे २०२५ दरम्यान बोधगया, बिहार येथे  आयोजित केल्या आहेत. त्यासाठी तत्पूर्वी महाराष्ट्राच्या टीमसमवेत अधिकचा सराव बालेवाडी, पुणे येथे होणार आहे. तनुजा नितीन बारसकर ही सध्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून, मोहोळ येथील क्रांतिवीर भगतसिंग स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये प्रशिक्षक दशरथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेत आहे. तनुजाची मार्शल आर्ट्सबाबतची असलेली आवड, निष्ठा, जिद्द, चिकाटी, मेहनत यामुळे तिचा सराव उत्तम रीतीने घेण्यात आला आहे अशी माहिती  मार्शल आर्ट्स प्रशिक्षक दशरथ काळे यांनी दिली.  कोणत्याही परिस्थितीमध्ये मी जिंकणारच  असा ठाम निर्धार  बाळगून तिने सातत्याने कसून सराव करीत आहे. तिची तळमळ पाहून  प्रशिक्षक त्याच पद्धतीने तिला प्रशिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील इतर स्पर्धांमध्ये तिने यश संपादन केल्यानंतर भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स या स्पर्धेसाठी तिची निवड झाल्यामुळे कु. तनुजा ही मोहोळ मधून खेलो इंडिया ला जाणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे. तिच्या या निवडीबद्दल सर्व सहकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करून तिला स्पर्धासाठी‌ शुभेच्छा दिल्या.  तिच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक