आज तिथीनुसार शिवजयंती उत्सव भव्य दिव्य असा साजरा होणार !! पारंपारिक पालखीचे आयोजन !!

महाराज्य टाईम्स: (दि.१६) सालाबाद प्रमाणे बारामती शहरांमध्ये तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंती निमित्त छत्रपती जन्मोत्सव समिती,बारामती मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले होते. दिनांक १३ मार्च ते दिनांक १६ मार्च दरम्यान नटराज नाट्य कला मंदिराच्या कलादालनामध्ये शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन तसेच शिवछत्रपतींच्या आरमारातील युद्धनौकांचे प्रदर्शन, शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. सदर प्रदर्शनाच्या ठिकाणी ऐतिहासिक ग्रंथ व पुस्तकांचे प्रदर्शन तसेच माफक दरात विक्री देखील करण्यात आली.
दिनांक १३ मार्च २०२५ रोजी शिव चरित्रातील निवडक प्रसंगांवर आधारित शिवचरित्र नृत्याविष्कार हा कार्यक्रम संपन्न झाला. 
     या कार्यक्रमादरम्यान दिनांक ९ मार्च २०२५ रोजी छत्रपती जन्मोत्सव समिती मार्फत घेतल्या गेलेल्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. गट क्रमांक १) पहिली ते पाचवी, गट क्रमांक २) सहावी ते दहावी, गट क्रमांक ३) खुला गट या तीनही गटांमधील गट विजेत्यास सायकल बक्षीस देण्यात आली. तसेच इतर विजेत्यांना रोख बक्षिसे आणि चषक प्रदान करण्यात आले.
     दिनांक १४ मार्च २०२५ रोजी ह.भ.प. अवधूतजी गांधी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गीतांच्या कार्यक्रमास बारामतीकरांनी उदंड प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमा वेळी छत्रपती जन्मोत्सव समितीच्या वतीने शिवभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. क्रीडा क्षेत्रातील नामवंत कुस्तीगीर श्री यश देवकर याचा शिवभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दुर्ग भ्रमंती व इतिहास अभ्यासक दौरे या द्वारे लोकांमध्ये दुर्गांविषयी आवड निर्माण करणाऱ्या श्री सुहास देशमुख यांचा शिवभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
     तसेच बारामती मधील डॉ महेश गायकवाड यांचे पर्यावरण विषयक अभ्यास व पर्यावरण संवर्धनाविषयी केलेले काम याबद्दल शिवभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज गोशाळा, लोणंद याचे संस्थापक श्री ओंकारजी रामदास गोळे यांचे गोरक्षण व गोसंगोपन यातील सन्माननीय काम लक्षात घेऊन समितीच्या वतीने शिवभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
दिनांक १५ मार्च २०२५ रोजी शिवशाहीर चंद्रकांत माने यांचा महाराष्ट्राचा मराठी बाणा या कार्यक्रमास बारामतीकरांनी बहुसंख्येने हजेरी लावून याचा आस्वाद घेतला.  
     या कार्यक्रमादरम्यान बारामतीतील सुप्रसिद्ध ऐतिहासिक व शिवकालीन नाण्यांचे संग्राहक राकेश शहाणे यांचा सत्कार करण्यात आला. शिवकालीन शस्त्रांचे संग्राहक व प्रदर्शक श्री रवींद्र शंकर पवार व त्यांचे सहकारी श्री पितांबर प्रकाशराव सुभेदार यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच भारतातील एकमेव मराठ्यांच्या आरमाराच्या युद्धनौकांच्या प्रतिकृतीचे निर्माते व प्रदर्शक मा. कुमारजी गुरव यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
     तसेच दिनांक १७ मार्च २०२५ रोजी तिथीनुसार शिवजयंती निमित्त शिवछत्रपतींच्या पारंपारिक पालखीचे आयोजन करण्यात आले असून सदर पालखीचे प्रस्थान सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कसबा येथून होऊन  इंदापूर चौक, गांधी चौक मार्गे समारोप भिगवन चौकातील गणेश मंदिरा नजीक होणार आहे. सदर पालखीमध्ये स्वराज्याचे रणमर्द शीलेदार, स्वराज्याचे गुप्तहेर , पारंपारिक वेशातील बारामतीकर,  तसेच पारंपारिक वाद्य पथके जसे ढोल पथक , झांज पथक , हलगी पथक , वारकरी पथक, गजी नृत्य पथक सहभागी होणार आहेत तरी सुज्ञ बारामतीकरांनी पारंपारिक पद्धतीने काढल्या जाणाऱ्या शिवप्रभूंच्या पालखीस तसेच विविध कार्यक्रमांसाठी उपस्थित रहावे असे नम्र आवाहन *छत्रपती जन्मोत्सव समिती बारामती* मार्फत करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक