बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!
महाराज्य टाईम्स: (२ मार्च)
दि. 02/03/2025 रोजी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीसांना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार, एका इसमाने आपल्या व्हाट्सअप स्टेटस वर औरंगजेबाचा फोटो ठेवून त्यावर धार्मिक तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर ठेवला आहे. सदसच्या माहितीच्या अनुशंगाने लागलीच इसम हामीद अमीर खान वय ३१, लोंढेवस्ती, गुनवडी,बारामती आणि शाहेबाज अस्लम खान वय २१, रा.कुरकुंभ ता.दौंड यांना पोलीस स्टाफच्या मार्फत ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यावर गोपणीय माहितीचे अनुसार औरंगजेबाचा फोटो व आक्षेपार्ह मजकूर " किंग आँफ इंडिया बादशाह औरंगजेब अलमगीर ३ मार्च १७०७" असा मजकूर मिळून आला.
सदर इसमाच्या कृत्यामुळे धार्मिक तेड निर्माण होऊन बारामती शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस निरीक्षक, विलास नाळे, बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी त्याचे विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 127 प्रमाणे प्रस्ताव तयार करून तो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो बारामती यांना सादर केला असता यावर सुनावणी घेऊन सदर इसमाची कृती ही धार्मिक तेढ निर्माण करणारी असल्याची खात्री झाल्याने, प्रतिबंधक उपाययोजना म्हणून, त्याची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे करण्यात आली आहे.
बारामती शहर पोलीस स्टेशनकडून बारामती शहरातील वेगवेगळ्या सोशल मीडिया साइडवर, तसेच नागरिक ठेवत असलेल्या व्हाट्सअप स्टेटसवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून त्या माध्यमातून कोणत्याही धर्मा विरुद्ध तेढ निर्माण करणाऱ्या इसमांवर यापुढे देखील उचित कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सध्या छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास तसेच मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान मास चालु असून आगामी काळात हिंदू व मुस्लिम समाजाचे उत्सव येणार असून सदर उत्सवांच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह असे स्टेटस किंवा अफवा पसरवणाऱ्या मजकुराचा संदेश कोणत्याही धर्माच्या इसमाने कोणत्याही धर्मा विरुद्ध सोशल मीडियावर शेअर करू नये असे आवाहन नागरीकांना करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामिण श्री.पंकज देशमुख सो. मा.अपर पोलीस अधीक्षक बारामती, श्री.गणेश बिरादार सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री. सुदर्शन राठोड सो. यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा