जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू
बारामती : बारामतीत शहरात सकाळी सकाळी एक
धक्कादायक घटना घडली असून या घटनेत मॉर्निंग वॉक' ला निघालेल्या वयोवृद्धाला बारामती मधील एका खाजगी कंपनीच्या बसने चिरडले असून वायोवृद्धाचा जागीच मृत्यु झाला आहे.
या अपघातात बारामतीतील जेष्ठ मुद्रक व्यवसायिक मोतिलाल उत्तमचंद दोशी ( वय 82 वर्षे ) यांचा मृत्यु झाला असून दोशी हे पहाटे बारामती मधील नगरपालिकेसमोरून भिगवणरोड दिशेने मॉर्निंग वॉक' ला निघाले असताना मागुन आलेल्या एका खाजगी कंपनीच्या बसने बस क्र. MH01 L7309 ने त्यांना चिरडले त्यांच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. या प्रकरणी बस चालक सुनील पांडुरंग शेंडगे वय- ३९ रा. खंडोबानगर,बारामती मुळ रा. भिगवण ता.इंदापूर यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रत्यक्ष ज्यावेळी घटना घडली तेव्हा बस चालक याने जागेवर बस न थांबविता एवढा मोठा अपघात होवून देखील अपघातात गंभीर व्यक्तीला उपचारासाठी मदत न करता चालक बससह पळून गेला त्यामुळे नागरिकांकडून झालेल्या घटनेचा प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिस प्रशासनाने अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहून वाहनाचा तपास लावला आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघात झाल्यावर सर्व प्रशासन यंत्रणा सतर्क होतात. तपास होतो चौकशी होते आरोपी सापडतात पण एखाद्या निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागतो. कुटूबांचा आधार जातो. त्याचा विचार कोण करणार? हा गंभीर प्रश्न आहे.
बारामती शहरात विकासाच्या नावाखाली भर चौकात फुटपाथ, शो ची झाडे, बसायला दगडी कट्टे केल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी रोजच बघायला मिळत आहे. स्मार्ट सिटी सारखे सुशोभिकरण करताना गावातील मुळ रस्त्यांचा रुंदीचा विचार करणे गरजेचे आहे.
आता तर नगरपालिकेच्या गेटच्या बाहेर स्पिडब्रेकर सारखे मोठा उंचवटा करण्यात आला आहे. त्याला कुठलाही वेगळा रंग किंवा पांढरे पट्टे न मारल्यामुळे अनेक वाहन चालकांना व महिलांना अंदाज न आल्यामुळे त्यावरून गाडी उडुन खाली पडल्याने अनेकांचा अपघात झाला आहे.
अपघात झाल्यावरच एखाद्याचा जीव गेल्यावरच प्नशासनाने नुसती हळहळ व्यक्त करुन काय उपयोग? ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा